Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगआम्ही त्यांना भेटलो तेव्हा... : आधुनिक व्यास

आम्ही त्यांना भेटलो तेव्हा… : आधुनिक व्यास

नाशिक | दिनेश वैद्य

प्रातःस्मरणीय शिवशाहीर (Shivshahir) श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना मानाचा मुजरा. एखादा इतिहास (History) वेडा माणूस आपलं आयुष्य कसं पणाला लावू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब पुरंदरे.

- Advertisement -

जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास रुजवणारे ठसवणारे असे आमचे बाबासाहेब. इतकं उत्तुंग आभाळाला गवसणी घालणारे कार्य करूनही गर्वाचा, अभिमानाचा किंचितही लवलेश नसणारे कायम आणि कायमच छत्रपती शिवाजी हेच दैवत मानणारे आमचे बाबासाहेब.

बाबासाहेबांचा आणि माझा तसा संपर्क गेल्या पंधरा वर्षातला आणि त्यातही जेव्हा त्यांना कळालं की मी हस्तलिखितांच्या विश्वात काम करतो त्यावेळी त्यांचा पहिला प्रश्न होता की तुम्ही नाशिक (nashik) मध्ये राहता तर नाशिक आणि त्र्यंबक मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek ceremony) हा लिहिला गेला या संदर्भात काही कागदपत्र तिथे मिळतील का?.

बाबासाहेबांचा प्रश्न हा आदेश म्हणून मी त्या शोध मोहिमेवर लागलो आणि त्यातच नाशिक तसेच त्रंबक मधील काही घरांमध्ये बरीच विचारणा करून काही पानं हाती लागली, ज्यांची होती त्यांची रीतसर परवानगी घेऊन त्या पानांची छायांकित प्रत बाबासाहेबांच्या सुपूर्द केले त्यावेळी त्यांचा एक अत्यंत उत्तम शब्द होता वा रे पठ्या!, आणि त्यांची पाठीवरील थाप आजही स्मरणात आहे.

नाशिक मध्ये बाबासाहेब येणार आहेत हे कळलं की मी नक्की त्यांना भेटायला जात असे असेच भेटता भेटता अनेक वेळा शिवरायांच्या अनेक गोष्टी त्यांच्याकडं लीलया ऐकायला मिळत त्यावेळी सुरतेच्या झालेल्या दोन्ही लुटी तसेच त्यासंबंधी असलेली कागदपत्र, भीमसेन सक्सेनाचे कागदपत्र आणि अशा अनेक गोष्टी, महाराजांचे युद्धकौशल्य (Martial arts) गनिमी कावा (Guerrilla warfare), तसेच ह्या सुरतेच्या (surat) लुटी त्यांनी नाशिक मार्गे न नेता जव्हार (Jawahar) मार्गेच का नेल्या.

अशी अनेक उदाहरण बरोबर असलेले सरदार त्यांच्याशी असलेला शिवरायांचा संबंध अशा एक ना अनेक गोष्टींवरती ते लीलया भाष्य करत, अफझलखानाच्या (Afzal Khan) वधाचा तो क्षण त्यांच्याकडून ऐकत असताना मला अगदी जिवंत जगल्याचा भास त्यावेळी झाला होता.असेच प्रत्येक वेळी भेटल्यावर ते मला कायम विचारत शिवरायांवर ती काही हस्तलिखितं किंवा नोंदी काहीही सापडल्यास मला नक्की दे मी त्यांना म्हणायचो बाबासाहेब तुमच्याशिवाय त्या नोंदींना किंवा त्या हस्तलिखितांना (Manuscripts) काही अर्थच नाही ज्यावेळी ते तुमच्या हातात पडतील त्याच वेळी त्याच सोनं होईल.बाबासाहेबांचं हे नातं आयुष्यभर कवटाळून ठेवण्यासारखं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या