बॉबी देओलच्या हाती बिग बजेट सिनेमा

0
सलमानच्या कृपेने बॉबी चे भाग्य उजळणार
मुंबई : गेल्या काही काळापासून फिल्मपासून दुरावलेला एक चेहरा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अभिनेत्याचे नाव आहे बॉबी देओल. सलमान खान कृपेमुळे बॉबीसाठी बॉलिवूडचे दरवाजे पुन्हा एकदा उघडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब असलेले या अभिनेत्याच्या हाती एकामागोमाग एक अनेक चित्रपट लागले आहेत. सलमान खानसोबत सध्या बॉबी ‘रेस3’च्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे. यानंतर बॉबी होम प्रोडक्शनच्या ‘यमला पगला दिवाना फिर से’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मात्र यामध्ये बॉबीने एक मोठा चित्रपट साईन केला आहे.

बॉबीचेभाग्य सध्या उजळलेले दिसून येत आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्या मागचे कारण म्हणजे बॉबीची बॅक टू बॅक 3 चित्रपट रिलीज होणार आहेत. ‘रेस3’ आणि ‘यमला पगला दिवाना’नंतर बॉबी आपल्याला ‘हाऊसफुल 4’ मध्ये पण दिसणार आहे. नुकताच बॉबीने ‘हाऊसफुल 4’ देखील साईन केला आहे.

हाऊसफुल 4 मध्ये बॉबी देओलशिवाय अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुर्नजन्माच्या कथेवर आधारित आहे. हाऊसफुल सिरिजचे आतापर्यंत आलेले सगळे चित्रपट हिट गेले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या सिरिजने चांगला गल्ला जमावला आहे. साजिदसोबत काम करण्याला घेऊन बॉबी देओल म्हणाला कि, ”मी साजिद सोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

मला नेहमीच साजिदसोबत काम करण्याची इच्छा होती आणि आज ती माझी इच्छा पूर्ण होते आहे. अक्षयसोबत माझी चांगली मैत्री आहे आणि त्याच्यासोबत काम करायला मजा येते. या चित्रपटाची शूटिंग सुरु होण्याची वाट मी मोठ्या आतुरतेने बघतो आहे.

LEAVE A REPLY

*