असे साकारले राज्यातील पहिले वारकरी भवन

असे साकारले राज्यातील पहिले वारकरी भवन

अशोक महाराज घुमरे

महाराष्ट्रातील (Maharashtra) पहिले वारकरी भवन (Varkari Bhawan) सिन्नरमध्ये (Sinnar) साकारले गेले आहे. या "अहिल्याबाई होळकर वारकरी भवनात संत निवास, संत साहित्याचे ग्रंथालय आहे. निसर्गरम्य परिसरात हे भवन साकारले गेले आहे. माजी आ. राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या संकल्पनेतून नगर परिषदेने याची उभारणी केली आहे....

वारकरी भवनात वारकऱ्यांचे अधिष्ठान असलेल्या भगवान श्री पांडुरंग अर्थात श्री विठ्ठलाचे सुंदर असे मंदिर उभे राहीले असून या मंदिरात पंढरपूरमधील पांडुरंगाचा जो विग्रह विटेवर उभा आहे, अगदी तशीच हुबेहूब मूर्ती, मन प्रसन्न करणारी, बघता क्षणीच श्रम, वेदना, दुखः हरण करून चंचल मनाला श्रद्धा युक्त व भक्तिमय बनवून भगवत भक्तीत लीन करणारी साकारण्यात आली आहे.

भगवान कृष्ण गीतेच्या नवव्या अध्ययातील या श्लोकाद्वारे हेच सांगतात ,हे महात्मा हो सतत माझे कीर्तन करा, दृढ निश्चयाने प्रयत्न करा आणि मला वंदन करीत भक्ती भावाने नित्य माझी उपासना करा.

गेल्या दीड दोन वर्षांत वारकरी आपले आराध्य दैवत भगवान श्री. पंढरीरायांचे दर्शन करू शकले नाहीत. सिन्नरमधील या वारकरी भवनमधील श्री मूर्तीचे चरण स्पर्शाने भक्त नक्कीच आनंदीत होतील हा विश्वास वृद्धिंगत होत आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या महिला नगर अध्यक्षा स्व. मथुराबाई वाजे यांनी आपले नातू राजाभाऊ यांच्यांसाठी त्या काळात काही निधी बँकेत ठेवला होता. त्यातून वृद्धी होत गेलेल्या निधीतून वारकरी भवनातील संत निवासाचे काम केले.

तसेच नवीन पिढीला आध्यात्मिक ग्रंथाची नीटपणे ओळख व्हावी यासाठी अभ्यासिका उभारण्यात येत आहे. या अभ्यासिकेचे "स्व.श्रीमती मथुराबाई शंकरराव वाजे अभ्यासिका " असे नामकरण करावे असे आम्हा सर्व वारकऱ्यांना सूचित करावेसे वाटते .

आध्यात्मिक कार्यातील महान योगदान देणाऱ्या शिवभक्त देवी आहील्याबाई होळकरांचे नाव या वारकरी भवनास दिल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. आत्म्याचा विचार केल्यास आत्म्याला जन्म मृत्यू नाही. जन्म मृत्यू हे या भौतिक जगातील मनुष्याच्या देहाला लागू आहेत.

वारकरी भवनाची संकल्पना नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल. या वारकरी भवनाद्वारे सतत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सालभर चालावे ही मनीषा आहे. दर शुद्ध एकादशीला तालुक्यातील जुने-नवे कीर्तन करांनी आपली कीर्तन सेवा द्यावी व वद्य एकादशीला भजनी मंडळांनी आपली भजनसेवा द्यावी.

उद्यापासून कार्यक्रम

३० ऑगस्टपासून येथे कार्यक्रम सुरु होणारा आहे. १ सप्टेंबरपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहे. १ सप्टेंबर रोजी पांडुरंगाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन न्यायवेदांतचार्य श्री १००८ देवानंदगिरीजी महाराज, सांगवी यांच्या हस्ते होईल व त्याच दिवशी सकाळी १० ते १२ वा. रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे हरीकीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com