आम्ही त्यांना भेटलो तेव्हा... : आईचा सत्कार आठवणीत

आम्ही त्यांना भेटलो तेव्हा... : आईचा सत्कार आठवणीत

नाशिक | विवेक कुलकर्णी, उद्योजक

शिवाजी महाराजांवरचे (shivaji maharaj) प्रेम व निष्ठा (Love and loyalty) यातून बाबासाहेबांचा (babasaheb purandare) परिचय वाढला. त्यातून नाशिकच्या (nashik) कंपनीच्या उदघाटनाप्रसंगी (Inauguration) बोलावले होते. हॉटेल (hotel) मध्ये राहण्याला त्यांंनी मज्जाव करुन घरातच राहणे पसंत केले होते.

त्यावेळी दिवाळीचा (diwali) काळ असल्याने मुलाने किल्ला (fort) बनवला होता. तो किल्ला बघायला उत्साहाने गेले होते. त्यावेळी ते 86 वर्षाचे होते त्यावेळी त्यांचा उत्साह मोठा होता. कंपनीत पहिल्या मजल्यावर लिफ्टचा वापर न करता जिन्यातून आले.

शिवाजी महाराजांकरिता जे आयुष्य वेचले त्यात स्त्रियांबद्दलचा जो आदर होता तो दिसून येत होता. माझी आई त्यांच्या पेक्षा 15 वर्षांनी वयाने लहान होती. मात्र घरात आल्यानंतर आईला पाहताच त्यांनी ‘मासाहेब मुजरा’ या शब्दातून आईचा जो सत्कार (Hospitality) केला तो कुटंबाच्या आठवणीत राहीलेला प्रसंग आहे. हा पैलू सर्वांनीच आंगिकारणे गरजेचे आहे. ते शिवाजी महाराजच (Shivaji Maharaj) जगले. ते कृतीतून दाखवले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com