Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगरुद्राक्ष एक अद्वितीय स्पंदन

रुद्राक्ष एक अद्वितीय स्पंदन

विश्वातल्या प्रत्येक वस्तूचं विशिष्ट स्पंदन असतं. भारतीय संस्कृतीत आपण वनस्पती, फुलं, प्राणी अशा सगळ्या गोष्टींचे गुणधर्म

आपण ओळखले आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला आध्यात्मिक मार्ग वाटचाल करायला सहायक ठरतील आणि कोणत्या ठरणार नाहीत.

- Advertisement -

तुम्ही ऐकलं असेलच एक विशिष्ट फुल शिवशंकराला फार आवडतं. किंवा दुसरं एक फूल विष्णूचं खूप आवडतं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण त्या फुलातील फक्त विशिष्ट स्पंदन ओळखलंय ज्याला आपण शिव किंवा विष्णू म्हणतो, त्या स्पंदनाशी ते जुळणारं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही त्याला स्पर्श करता किंवा तुम्ही ते कोणाकडून स्वीकारता, त्याचा तुमच्यावर एक विशिष्ट परिणाम होतो.

रुद्राक्ष त्या वस्तूंपैकी एक आहे ज्याचं स्पंदन अतिशय विलक्षण आहे.

रुद्राक्ष शरीरावर धारण करण्याचं एक कारण म्हणजे ते तुमचं आभामंडळ नितळ करते. आभा म्हणजे प्रत्येक शरीराच्या आसपास प्रकाश आणि उर्जेचे एक विशिष्ट क्षेत्र असते. प्रत्येक भौतिक वस्तूची स्वतःची आभा असते, अगदी निर्जीव वस्तुंची देखील असते. आजकाल त्याचे फोटो काढले जातात आणि पुष्कळ प्रकारे तीचे रेकॉडिंगही केले जात आहे. आभा काळ्या कुट्ट रंगापासून शुभ्र पांढर्‍या रंगात असू शकते. तुम्ही एखाद्या संताची किंवा ऋषींचे फोटो पाहिले असतील ज्यांच्या डोक्याभोवती पांढरी शुभ्र प्रभा असते.असं नाहीये की हे लोक त्यांच्या डोक्यामागे बल्ब घेऊन फिरत होते. याचा अर्थ तो चित्रकार हे तुमच्यावर ठसवण्याचा प्रयत्न करतोय की ते निर्मळ जीव होते, ज्यांची आभा शुद्ध पांढरी होती. तुम्ही जर रुद्राक्ष घातलं तर याचा अर्थ असा नाही की उद्या सकाळी तुमच्या डोक्यामागं एक चमकदार वलय असेल. पण जर तुम्ही स्वतःला शुद्ध करण्यासाठी इच्छुक असाल, तर प्रत्येक लहानसहान मदतीचा तुम्हाला वापर करावासा वाटतो.

विशेषतः जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा तुमची आभा क्षीण होते. लोकांना प्रवासामुळे थकवा येतो याचे हे एक कारण आहे. जरी तुम्ही प्रत्यक्षात बसून दहा तास काहीही करत नसलात तरीही, इतर कोणीतरी गाडी चालवत असतानाही, तुम्ही खूप थकला आहात असे तुम्हाला जाणवते. याचं कारण म्हणजे, निसर्गानं तुमचं शरीर ज्या वेगानं हालचालीसाठी तयार केलंय त्यापेक्षा जास्त वेगानं तुम्ही जात असल्यानं तुमची आभा क्षीण होते. तुम्ही वेगात, अजून वेगात गेलात, समजा ताशी सहाशे मैल वेगात प्रवास करताय, मोकळ्या जागेवर, खिडकीच्या काचेशिवाय, तर तुमची त्वचा सोलून निघेल, त्यानंतर तुमचं मांस उडून जाईल आणि मग तुमची हाडं सुद्धा उडतील. पहिली गोष्ट जिचं नुकसान होतं ती म्हणजे तुमची आभा. जर तुम्ही रुद्राक्ष घातलं असेल तर ते तुमच्याभोवती एक विशिष्ट संरक्षक कोष निर्माण करतं. आणि हे तुमची आभा स्थिर ठेवतं जेणेकरून प्रवासातल्या हालचालींची काळजी घेतली जाईल.

रुद्राक्षाबाबत इतरही अनेक पैलू आहेत – ते तुमचा रक्तदाब कमी करतं आणि तुमच्या मज्जासंस्थेला शांत-निवांत करतं. आज भारतात, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाच्या आजारांकरिता काही डॉक्टर रुद्राक्ष वापरण्याचा सल्ला देत आहेत कारण त्यात एक विशिष्ट स्पंदन आहे ज्यामुळे संपूर्ण यंत्रणा शांत होते.

पण रुद्राक्षचा मुख्य हेतू तुम्हाला दैवी कृपेप्रती ग्रहणशील करणे हा आहे. कृपेशिवाय, मग ती आध्यात्मिक प्रक्रिया असो, आरोग्य असो की संपत्ती, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळणार नाही. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्राणीमात्र काही ना काही प्रकारे, मग ते जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे, कृपेप्रती ग्रहणशील होत असतो. जर तुम्ही जाणीवपूर्वक कृपेला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवला तर ते एक चांगले वंगण असलेलं आयुष्य असेल, ज्यात सर्वकाही फार सोपं आणि सुरळीत कार्य करते. म्हणजे रुद्राक्ष ती शक्यता थोडीशी वाढवत आहे. रुद्राक्षाशिवायही तुम्ही कृपेला उपलब्ध होऊ शकता, पण हा एक आधार आहे.

या महाशिवरात्रीला रुद्राक्ष दीक्षा घ्या. सद्गुरूंनी उर्जित केलेल्या रुद्राक्षसाठी नोंदणी करा आणि उर्जित रुद्राक्ष तुमच्या घरी मोफत मिळवा. तुमच्या आप्तेष्टांनाही ते भेट द्या!

सद्गुरु जग्गी वासुदेव

(लेखक द्रष्टे अध्यात्मगुरु, लेखक आहेत.)

isha.sadhguru.org/RD

- Advertisment -

ताज्या बातम्या