Type to search

ऐश्वर्या सोबत आराध्याचा पहिला रँपवॉक

आवर्जून वाचाच हिट-चाट

ऐश्वर्या सोबत आराध्याचा पहिला रँपवॉक

Share
मुंबई – बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री अशी ओळख असलेल्या ऐश्वर्या रायने कन्या आराध्या सह प्रथमच कतार मधील दोहा येथे रँपवॉक करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आराध्या आई ऐश्वर्या सह अनेक कार्यक्रमात नेहमी दिसते आणि बॉलीवूड मधील स्टार किड्स मध्ये तिचा दबदबा आहे. दोहा येथे फॅशन शो मध्ये मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या आउटफीट मध्ये प्रथम ऐश्वर्या रँप वर आली तेव्हाच तिने अनेक नजरा वेधून घेतल्या होत्या.

मात्र काही मिनिटातच आईसारखाच पोशाख केलेली छोटी आराध्या स्टेजवर आली आणि तिने उपस्थित प्रेक्षकांकडून चांगलीच वाहवा मिळविली. यावेळी दोघी पर्ल व्हाईट अँड रेड आउटफीट मध्ये अतिशय सुंदर दिसत होत्या. त्याचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!