मकर संक्रांती विशेष : कलाकारांचा पतंगोत्सव….

0
मुंबई : भारत हा सण उत्सवांचा देश मानला जातो. आणि नववर्षाची सुरुवात देखील खास महत्वाच्या सण उत्सवाने केली जाते. जानेवारी या वर्षाच्या पहिल्या महिन्यात मकर संक्रांतीचा उत्सव येतो. हा एक अतिशय महत्वाचा उत्सव मानला जातो. संपूर्ण देशात हा सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जात असतो. तसेच बॉलीवूड मध्ये देखील या सणाला अतिशय असाधारण महत्व आहे. आजवर बॉलीवूड मध्ये खूप काही सिनेमांमध्ये आपले आवडते अभिनेते व अभिनेत्री यांना आपण पतंग उडविताना पाहिले असेल.

यामध्येच अभिनयाचा शहेनशहा व बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच सोशल मिडियावर सर्वाधिक सक्रीय असतात. बिग बी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशभरातील आपल्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्याचबरोबर अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान या दिग्गज अभिनेत्यांनी देखील आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर बॉलीवूड अभिनेते आकाशात पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुट असतात. अनके सिनेमांमध्ये आपण आपल्या लाडक्या अभिनेता व अभिनेत्रीला पतंग उडविताना पाहिलेले आहे. यामध्ये सलमान खान व ऐश्वर्या यांचा हम दिल दे चुके सनम, ‘फुकरे’ फिल्ममध्ये देखील पतंग उत्सव दाखविण्यात आला आहे. तसेच शाहरुखच्या रईस या सिनेमामध्ये एका रोमांटिक गाण्यामध्ये देखील पतंगोत्सव पहायला मिळतो.

सोनी वाहिनीवरील सब टीव्ही वरील सर्वाधिक लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील कलाकार देखील मकर संक्रांतीचा सण उत्सव  मोठ्या जल्लोषात साजरा केलेला आपण पाहिला असेल. 

(Photo File)

बॉलीवूड स्टार : Wish
“लोहरी, पोंगल, बिहू आणि मकर संक्रांती सणाच्या सर्वांना शुभेच्छा ” – अमिताभ बच्चन
” संक्रांतीचा सण आपल्या आयुष्यात प्रेम, उत्साह आणि आनंद घेऊन येतो” – अक्षय कुमार
“आपणास लोहरी, मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा.” – हेमा मालिनी
“लोहरी, मकर संक्रांती आणि पोंगल सणाच्या शुभेच्छा, आयुष्यात प्रेम, शांतता आणि आनंद ठेवा.” – अनुपम खेर
“आपणास लोहाडीच्या शुभेच्छा.” – मनोज वाजपेयी
“अनेक उत्सवांचा दिवस, लोहरी, पोंगल, मकर संक्रांती, उत्तराण आणि बिहुची शुभेच्छा.” इम्रान हाश्मी
“आपणास सर्वाना संक्रांतीच्या शुभेच्छा. मित्रांनो खा.. प्या… व आनंदी राहा.. तसेच कोणाचेही मन दुखवू नका.. सर्वांवर प्रेम करा.” – कपिल शर्मा

LEAVE A REPLY

*