खुशखबर : इरफान खान लवकरच परतणार

0
लंडन : गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रासलेला बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. आजाराबाबत लंडनमध्ये उपचार घेत असलेला इरफान लवकरच एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्याने सुजीत सरकारचा एक चित्रपट साईन केला आहे. ‘डेक्कन क्रोनिकल’ने ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी इरफानने इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो पोस्ट केला होता. त्यात त्याचं वजन कमी झालेलं दिसत असलं तरी तो खुश असल्याचं दिसत होत. त्याच्या या खुश राहण्याचं कारण हा चित्रपट असावा अशी चर्चा आहे. इरफान सध्या लंडनमधील रुग्णालयात ‘न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर’ या आजारावर उपचार घेत आहे. तो अधून मधून त्याच्या सध्याच्या परिस्थितीबदद्ल टि्वट करत असतो. यामुळे त्याच्या प्रत्येक टि्वटची चाहते वाट बघत असतात.

LEAVE A REPLY

*