Thursday, May 2, 2024
Homeनाशिकलाच स्वीकारताना शिंदे येथील मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लाच स्वीकारताना शिंदे येथील मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिकरोड । Nashik

शेत जमिनीच्या झालेल्या इ.टी.एस. मोजणीची साक्षांकित प्रत देण्यासाठी लाच स्वीकारताना शिंदे गावच्या मंडल अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नाशिकरोड येथे अटक केली. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तक्रारदार हा 41 वर्षाचा असून तो नाशिकला राहतो. अटक झालेल्या अधिकार्‍याचे नाव प्रशांत भास्कर घोडके (45) असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घोडके यांनी तक्रारदाराकडे 23 जूनला दहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. 24 जूनला लाच स्वीकारताना घोडके यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले.

तक्रारदाराच्या शेत जमिनीची झालेल्या इ.टी.एस. मोजणीची साक्षांकित प्रत देण्यासाठी व तक्रारदाराला त्यांच्या कामात मदत करण्यासाठी घोडके यांनी लाचेची मागणी केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या अंकीत बिटको पोलिस चौकीसमोर लाच स्वीकारण्याची ही घटना घडली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, पोलिस प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे, एकनाथ बाविस्कर, प्रफुल माळी आदींनी ही कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या