Type to search

Featured

सेना-भाजपचे ठरत नाही तोपर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करा; यावर अनिल कपूर म्हणतात…

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कुणाचा? यावरून रणकंदन माजले आहे. भाजपवाले म्हणतात आमचा तर सेनाही अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठोकताना बघायला मिळते आहे. सर्वत्र बैठका, विचार विनिमय, चर्चा, तर्क वितर्क लढवले जात असताना एका नेटकरयाने थेट ट्विटरवर अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करावे अशी साद घातली. यावर काहीच वेळातच अनिल कपूर यांनी उत्तर देत मै Nayak ही ठीक हू असे म्हटले.

२००१ सालचा नायक चित्रपट सर्वांनाच माहिती आहे. या चित्रपटात नायक म्हणून अनिल कपूरने अभिनय साकारला आहे. अनिल कपूर गावाकडचा एक पत्रकार दाखवला आहे. त्याला भ्रष्टाचार कुठे होतो, सरकारी बाबू काम कसे टाळतात, खंडणी कशी वसूल करतात हे ठाऊक असते. दरम्यान, एका दिवसासाठी मुख्यमंत्री झालेल्या अनिल कपूर यांच्या कामाचा धडाका सर्वज्ञात आहे.

या गोष्टीची आठवण करून देत एका नेटकरयाने मुख्यमंत्रिपदाबद्दल कल्पना देत ‘नायक’ सिनेमातील नायक अनिल कपूरच्या अभिनयाचा संदर्भ देत “महाराष्ट्र में जब तक कोई रास्ता नहीं निकलता, तब तक अनिल कपूर को ही मुख्यमंत्री बना कर देख लेते हैं. परदे पर उनका एक दिन का कार्यकाल पुरे देश ने देखा और सहारा है. देवेंद्र फडणवीस और आदित्य ठाकरे क्या सोच रहें हैं?

याचा अर्थ असा की सेना भाजपचा मुख्यमंत्री पदाचा तोडगा निघेल तेव्हा निघेल तोपर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री बनवायला काय हरकत आहे. सर्वांनीच त्यांचा पडद्यावरचा एक दिवसाचा कार्यकाळ पाहिला आहे आणि त्याचे कौतुकही केले आहे. असे या युजरने म्हटले.

विशेष म्हणजे अनिल कपूर यांना ही पोस्ट या बहाद्दराने टॅगदेखील केली होती. यानंतर काही वेळातच अनिल कपूर यांनी या पोस्टला रिप्लाय देत म्हटले की, “मैं Nayak ही ठीक हूँ| असे म्हणत काही काळ राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेल्या रणकंदणावर हशा पसरवला होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!