सलमान खानचा आगामी सिनेमा ‘भारत’मध्ये दिशा पटानी दिसणार

0
मुंबई : ‘बागी2’ला मिळालेल्या यशनंतर दिशाला सलमान खानसोबत सिल्वर स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे. सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भुमिका असलेल्या ‘भारत’ सिनेमात दिशा पटानी ची निवड करण्यात आली आहे. दिशाच्या आधी या भूमिकेसाठी कॅटरिना कैफचे नाव चर्चेत होते. मात्र आता या भूमिकेसाठी दिशाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. सलमानसोबत काम करण हे नव्या अभिनेत्रींच्या यशाच गणित मानल जात म्हणून दिशासाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. एका भुमिकेसाठी दिशाची निवड करण्यात आलीए. हा सिनेमा २०१९ साली भारत रिलीज होणार आहे.

अली अब्बास जफरने सलमानसोबत ‘सुल्तान’ आणि ‘टायगर जिंदा है’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित आगामी सिनेमा मध्ये सलमान खान सोबत दिशा पटानी दिसणार आहे. दिशा भारतमध्ये सर्कसमध्ये काम करण्याऱ्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. दिशाबाबत बोलताना अली अब्बास जफर म्हणाला, दिशा या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. आम्ही या भूमिकेसाठी अशा मुलीच्या शोधात होतो जी धाडसी असण्यासोबतच सुंदर असेल. दिशामध्ये हे गुण आहेत.

LEAVE A REPLY

*