Saturday, April 27, 2024
Homeब्लॉग'जेम्स वेब टेलिस्कोप' उलगडणार ब्रम्हांडच्या जन्माचे रहस्य

‘जेम्स वेब टेलिस्कोप’ उलगडणार ब्रम्हांडच्या जन्माचे रहस्य

नाशिक | निखिल परदेशी | Nashik

दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी जगात एक इतिहास (History) घडविण्यात आला आधुनिक जगातील अत्याधुनिक टेलेस्कोप (Sophisticated telescope) ‘जेम्स वेब टेलेस्कोप’चे (James Webb Telescope) , ‘इ.एस.ए.’च्या (ESA) ‘एरियन फ्लाइट- VA256’ (Arian Flight-VA256) या रॉकेटच्या साहाय्याने साऊथ अमेरिकेच्या (South America) ‘फ्रेंच गोयाना’ (French Guiana) येथून यशस्वी प्रक्षेपण (Successful launch) करण्यात आले. हा टेलिस्कोप (Telescope) येणाऱ्या भविष्य काळात एक महत्वाचे पाऊल मानला जात आहे.

- Advertisement -

आजपासून जवळपास ३१ वर्षांपूर्वी १९९० मध्ये मानव इतिहासातील सगळ्यात यशस्वी मिशन ‘हबल टेलेस्कोप’ (Hubble Telescope) हा पाच खगोलशास्त्रज्ञांबरोबर नासाच्या (NASA) डिस्कव्हरी स्पेस शीटलच्या (Discovery space shuttle) साहाय्याने लॉन्च करण्यात आले होते. या टेलेस्कोपला पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये जवळपास सहाशे कि.मी. च्या उंचीवर स्थापित करण्यात आले होते. जवळ-जवळ तीन दशकांपर्यंत या टेलेस्कोपच्या शोधाने आपल्या ब्रह्मांडकडे (universe) बघण्याचे दृष्टिकोनच बदलले.

‘हबल टेलेस्कोपने (Hubble Telescope) आपल्या शोधने आकाशगंगा (Galaxy), ग्रह (Planet), ब्लॅकहोल (Blackhole), एक्सोप्लानेट (Exoplanet), डार्क एनर्जी (Dark energy), बिग बँग (Big Bang) आणि आपल्या ब्रह्मांडच्या वयाशी (age of the universe) निगडित बरेच कोडे सोडविण्यासाठी वैज्ञानिकांची (Scientists) मदत केली आहे. कमी उंचीवर असल्यामुळे हा टेलेस्कोप दुरुस्तीही करता येऊशकत होते. वेळेनुसार याचे पार्टसही बदलता येऊ शकत होते. आत्तापर्यंत हबल टेलेस्कोपला अंतराळात पाचवेळा दुरुस्त केलेगेले आहे. परंतू हा टेलेस्कोप आता फक्त पाच वर्षेच वापरात येणार आहे.

यामुळे शास्रज्ञ ‘जेम्स वेब टेलेस्कोप’च्या साहाय्याने ब्रह्मांडाच्या (universe) सुरवातीपासून नवीन शोध करण्याच्या तयारीत आहे. या शोधांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘नासा’ने (NASA) नवीन पिढीचा ‘जेम्स वेब टेलेस्कोप’ला जवळ-पास १४ वर्षांच्या विलंबानंतर २५ डिसेंबर २०२१ रोजी लॉन्च करण्यात आले. ‘जेम्स वेब टेलेस्कोप’ हा जुन्या ‘हबल टेलेस्कोप पेक्षा शंभर पटीने शक्तिशाली आहे. जो आपल्या ब्रह्मांडची सुरुवात म्हणजेच ‘बिग बँग’ (Big Bang) नंतर जन्मलेल्या सुरूवातीचे ‘ग्रह’ (Planet) आणि ‘आकाशगंगा’ (Galaxy) यांना पाहण्यास सक्षम आहे.

त्याचबरोबर हा टेलेस्कोप आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा टेलेस्कोप आहे. ‘जेम्स वेब टेलेस्कोप’ हा एक ‘इन्फ्रारेड टेलेस्कोप’ (Infrared telescope) आहे ज्याला १६९६ मध्य बनविण्यास सुरुवात करण्यात आली होती. या हत्वाकांक्षी टेलेस्कोपची निर्मिती अमेरिकन स्पेस एजन्सी (American Space Agency) ‘नासा’ (NASA), युरोपियन स्पेस एजन्सी (European Space Agency) ‘इ.एस.ए’ (ESE) आणि कॅनडाची स्पेस एजन्सी (Canadian Space Agency) ‘सी.एस.ए’ (CSA) यांच्या सहयोगातून करण्यात आली आहे.

सुरुवातीपासूनच या टेलेस्कोपला २००७ साली लॉन्च करण्याची योजना होती, त्यावर केवळ पाचशे मिलियन डॉलर्स (Million dollars) एवढा खर्च येणार होता पण २००५ मध्ये या टेलेस्कोपच्या डिझाइनमध्ये बरेच मोठे बदल करण्यात आले त्यामुळे याच्या लॉन्चची तारीख पुढे ढकलत गेली. बऱ्याच वर्षांच्या विलंबानंतर २०१६ मध्ये या टेलेस्कोपचे काम पूर्ण करण्यात आले त्यानंतर त्याचा बनविण्याचा खर्च दहा मिलियन डॉलर्स इतका झालेला होता. काम पूर्ण झाल्यानंतर या टेलेस्कोपच्या २०१९ पर्यंत बऱ्याच चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी याला मार्च २०२१ मध्ये लॉन्च करण्याची योजना होती परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे (Technical difficulties) लॉन्चची तारीख डिसेंबर २०२१ ठरवण्यात आली.

या टेलेस्कोपला बनविण्यामागे १४ देशांतील १२०० वैज्ञानिक (Scientist), इंजीनीअर (Engineer) आणि टेक्निशियन्स (Technician) या सगळ्यांची मेहनत आहे. जेम्स वेब टेलेस्कोपचं ध्येय्य हबल टेलेस्कोपची जागा घेणे नाही तर दोघांची कामे वेगवेगळी आहे ज्यामध्ये ब्रह्मांडाच्या वेगवेगळ्या ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्टरम’मध्ये (Electromagnetic spectrum) शोध करणे आहे. जेम्स वेब टेलेस्कोप मुख्यतः अंतराळातील ‘अल्ट्राव्हायोलेट स्पेक्टरम’ (Ultraviolet spectrum) मध्ये शोध करणार आहे. नव्या टेलेस्कोपच्या मिररचा आकार मोठा असल्याने अंतराळात जास्तीतजास्त लांब पाहण्यात सक्षम आहे. टेलेस्कोपचा ६.५ मीटरचा मिरर सोने (gold) व बरेलियमने (Beryllium) बनविलेला आहे जे इन्फ्रारेड लाइटच्या (Infrared light) अभ्यासात मदतीचे ठरतात.

यात हाय क्वालिटीचे (High quality) सेन्सेटिव्ह कॅमेरे (Sensitive cameras) आहे या कॅमेर्यांना सूर्याच्या किरणांपासून वाचविण्यासाठी पाच मोठे ‘सनशिल्ड’ (Sunshield) लावण्यात आले टेलेस्कोपमध्ये चार मुख्य साइन्टिफिक इन्स्ट्रोमेन्ट्स (Scientific Instruments) जोडलेले आहे ज्यात ‘नियर इन्फ्रारेड कॅमेरा’ (Near infrared camera), ‘नियर स्पेक्टरोग्राफ’ (Near spectrograph), ‘मिड इन्फ्रारेड इन्स्ट्रोमेन्ट’ (Mid Infrared Instrument) आणि फाईन गायडन्स सेन्सर’ (Fine guidance sensor) हे आधुनिक साधने अतिशय संवेदनशील असल्याने टेलेस्कोपची हजारो किलोमीटर लांब एक मधमाशी सारखी लहान जीवाची ‘हिट सिग्नेचर’ (Hit signature) पकडण्याचीही क्षमता आहे.

‘जेम्स वेब टेलेस्कोपला पृथ्वीच्या (Earth) ऑर्बिटमध्ये ‘लॅबरेज पॉइंट-२’ (Laberage Point-2) (L-2) मध्ये स्थपित करण्यात आले आहे. ‘लॅबरेज पॉइंट-२’ हा पृथ्वीपासून १.५ मिलियन किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वीपासून एवढ्या लांब अंतरावर असल्यामुळे जेम्स वेब टेलेस्कोपची (James Webb Telescope) हबल टेलेस्कोपप्रमाणे (Hubble Telescope) दुरुस्ती (Repair) करता येणार नाही हि एक यामधील मोठी त्रुटी आहे.

‘जेम्स वेब टेलेस्कोपच्या मदतीने आपण १३.५ बिलियन वर्ष मागे आपल्या ब्रह्मांडची (universe) सुरुवात म्हणजेच बिगबँग (Big Bang) नंतर जन्मलेल्या ग्रह (planet) आणि आकाशगंगा (galaxy) यांना पाहण्यापर्यंत सक्षम होवू शकते. या सुरुवातीच्या ग्रह आणि आकाशगंगा त्यांचा शोध आणि अभ्यास करून त्यांची निर्मिती, प्रगती व नष्ट होण्यापर्यंतची माहिती मिळवू शकतो. जर आपल्याला आपल्या ब्रह्मांडची सुरुवातिला जन्मलेल्या ग्रह आणि आकाशगंगा यांना बघायचे असल्यास ‘लोअर वेव्हलेन्थ’ (Lower wavelength) मध्ये छायाचित्रे काढावी लागतील. त्यामुळे या टेलेस्कोपमध्ये इन्फ्रारेड कॅमेरे (Infrared cameras) लेण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर त्याच इन्फ्रारेड टेलिस्कोप (Infrared telescope) सहजतेने गॅस (gas) आणि धुळीच्या (dust) मागे असलेले ग्रह व स्पेसबॉडीजला (Spacebodies) पाहणे आणि त्यांचे अभ्यास करण्यासाठी सक्षम आहे. ज्यामुळे आपण आपल्या ब्रह्मांडच्या ज्या जागेत आपण आज पर्यंत जाऊन अभ्यास करू शकलो नाही तेथे बघून शास्त्रज्ञांना शोध व विविध ग्रहांवरील वातावरण आणि तेथे जीवनसृष्टी आहे कि नाही याचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या