आम्ही त्यांना भेटलो तेव्हा... : चिमुकल्यांसोबत रमले

आम्ही त्यांना भेटलो तेव्हा... : चिमुकल्यांसोबत रमले

नाशिक | प्रा.डॉ.वर्षा अनिल भालेराव

शिवशाहीर (Shivshahir) बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.सन 2012 व 2013 साली साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठाणच्या (Sahitya Prasar Kendra Pratishthan) वतीने 150 हून अधिक चिमुकल्यांसाठी बाबासाहेबांच्या सहवासात एक दिवस अशी आनंद सहल आम्ही नाशिकच्या (nashik) निसर्गरम्य वातावरणात (scenic environment) आयोजित केली होती.

मिलिंद कुलकर्णी (milind kulkarni) यांचे निवासस्थानी मुक्कामी असताना आमच्या साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकार्‍यांशी तासनतास गप्पांचा फड रंगायचा यावेळी बाबासाहेबांच्या साधेपणाचे दर्शन तर घडलेच पण मुलांबद्दल त्यांना किती प्रेम आहे याची प्रचितीही आली. शिवरायांच्या (shivrai) विविध आठवणी आपल्या ओघवत्या शैलीत सांगून चिमुकल्यांना ते त्या काळात घेऊन गेले.

शिवरायांबद्दल मुलांना किती माहिती आहे हे त्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जाणून घेतली. मुलांनाही आपण घरच्या व्यक्तीशी बोलत आहोत असेच वाटत होते.त्यांच्या सानिध्यात दिवस कसा सरला हेच कळले नाही.

शिवरायांच्या जीवनावर मुलांनी नाटिका (Drama) सादर केली त्यावेळी शिवरायांची भूमिका करणारे पात्र (Characters) स्टेजवर असेपर्यंत बाबासाहेब उभेच होते. शिवराय त्यांच्या नसानसांत किती भिनले होते तेच त्याद्वारे प्रतीत होत होते.आज ते आपल्यात नाहीत असे समजले आणि त्यांच्या आठवणींनी डोळे नकळत पाणावले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com