#virushka : अनुष्का इटलीला रवाना! विराटशी लग्न करूनच परत येणार?

0

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधान आले असतानाच आता अनुष्का शर्मा कुटुंबीयांसोबत मुंबई विमानतळावर दिसली.

अनुष्का इटलीला जात असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. विमानतळावर अनुष्का शर्मासोबत तिची आई, वडील आणि भाऊ होते.

सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटलीला जात असून, तिथे विराटसोबत तिचे लग्न होणार आहे.

इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल. 13 डिसेंबरला संगीत, 14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*