राकेश रोशन यांच्या ‘क्रिश ४’ मध्ये झळकणार प्रियंका?

0
मुंबई : सलमान खानचा आगामी ‘भारत’ हा चित्रपट सोडल्यानंतर आता देसी गर्ल प्रियंका चोप्रा बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता. प्रियंकाने सध्याच्या घडीला कोणताही बॉलिवूड चित्रपट साईन केला नाही.

‘क्रिश ४’ मध्ये प्रियांकानेच भूमिका साकारावी अशी राकेश रोशन यांची इच्छा होती. मात्र प्रियांकाचं लग्न आणि तिच्या पदरात असलले नवीन हॉलिवूड चित्रपट यामुळे कदाचित ती नकार देईल अशी भीती रोशन यांना होती. मात्र बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार ‘क्रिश ४’ मध्ये काम करायला प्रियांकानं होकार दिला आहे. प्रियांकाच्या उमेदीच्या काळात राकेश रोशन यांनी तिला क्रिश सारख्या बिग बजेट सिनेमात झळकण्याची संधी दिली होती. त्यामुळे तिनंही लगेचच राकेश रोशन यांच्यासोबत काम करायला हिरवा कंदील दिला आहे. २०२० पर्यंत ‘क्रिश ४’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २०१९ पासून ‘क्रिश ४’ च्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*