१६ तासानंतर सात वर्षीय बालकाचा मृतदेह हाती; पाय घसरून पडला होता जलद कालव्यात

0
निफाड | नांदूरमध्यमेश्वर येथील इकडे वस्ती लगत राहणारा व इयत्ता दुसरीत शिकणारा किशोर देविदास मोरे (वय 7) हा सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शौचालयास वस्तीलगत असलेल्या जलद काळव्याजवळ गेला होता.

त्याचा पाय घसरल्याने तो कालव्यात पडला पडला. घटना परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा केला व शोध मोहीम सुरू केली.

तहसीलदार विनोद भामरे यांनी कालंवा बंद करण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक रणजित डेरे व सहकारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ग्रामस्थांचे मदतीने कालव्यात शोधमोहीम सुरु करण्यात आली. कालवा बंद करण्यात आल्यानंतरही त्याचा तपास लागला नव्हता.

शेवटी आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास किशोर मोरे या मुलाचा मृतदेह नांदूरमध्यमेश्वर धारणगाव शिवेलगत कालव्यात सापडला.

LEAVE A REPLY

*