Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉगअध्यात्मिक स्वातंत्र्य - शारीरिक बंधनातून मुक्ती

अध्यात्मिक स्वातंत्र्य – शारीरिक बंधनातून मुक्ती

संत राजिन्दर सिंह जी महाराज

15 ऑगस्ट भारतामध्ये स्वातंत्र्यदिन या रूपात साजरा केला जातो. जसे की संपूर्ण विश्वभरात प्रत्येक देशाचा स्वातंत्र्यदिन या गोष्टीचे प्रतीक आहे की, एक देश स्वतःला स्वतंत्र घोषित करतो, याच बरोबर स्वतंत्रता आपल्या आत्म्याचे स्वातंत्र्य आणि मुक्ती यांकडे सुद्धा संकेत करते. जसे की, एक देश दुसऱ्या देशाच्या अधीन असतो तसेच आपला आत्मा सुद्धा मन आणि शरीराच्या बंधनांमध्ये कैद झालेला आहे.

- Advertisement -

आपल्यापैकी बहुतांश लोक स्वतःला केवळ शरीर आणि मन समजतात. परंतु काही लोक असेही आहेत जे हा अनुभव करतात की या भौतिक जीवना व्यतिरिक्त आपला एक अध्यात्मिक पैलू सुद्धा आहे, जो की आपणास जीवन देत आहे आणि तो म्हणजे आपला आत्मा. ध्यानाभ्यासा दरम्यान जेव्हा आपला आत्मा एका पूर्ण सद्गुरूंच्या सहाय्यतेने देहभासावर येऊन भरारी घेतो तेव्हा तो असीम आनंद व प्रेम अनुभवतो, जे या भौतिक संसाराच्या खूप पुढे आहे.

संत, चिंतक आणि धर्मगुरू इतिहासातील पानांमध्ये वर्णन केलेल्या च्या ही पुढे त्या मंडलांचा शोध घेऊन आणखी एका निष्कर्षावर पोहोचले की, आपण शरीर व मन यापेक्षाही पलीकडे आणखी काही तरी आहोत. आपण एक आत्मा आहोत, जो अध्यात्मिक मंडलामध्ये भरारी घेऊ शकतो आणि आपल्या मूळ स्त्रोतात एकरूप होऊ शकतो, ज्यांना सृष्टीकर्ता अथवा पिता परमेश्वर या रुपात जाणले जाते. त्यांनी याची अनुभूती ध्यानाभ्यासाद्वारे घेतली. संत महापुरुष सांगतात की, जेव्हा आपण एकांतामध्ये आपले डोळे बंद करून आपले ध्यान अंतरी लावतो आणि आपल्या दिव्य चक्षूने परमात्म्याची अनुभूती घेतो तेच खरे आपले स्वातंत्र्य. आत्म्याच्या मुक्ततेची ही यात्रा तेव्हा प्रारंभ होते जेव्हा, आपल्या अंतरातील डोळे आणि कान उघडतात आणि आपण प्रभू च्या ज्योती आणि श्रुतीला ऐकू लागतो. हा अनुभव घेतल्यानंतरच आपला आत्मा देहभासावर येउन अंतरीय अध्यात्मिक मंडलांमध्ये जसे की स्थूल, सूक्ष्म व कारण मंडला ला पार करून पिता-परमेश्वराशी एकरूप होतो.फलस्वरूप आपण परमानंद,खुशी आणि दिव्य प्रेमाचा अनुभव करतो.

बाह्य स्वरूपात आपण आपापल्या देशांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करतो. भले तो भारतातील 15 ऑगस्ट चे आयोजन असो किंवा इतर अन्य देशांमध्ये वेगवेगळ्या दिनी साजरा केला जाणारा असो. चला तर आजच्या या दिवशी आपण अध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. आपण ध्यानाभ्यासाद्वारे हे ओळखू शकतो की आपले भौतिक शरीर आणि बुद्धीच्या ही पलीकडे एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आपण आत्मा आहोत जो परमात्म्याचा अंश आहे आणि वास्तवतः प्रेम, आनंद आणि शांति ने परिपूर्ण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या