Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगBlog : महिलांवरील वाढलेल्या अत्याचारास जबाबदार कोण?

Blog : महिलांवरील वाढलेल्या अत्याचारास जबाबदार कोण?

‘मनुष्यप्राणी’ उच्चारून माणूस देखील एक प्राणी असल्याचे नेहमी उदुक्त केले जाते. मात्र मनुष्य हा प्राणी विचारशील, समाजशील असल्याने त्याच्याकडून माणूसपण जपले जाण्याची अपेक्षा केल्या गेली आहे, नैतिकता, सभ्यता, सदसद्विवेकबुद्धी असे सद्गुण जपत माणूस रानटी अवस्थेतून आजच्या संगणक युगापर्यंत वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते.

शिवाय माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाच एक नवा टप्पा गाठल्याच्या गप्पाही मारल्या जातात, परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असून त्यांच्या स्वभावातील रानटी पणा विकृत होत असल्याचे अवतीभवती सातत्याने घडणाऱ्या घटनांवरून जाणवत राहते.

- Advertisement -

देशात आणि राज्यात स्त्रियांवरील अत्याचार आणि बलात्कार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, या वाढत जाणाऱ्या गुन्हेगारीमुळे महिला अत्याचाराच्या संख्येत तर दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे जनता सुरक्षित राहिलेली नाही म्हणून देशभरात अनेक वाद नव्याने निर्माण होत आहेत.

हिंसाचार आता आपल्याला नवीन नाही, आता कुतूहल उरले आहे ते केवळ हिंसाचार नव्या कुठल्या पद्धतीने केला जातो, त्यातल्या त्यात अनपेक्षित समाज घटकाने हिंसाचार केला तर समाजमन थोडे गुंगितून जागे होऊन डोळे कीलकीले करून पाहू लागते.

गेल्या काही दिवसात हिंसाचारात कुतुहुल जागे करणाऱ्या काही घटना घडल्यात त्यात हैदराबाद बलात्कार प्रकरण, हिंगणघाट जळीत प्रकरण, एसिड प्रकरण ई. , हि लोकं सुडाच्या क्षणिक समाधानासाठी पेटून उठतात आणि हे असे कृत्य करतात. नुकताच घडलेला हिंगणघाट जळीत कांडाच्या ताज्या प्रकरणाचे गांभीर्य समजाऊन घ्यायला हवे.

देशभरातील स्त्रियांना आता असुरक्षित वाटू लागले असले तरी आपल्या देशात स्त्रियांची सुरक्षितता, त्यांच्यावर होणारे अत्याचार, बलात्कार या गोष्टींकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहायला हवे.

पोटातील गर्भापासून ते मृत्यूच्या शय्ये वरील स्त्रित्वाची चाललेली अखंड अवहेलना थांबणार आहे का? तोकड्या कपड्यांमुळे किंवा रात्री अपरात्री बाहेर फिरण्यामुळे बलात्कार सारख्या घटना घडतात, असं म्हणण म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहण्यासारख आहे. मुळात स्त्रीवरील अत्याचाराचा दोष स्त्रीलाच देणे हेच सामाजिक विकृतीचे लक्षण आहे.

महाभारतातील उदाहरण घेऊ, द्रौपदीने तोकडे कपडे घातले होते म्हणून तिच्या पदराला भर सभेत हजर असलेल्यांनी हात घातला होता का? नव्हता, ती रात्री अपरात्री एकटी फिरत होती म्हणून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता का? नव्हता…

मग कोण जबाबदार होतं? अगदीच लहान मुलींसोबत सुद्धा असे प्रसंग घडतात, त्या कुठे रात्री अपरात्री बाहेर फिरतात, त्यावेळी निदान श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज राखली, पण आता तसं नाहिये कारण “पोथी” चे पारायण करणारी पिढी गेली, “पोर्न” च पारायण करणारी पिढी आली आहे, नग्नता विचारातील,

अचारणातील जाणार कशी. पण या विकृत आणि मुजोर मानसिकतेला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी काठोराती ल कठोर शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली पाहिजे. आणि त्याची कडकं अमलबजावणी केली तरच काही सुधारणा होईल.

वास्तविक अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अवघड नाही, मनात आणले तर अजूनही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारू शकते, त्यासाठी राजकीय नेतृत्वाने इच्छाशक्ती दाखवायला हवी, पण तशी ती दाखविली जात नाही.

आज जे गुन्हेगार आहेत त्यांच्याबाबतीत कसलाही दयाभाव न दाखवता त्यांचे बेमुर्वत पारिपत्य करायलाच लागेल, पण ते करत असताना नवे गुन्हेगार कसे निर्माण होणार नाहीत याचा ही प्रकर्षाने विचार करायला पाहिजे, तसे केले नाही तर येणाऱ्या काळात तुरुंगातील गर्दी वाढत राहील आणि समाजाची भावना शून्यातही..!

  • शमीका खुशाल कारीया, लेखिका प्रसिद्ध ब्लॉगर आहेत. 
- Advertisment -

ताज्या बातम्या