संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात अभिषेक-ऐश्वर्या एकत्र झळकणार?

0

संजय लीला भन्साळी यांच्या साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेमकथेवर आधारित सिनेमा बनवत आहे.

या सिनेमात अमृताची भूमिका प्रियांका साकारणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. तर साहिर यांच्या व्यक्तिरेखेसाठी अभिषेक बच्चनचे नाव समोर येत होते. अभिषेकच्या नावानंतर प्रियांकाने सिनेमा करण्यास नकार का कळवला हे मात्र कळत नव्हते.

आता प्रियांकाने या सिनेमाला नकार कळवल्यामुळे भन्साळी ऐश्वर्या रायचा विचार करत आहे असे समजते.

जर या सिनेमासाठी ही पती- पत्नीची जोडी एकत्र आली तर त्यांचा हा एकत्रीत असा नववा सिनेमा असेल.

२००० मध्ये आलेल्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या सिनेमात अॅश- अभी यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. यानंतर ‘कुछ ना कहो’, ‘बंटी और बबली’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरू’, ‘सरकार राज’ आणि मणी रत्नम यांच्या ‘रावण’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केले.

संजय लीला भन्साळी आणि ऐश्वर्या ही दिग्दर्शक- अभिनेत्रीची जोडी या आधीही हिट ठरली आहे. दोघांनी संजय लीला भंसाळींसोबत ऐश्वर्याने याआधी ही काम केले आहे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ आणि ‘गुजारिश’ या सिनेमांसाठी एकत्र काम केले.

LEAVE A REPLY

*