अक्षय कुमारचा नवा सिनेमा ‘केसरी’ चा फर्स्ट लूक

0

मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा नवा सिनेमा ‘केसरी’ चा फस्ट लूक लाँच झाला आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार एका बहादूर सिख असल्याचा दिसत आहे. पोस्टरमध्ये अक्षयसोबत संपूर्ण सिख सेना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या खास मुहूर्तावर पोस्टर लाँच करण्यात आला आहे. केसरीच्या पोस्टरला लाँच करताना अक्षय म्हणाला की, मेरी पगडी भी केसरी… जो बहेगा वो लू भी केसरी.. और मेरा जवाब भी केसरी….

‘केसरी’ या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रा झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. या चित्रपटातून १८९७ मध्ये लढल्या गेलेल्या सारागढीच्या युद्धातील ३६व्या शीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांची शौर्यगाथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अक्षयने या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये शीख रेजिमेंटची तुकडी दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*