आम्ही त्यांना भेटलो तेव्हा... : त्यांच्या सेवेची संधी

आम्ही त्यांना भेटलो तेव्हा... : त्यांच्या सेवेची संधी

नाशिक | नितीन भोसले, माजी आमदार

जाणता राजाच्या (janta raja) माध्यमातून2008 मध्ये बाबासाहेब पूरंदरे (Babasaheb Purandare) याच्यासोबतचा स्नेह वाढला या कार्यक्रमाच्या निमित्ताने 8 दिवस त्यांनी माझ्याच घरीच मुक्कामी केला होता.

बाबासाहेबांचा स्वभाव (nature) शांंत व प्रमळ (calm and serene) होता. मायेचा झरा म्हंंटल तरी वावगे ठरणार नाही. घरातले साधे जेवण त्यांना पसंत होते. दुध काला म्हणजे चपाती वरण दही आमटी असे छोटेसे जेवण (Meals) त्यांचे असायचे. चहा दूध (Tea & milk) घेत असे. जिभेवर त्यांचा मोठा संयम होता. त्यांचा जिभेवरील ताबा हाच त्यांच्या शतायुषी जिवनाचे रहस्य होते.

शिवरायांच्या (shivaji maharaj) इतिहासाचा (History) गाढा अभ्यास त्यांच्या कडे होताच.ते प्रत्येक श्वासाला चालता बोलताना ते शिवराय (shivrai) जगत होते. त्यांच्या प्रत्येक संवादातून शिवभक्ती (shivbhakti) व त्याविषयीचे ज्ञान प्रगट होत होते. जाणता राजाच्या भूमीपूजनाच्या (bhumipujan) वेळी त्यांनी आशिर्वाद (Blessings) दिला होता. जो कोणी जाणता राजा नाट्य (Drama) आयोजित करतो तो आमदार (mla) नाहीतर खासदार (mp) होतो.

त्यांच्या शिवप्रेमातून मिळालेला आशीर्वादाने दूसर्‍याच वर्षी मी निवडणूक (election) जिंकून आमदार झालो. जाणता राजातून मिळालेल्या पैशातून दहा हजार चौरस फूटाचे मराठा (maratha) मंगल कार्यालय बांधले. माझ्या लहान मुलांना मांडीवर बसवून ते इतिहासाच्या गोष्टी सांगत असत. भेटावला येणार्‍यां लोकांशी संवाद साधताना शिवरायाच्या लहानसहान गोष्टी सांगून त्यांना प्रबोधन करीत होते. बाबासाहेबांसारखे एक महान शिवप्रेमी अभ्यासक माझ्या घरी आले. त्यांची सेवा करण्याची संधी मला लाभली हे मी माझे मोठे भाग्य मानतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com