Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगआम्ही त्यांना भेटलो तेव्हा... : एक वेगळ्या नाट्याचा अनुभव

आम्ही त्यांना भेटलो तेव्हा… : एक वेगळ्या नाट्याचा अनुभव

नाशिक | तेजस बस्ते

शिवशाहीर (Shivshahir) बाबासाहेब पुरंदरे (balasaheb purandare) ये बाळ, नाव काय तुझे? त्यांनी मला विचारले. तेजस्. तेजस् बस्ते, मी खाली वाकून त्यांना नमस्कार (namaskar) करून उत्तर दिले. तेजस नाव मोठे राजस आहे. औक्षवंत व्हा. बघू काय आणलंयत ते, मन भरून आशीर्वाद (Blessings) देत त्यांनी कामाकडे विषय वळवला. जाणता राजा (janta raja) या महानाट्याच्या (mahanatya) प्रयोगा आधी दृकश्राव्य माध्यमातील पब्लिसिटी (Publicity) मी व माझ्या सहकार्‍यांवर होती.

- Advertisement -

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची माझी ही पहिलीच भेट होती. नव्वदीच्या दशकात त्यांच्या जाणता राजा या महानाट्याचे नाशिकमध्ये (nashik) प्रथमच आयोजन करण्याचे शिवधनुष्य डॉ. वसंत पवारांनी (dr. vasant pawar) उचलले आणि लिलया पेलले. जाणता राजा, रंगमंचावर सादर होण्याआधी कामानिमित्त मग अनेक भेटी झाल्या. इतका मोठा माणूस, ज्यांना मी लिखाणातून, व्याख्यानांमधून भेटत होते ते आपली विचारपूस करतात, गप्पा मारतात याचे खूप अप्रूप वाटत होते.

त्यांच्या बोलण्यातून शिवछत्रपतींच्या (chatrapati) इतिहासाबद्दल (History) प्रचंड प्रेम पाझरायचे. एक दिवस डॉक्टरांनी त्यांच्या मुलाखतीची कल्पना मांडली. त्यांनी चटकन होकार दिला आणि पुढचे काही दिवस त्यांच्यासोबत कॅमेरा, धनंजय, मी असे असण्याचा सिलसिला सुरू राहिला. महानाट्याच्या मागे एक वेगळे नाट्य आम्ही अनुभवले.

मराठ्याची (maratha) पोर आम्ही, नाही भिणार मरणाला, हे त्यांच्या तोंडून ऐकले तेव्हा खरेच वीरश्री संचारली अंगात. अजूनही कधी डगमगते आहे असे वाटले तर मी त्यांचा तो आवाज आठवते. आयुष्यभरासाठी तहहयात पुरतील असे सोनेरी क्षण मनाच्या कोपर्यात जपण्यासाठी मी त्यांच्या सहवासातून वेचले. शिस्त (Discipline), काटेकोरपणा, वक्तशीरपणा, छोट्या छोट्या गोष्टींची अभ्यासपूर्ण मांडणी,

नेमकेपणा, सोबत्यांच्या मनात काय चाललेय याची अचूक ओळख असे त्यांचे कितीतरी स्वभावविशेष जाणता आले. तवतेजाचा एक किरण दे. तव धैर्याचा एक किरण दे… हे त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले. अमोग वक्तृत्व अनुभवायला मिळाले! रंगमंचावरच्या पात्रांशी, तंत्रज्ञांनी त्यांना संवाद साधताना बघितले. उभारणीपूर्वीच्या सूचनांचे काटेकोर पालन व्हावे याविषयी त्यांना कटाक्षाने लक्ष ठेवतानाही पाहिले.बाबासाहेबांच्या सोबत घालवलेले क्षण, वेचलेले शिवछत्रपतींच्या स्वराज्यस्थापक इतिहासाचे कण तहहयात सोबत असतील ते यापुढे कधी दिसणारसुद्धा नसतील तरी ही…. भावपूर्ण श्रद्धांजली

- Advertisment -

ताज्या बातम्या