Blog : युवकांनो तयार रहा

jalgaon-digital
3 Min Read

कोरोना व्हायरसशी लढताना भारतात अगदी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन, पोलिस, निमलष्करी दल नक्की तयार आहेत.  पण ते देखील मानव प्राण्यांपैकी एक आहेत ते देखील कधीतरी थकणार आहेत अगदी धोकादायक परिस्थितीत काम करताना ते पुरेशी काळजी घेत असताना सुद्धा प्रशासनाला आज शारीरिक बळाची गरज नसून आज गरज आहे ती प्रबोधनाची.

प्रशासकीय गोष्टी या सुशिक्षित तरुणांनी आधी समजून घ्यायला हव्यात व त्या गोष्टी इतर लोकांना समजून सांगायला हव्यात याची गरज आहे. कारण प्रशासनच प्रत्येक गोष्टीत पुढे आले तर विनाकारण त्यांचे बळ वाया जाईल म्हणून आपण प्रबोधन करण्यासाठी सध्यातरी पुढे आले पाहिजे.

तरच भारत या युद्धजन्य परिस्थितीला तोंड देऊ शकतील व या भयंकर संकटातून आपण सहज रीतीने बाहेर पडू. नाशिक हा करून मुक्त जिल्हा होता मात्र कालच्या बातमीने नाशिकमध्ये देखिल कोरॉना आढळला. त्याचा युवकाचा कुठेही परदेशात प्रवास झालेला नाही.

महत्त्वाचे म्हणजे तो ग्रामीण भागातला तरुण आहे. याचा अर्थ कोरोनाने ग्रामीण भागावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी प्रशासनाने 90 जणांची टीम लासलगाव मध्ये पाठवलेली आहेच.

टीमच्या निदर्शनास काय येते ते लवकरच आपल्या लक्षात येईल मात्र जर हा रोग त्या युवकाला संसर्गाने झालेला असेल तर मात्र परिस्थिती भयावह आहे कारण कारोणा थर्ड स्टेजमध्ये पोहोचलेला असेल ज्याला आपण कम्युनिटी ट्रान्सफर असे म्हणतो आणि ही स्टेज भारतासाठी अतिशय महाभयंकर असेल.

याकरता युवकांनी स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घेऊन इतरांना देखील प्रबोधन केले पाहिजे. वयस्कर लोकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे, लहान बालकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे, स्त्रियांना बाहेर निघू देता कामा नये, सोशल डिस्टन्स सुद्धा जपलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी करत असताना त्या युवकांनी आपल्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे.

कारण प्रशासन थकल्यानंतर आपल्याला बाहेर पडावे लागेल, कारण आपण राखीव सैन्यात येतो आणि हे राखीव सैन्याने युद्धात उतरण्यासाठी स्वतः निरोगी राहिले पाहिजे त्याकरीता एकच पर्याय तो म्हणजे घराबाहेर न पडणे, योग्य तो आहार घेणे पुरेशी झोप घेणे, कारण आपल्या जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी सुद्धा बोलले की “भारताचे युवक हे राखीव सैन्य आहे.

आणि युद्धाच्या आधी सैन्य गमवायचे नसते” या वाक्याचा देखील फार मोठा अर्थ आहे. अर्थ विषद करण्याची गरज नाही कारण जिल्हाधिकाऱ्यांना नाशिक जिल्ह्यातील युवकांवर पूर्ण भरोसा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इस्कॉन मंदिर व इतर अनेक स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक युवकाने किमान यांच्यासोबत स्वतःचे योगदान दिले पाहिजे. चायना, हाँगकाँग, अमेरिका यांसारख्या प्रगत देशात संपूर्ण देश स्वच्छ करण्यासाठी येथील युवक-युवतींनी पुढाकार घेऊन औषध फवारणी केली. असे काम कदाचित आपल्याला देखील हाती घ्यावी लागेल.

कारण आपल्याशिवाय हे काम कोण करणार ही जाणीव प्रत्येक युवकाच्या मनात निर्माण व्हायला हवी.  कारण प्रत्येक बाबीची अपेक्षा जर प्रशासनाकडून केली तर भारत किती वर्ष मागे जाईल हे सांगता येणार नाही.
धन्यवाद

योगेश अशोक चकोर, शिक्षक
भोंसला मिलिटरी स्कूल
नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *