बॉलिवूड पडद्यावरील खलनायक अभिनेता महेश आनंद यांचं निधन

0
मुंबई: बॉलिवूड खलनायक महेश आनंद काळाच्या पडद्याआड गेले आहेत. शनिवारी अंधेरीतील निवास स्थानी ते मृत अवस्थेत आढळून आले. पोलिसांच्या सांगण्यानुसार महेश आनंद अनेक वर्षांपासून एकटे राहत असून कित्येक वर्ष ते बेरोजगारीने त्रस्त होते. त्यांचा मृत्यू दोन दिवसांआधी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचे कुजलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी कपूर रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू नक्की कधी आणि कसा झाल्याची माहिती मिळू शकेल. 1980 ते 1990 दशक गाजवणाऱ्या महेश यांनी  अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. पण गेल्या काही वर्षभरापासून ते गंभीर आर्थिक संकटांना सामोरे जात होते.

महेश आनंद यांनी शहेनशाह, मजबूर, स्वर्ग, थानेदार, विश्वात्मा, गुमराह, खुद्दार, बेताज बादशाह, विजेता आणि कुरुक्षेत्र या चित्रपटात काम केले होते. नुकताचा गोविंदाची मुख्य भूमिका असलेला चित्रपट रंगीला राजामध्ये त्यांनी काम केले होते. जवळपास १८ वर्षानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत कमबॅक केले होते. या चित्रपटाचे निर्माते पहलाज निहलानी आहेत आणि महेश आनंद यांनी पहलाज निहलानी यांच्यासोबत अंदाज व आग का गोलामध्ये एकत्र काम केले होते.

LEAVE A REPLY

*