Sunday, April 28, 2024
Homeब्लॉगआज जागतिक योग दिन : काय आहे सुरत-शब्द योग ?

आज जागतिक योग दिन : काय आहे सुरत-शब्द योग ?

संत राजिन्दर सिंह जी महाराज

सृष्टीच्या सुरुवातीपासूनच योग भारताच्या प्राचीन संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. प्राचीन काळातील ऋषिमुनींनी योगाचे महत्व अनेक धर्मग्रंथात नमूद केले आहे.

- Advertisement -

आजच्या आधुनिक युगाच्या धावपळीच्या जीवनात आपलं खान-पान व राहणीमान यांच्यात बराच बदल झालेला आहे. या बदलामुळे आपल्याला रक्तचाप (ब्लडप्रेशर), मधुमेह (डायबिटीस), संधिवात, लठ्ठपणा, भयानक डोकेदुखी या सारख्या अनेक गंभीर आजारांनी आपण ग्रस्त झाले आहोत. तेव्हा आपलं लक्ष योग मार्गाकडे जाते. आजच्या आधुनिक युगातील डॉक्टर मंडळी सुद्धा सांगतात की योग केल्यामुळे आपण शारीरिक दृष्ट्या स्वस्थ राहू शकतो.

जर, आपण योग साधनेच्या फायद्याच्या विवेचनात्मक चर्चा केली असता, दररोज योग केल्याने शरीराचें स्वास्थ्य आणि त्या व्यतिरिक्त अधिक मानसिक शांती मिळते. आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आपल्या अंतरी उर्जेचा विकास होतो. अशाप्रकारे योग द्वारा आपण आपलं शरीरच नव्हे तर आपलं मनही देखील स्वस्थ राखू शकतो.

योगाचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ हटयोग, प्राण योग, राजयोग, कुंभक आणि ज्ञानयोग इत्यादी. योगाचे जेवढे प्रकार आहेत त्यांना कृतीत आणण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो, कारण हा योग कठीण आहे. परंतु सुरत-शब्द योग एक अशी विधी आहे जी फारच सोपी आणि सहज करण्यासारखी आहे. जी करण्यासाठी आपणास खास मुद्रा तसेच विशिष्ट आसनात बसण्याची आवश्यकता नसते. हा असा सहज सोपा प्रकार आहे की ज्याचा अभ्यास कोणीही करू शकतो. भले तो सुदृढ असो अथवा आजारी. हा सुरत-शब्द योग कोणीही करू शकतो. हा सुरत-शब्द योग आपण आपल्या घरी किंवा आपल्या कार्यालयात सुद्धा करू शकतो.

सुरत-शब्द योगाचा दररोज अभ्यास केल्याने इतर सर्व योगांचा यामध्यें समावेश आपोआपच होतो. हा केवळ आपल्या शरीरालाच नव्हे तर आपल्या आत्म्याला सुद्धा स्वस्थ ठेवतो. परम संत कृपाल सिंह जी महाराजांनी या सुरत शब्द योगा बाबत म्हंटले आहे की, “जर आपला आत्मा सुदृढ झाला तर आपले मन आणि शरीर आपोआपच सुदृढ होईल.”

सुरत-शब्द योग आपणास समजावितो की, चेतना आपल्या आत्म्याचे बाह्यरूप आहे. जेव्हा ती प्रभूच्या शब्दाबरोबर जोडली जाते तेव्हा आपण जिथून आलेलो आहोत, तेथे परमपिता परमेश्वराच्या निजधामी पुन्हा घेऊन जाते. सुरत शब्द योगामुळे आपले लक्ष जे बाह्य जगाकडे जाते, त्याला आपण आंतरिक दुनियेत घेऊन जाऊ शकतो, यालाच मेडिटेशन(ध्यानाभ्यास), भजन-सुमिरन आणि ध्यान टिकवणे सुद्धा म्हटले गेले आहे. याचा अभ्यास कोणीही करू शकतो, भले ते लहान मूल असो अथवा वृद्ध, भले एखाद्या धर्माला मानणारा असो अथवा दुसऱ्या धर्माला मानणारा असो, भले तो एका देशाचा रहिवासी असो अथवा कोण्या दुसऱ्या देशात राहणारा असो.

सुरत-शब्द योगाचा दररोज अभ्यास केल्याने आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रभुचे रूप दिसू लागते ज्यामुळे आपल्या अंतरी सर्वांच्या प्रति प्रेमभाव आपोआप जागृत होऊ लागतो. आपण शांतीपूर्ण जीवन व्यतीत करू शकतो. ज्याच्या परिणामस्वरूप आपल्या पासून ही शांती हळूहळू आपल्या परिवारात, समाजात आणि देशातून संपूर्ण विश्वात पसरली जाते. असे केल्याने या धरतीवर स्वर्गाची कल्पना प्रत्यक्ष साकार होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या