Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगआजोबानी काय सांगितले?

आजोबानी काय सांगितले?

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

मागील लेखात आपण पाहिले की, प्रथमेशचा त्याच्या बाबांची असलेला अबोला आणि त्यानंतर त्यांची बाप-लेकाची चायपार्टी. आता प्रथमेशला थोडीशी धाकधूकही होती आणि तितकीच उत्सुकताही होती, पुढचा पेपर उघडून पाहण्याची; कारण हा पेपर म्हणजेच त्याचे आदराचे सर्वेसर्वा असलेल्या आजोबांचा. आजोबांंविषयी जितका आदर तितकीच आदरयुक्त भीती वाटायची म्हणून आजोबांनी आता त्याच्या कोणत्या आवडी लिहिल्यात हे पाहण्याची व वाचण्याची त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच त्याने कागद उघडला आणि त्यातल्या आवडी वाचून तो विचारातच पडला. संगीताची आवड, (मुलीचे नाव नव्हे तर गाण्यातले संगीत), जोडजाड करणे, प्राण्यांची व पक्ष्यांची आवड. हे काय! आजोबांनी तर तीनच आवडी लिहिल्यात, हे काय! जोडजाड करणे म्हणजे काय? ही आवड तर गजबच आहे! आजोबाही काय काय नावे शोधून आणतात काही कळतच नाही. आता आजोबांनाच विचारावे लागेल, तेव्हाच समजेल. प्रथमेश तसाच कागद घेऊन आजोबांकडे गेला आणि आजोबांना म्हणाला, हे काय हो आजोबा, तुम्हाला माझ्या आवडी लिहायला सांगितल्यात आणि तुम्ही भलतेच काहीतरी लिहून दिले.

- Advertisement -

अरे, मग मला सांगा, जोडजाड करणे म्हणजे नेमके काय? आणि जोडजाड करणे आवड का नाही होऊ शकत? खरे आहे तुम्ही म्हणतात ते, पण मला लवकर सांगा जोडजाड करणे म्हणजे नेमके काय? मग ऐक. जोडजाड करणे म्हणजेच तू नाही का तुझी इलेक्ट्रिकची खेळणी खराब झाल्यावर खोलतो आणि पुन्हा आतल्या वायरी जोडून दुरूस्त करतोस. तुझ्या आईचा मिक्सर, शिलाई मशीन खोलून दुरूस्त करतोस. माझी स्कूटर, तुझी सायकल दुरूस्त करतोस. त्यालाच मी जोडजाड करायला आवडते असे म्हटले आहे आणि हो, मी जोडजाड शब्द का वापरला? माहिती आहे का तुला! तर तुझ्या भाषेत एका नवीन शब्दाची भर व्हावी म्हणून! ज्याची भाषा समृद्ध असते तो उत्तम संवाद साधू शकतो. आता आले का लक्षात. हो आजोबा. पण आजोबा, प्राणी व पक्ष्यांची आवड तर माझ्या मित्रांनाही आहे. जवळजवळ 90 टक्के लोकांना प्राणी, पक्षी आवडतात. पण फक्त आवडणे आणि त्यांच्या काळजीसह आवडणे यात फरक आहे. बाहेर अंगणात गाय, बैल, शेळी दुपारच्या वेळी आलेत तर तू न सांगता बादलीत पाणी घेऊन जातोस आणि प्रत्येकाचे पाणी पिताना निरीक्षणही करतोस. एखाद्या प्राण्याने पाणी कमी प्यायल्यावर तुला दिवसभर प्रश्न पडतो? त्या गाईला, शेळीला काही त्रास तर नसेल होत ना! तीच गोष्ट पक्ष्यांची घरटे करेपर्यंत आणि त्यांची पिल्ले उडून जाईपर्यंत तुझे अनेक प्रश्न माझे डोकं खाऊन टाकतात.

बरोबर ना! हो आजोबा, खरे आहे तुमचे म्हणणे. मग तुझी ही आवड भविष्यात पशुवैद्यकीय अधिकारीपदाकडे झाली तर सांगता येत नाही. आता कळाले का मग, आवडीचा संबंध कसा असू शकतो! होय आजोबा कळाले. मी पळतो आता रितेशकडे. तो माझी वाट पाहत असेल. प्रथमेश आजोबांना बाय करत धूम पळत सुटला. तसे आता तुम्हीही मैदानावर खेळायला धूम ठोकू शकतात. तितक्यात आजोबांच्या लक्षात आले, अरे तिसरी आवड तर राहिलीच. परंतु प्रथमेशला तिसरी आवड जाणून घ्यायला वेळच नव्हता त्याला सुटीत खूप खेळायचे आहे म्हणून आजोबा आवाज देईपर्यंत तो दिसेनासा झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या