Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगबौध्दपौर्णिमा विशेष : सिद्धार्थ गौतम चक्रवर्ती नाही सम्यक संबुद्धच

बौध्दपौर्णिमा विशेष : सिद्धार्थ गौतम चक्रवर्ती नाही सम्यक संबुद्धच

तथागत सिध्दार्थ गौतम बुध्द यांना समजून घेतांना त्यांना करावा लागलेला देशत्याग हे प्रकरण समजून घेणे खूप महत्वाचे आहे. त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा प्रसंग हाच आहे, याच प्रकरणा मुळे त्यांच्या जीवनाला पूर्ण कलाटणी मिळाली व आपल्या देशाचा सारा इतिहास बदलला.

तथागत सिध्दार्थ गौतम बुध्द यांना समजून घेतांना त्यांना करावा लागलेला देशत्याग हे प्रकरण समजून घेणे खूप महत्वाचे आहे. त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा प्रसंग हाच आहे, याच प्रकरणा मुळे त्यांच्या जीवनाला पूर्ण कलाटणी मिळाली व आपल्या देशाचा सारा इतिहास बदलला.

बुध्दांच्या जीवनात ही घटना नेमकी कोणत्या कारणाने घडली या संदर्भात प्रामुख्याने दोन गाथा आलेल्या आहेत. पहिली गाथा म्हणजे एक दिवशी बोधीसत्व आपल्या कपिलवस्तू नगरीत रथात बसून फेरफटका मारत असतांना त्यांना 1) वृध्द व्यक्ती, 2) व्याधीग्रस्त व्यक्ती, 3) मृत व्यक्ती, 4) संन्याशी व्यक्ती दृष्टीस पडतात. या प्रत्येका बाबत ते सारथ्याला प्रश्न करतात व सारखी त्यांना उत्तरे देतो. त्यानंतर ते राजमहालात परततात व एकांतात 1) अहंकारी माणसाला खरा मार्ग कसा दिसेल, 2) वृध्द, व्याधी-मरण च्या भावचक्रातून माणसाची कशी सुटका करता येईल, 3) अज्ञानी असणार्‍या लोकांना ज्ञानी कसे बनवता येईल. अशा विचारचक्रात अडकतात. या विचारचक्रात असतांनाच त्यांना संन्याशी व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते. आपणही संन्यास घ्यावा, सन्याशी व्हावे असा ते निर्णय घेतात व गृहत्याग करण्याकरीता ते छंदकास रथ आणावयास सांगतात.

- Advertisement -

गृहत्यागाची कल्पना धंदास आल्यानंतर तो त्यांना गृहत्याग न करण्याविषयी खूप विणवण्या करतो, पण आता कोणत्याही परिस्थितीत गृहत्याग करणारच असा निर्धार ते बोलून दाखवितात. अखेरीस छंद नि:शब्द होतो व तो रथातून बोधिसत्वांना अनोथा नदी पर्यंत सोडून येतो. या अनुशंगाची विस्तृत गाथा आहे.

ही गाथा अभ्यासतांना ही घटना बोधीसत्वाच्या वयाच्या 28 व्या वर्षी घडलेली असल्याचे दिसते कारण त्यांनी गृहत्याग केला तेव्हा त्यांचे वय 28 वर्षाचे होते. 28 व्या वर्षी प्रथमच त्यांना ही दृष्ये दिसली असतील का?; वास्तविक दरवर्षी ते वडिलाांर्फत साजरा केल्या जात असलेल्या कृषी उत्सवात सहभागी होत होते.

तेंव्हा या चार बाबी त्यांच्या नजरेत पडल्या असतीलच. तेव्हा एवढ्या वर्षांध्ये असा विचार त्यांच्या मनात का आला नाही. वास्तविक ते प्रखर बुध्दीचे होते. शाक्य संघात ते आपल्या बुध्दिकौशल्याने इतरांची मनं जिंकत असत. तेव्हा एवढ्या प्रखर बुध्दीमत्तेच्या बोधीसत्वास या प्रत्येक दृष्याबाबत सारथ्याला प्रश्न का विचारावे लागले, असे किती तरी प्रश्न निर्माण होतात. तेंव्हा निव्वळ बुध्दांना कमी लेखण्या करीता कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे असे अनेक बौध्द तत्ववेत्यांनी आपले मत नोंदविले आहे. (सिध्दार्थ गौतम बुध्द आणि त्यांचा धम्म-शोधप्रबंध पान क्र.31)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या गाथेस हास्यास्पद असल्याचे बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथात नमुद करतांना अशा घटना ह्या शेकडोंनी घडणार्‍या सर्व सामान्य घटना आहेत या घटनेचे स्पष्टीकरण स्विकारणे अशक्य आहे. असे स्पष्ट केले आहे.

दुसरी गाथा –

बोधीसत्व हे शाक्य संघाचे सभासद असतांनाची आहे. शाक्य संघाच्या नियमा प्रमाणे बोधीसत्वांना त्यांच्या वयाच्या 20 व्या वर्षी शाक्य संघाचे सभासदत्व देण्यात आले. रोहिणी नदीच्या पाण्या वरुन प्रत्येक सुगीच्या हंगामात शाक्य व कोलीय यांच्यात संघर्ष होत असे. आता हा प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्या करीता कोलीयां विरुध्द निर्णायक युध्द करण्या खेरीज पर्याय नाही असे सेनापती शाक्य संघात सभासदांना उद्देशून सांगतो. यास हरकत घेवून युवराज (बोधीसत्व) युध्दातून हा प्रश्न सुटणार नाही तर एका युध्दातून दुसर्‍या युध्दाची बिजं रोवले जातील असे सांगून या करिता शाक्यांचे 2; कोलियांचे 2 या चौघांनी मिळून 1 प्रतिनिधी निवडावा व या 5 जणांनी हा प्रश्न मिटवावा अशी सुचना करतात.

सेनापती मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहतो व आपला ठराव मतास टाकतो. मोठ्या मतांनी सदरचा ठराव संत होतो. तेव्हा युध्दाची तयारी म्हणून प्रत्येक तरुणास सैन्यात दाखल होण्याचे तो आवाहन करतो. तेव्हा युवराज सैन्यात दाखल होण्यास स्पष्ट नकार देतात. तेव्हा सेनापती युवराजांच्या (तथागत सिध्दार्थ गौतम बुध्द) कुटूंबावर बहिष्कार टाकण्याची, कुटूंबाची संपूर्ण जमीन जप्त करण्याची वा तुला देहदंड दिल्या जाण्याची भाषा वापरतो व हा संघाचा नियम आहे. अशी पुष्टी जोडतो.

आपल्यामुळे कुटूंबावर एवढे संकट येवू नये म्हणून ते गृहत्यागाचा निर्णय घेतात. घरी आई, वडील, पत्नी यांना आपल्या गृहत्यागाची कल्पना देतात. या प्रसंगी कुटूंबातील सर्व सभासद रडतात, त्यांची समजूत काढतात पण ‘माझा हा निर्णय अंतिम आहे’ असे ते ठामपणे सांगतात. पत्नी यशोधरा या प्रसंगी अत्यंत धिरोदात्यपणे युवराजांना सांगते की, “ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण घेतलेला निर्णय योग्यच असेल. तेंव्हा आपण समस्त मानवाच्या कल्याणाचा मार्ग शोधून काढाल याची मला खात्री आहे.” अखेरिस दुसर्‍या दिवशी ते आई-वडील-पत्नी-मुलगा राहूल या सर्वांना भेटून गृहत्याग करतात, त्यांचा सारथी त्यांना अनोभा नदी पर्यंत सोडतो. पहिली गाथा ही हास्यास्पद जशी आहे तशीच बुध्दांना कमी लेखून त्यांची अवहेलना करणारी आहे. तर ही दुसरी गाथा विचारात घेता पहिल्या गाथे पेक्षा ही गाथा काहीशी अधिक भयंकर वाटते. यातून शाक्यांच्या मानसिकतेची, बुध्दांच्या अवहेलनाचीच साक्ष पटते.

मा. शं. मोरे यांनी त्यांच्या ‘बुध्द धम्माचे संदेश वाहक’ पान क्र.21 वर नमूद केले आहे की, शाक्य लोक फार तापट व गर्विष्ट होते. त्यांनी रोहिणी नदीच्या पाण्यावरुन युध्द पुकारले, कोसलच्या पसेनदी राजाने शाक्य कुळातील मुलीला पट्टराणी करण्याचा मानस बोलून दाखविला (गौतम बुध्दांविषयीच्या प्रेमातून) तेंव्हा शाक्यांनी कुलाभीमानातून सरळ नकार न देता दासीकन्या वासभक्षत्रीया हिला शाक्यकुलातील दाखवून विवाहास परवानगी देण्याचे ठरविले. या व अशा अनेक गर्विष्ठ पणाचे उदाहरणं देता येतील. याच पुस्तकात मोरे पुढं लिहितात की, बुध्दत्व प्राप्त झाल्या नंतर, जेव्हा भगवान बुध्द शाक्य देशात आले तेंव्हा शाक्यांध्ये दोन तट पडले होते. यातील एका गटाने तथागतांना प्रणिपात करण्यास/त्यांचे मोठेपण मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. (पा.क्र.22)

बोधीसत्वांचा जन्म झाल्या नंतर त्यांना बघण्यासाठी जवळजवळ एका मागोाग एक असे 39 ब्राह्मण पंडीत येऊन गेले. त्या सर्वांना हा बालक पुढं एकतर महान चक्रवर्तीराजा होईल नाहीतर सम्यक संबुध्द होईल. या संबंधीची 32 लक्षणं बोधिसत्वांच्या अंगावर दिसून आले.

चक्रवर्तीराजाचे व सम्यक संबुध्द विषयीची लक्षणे

कदाचित सारखेच असतील असे आपण समजू या. पण तथागत सिद्दार्थ गौतम बुध्द यांना समजून घेतांना आपल्याला हे सुध्दा समजून घेतले पाहीजे की, त्यांनी चक्रवर्तीराजा होण्याच्या अंगाने कोणतीच कृती केली नाही. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी या संदर्भाने एकही कृती केल्याचे दिसत नाही. वयाच्या 20 व्या वर्षी ते रितसर शाक्य संघाचे सभासद झाले. 8 वर्षे ते केवळ सभासदच राहिले. चक्रवर्ती राजा हा आपले साम्राज्य विस्तारण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो, युध्द करणे हा त्यांचा राजधर्म असतो, 8 वर्षात युवराज गौतम यांनी या अनुषंगाने काहिही केलेले नाही.

उलट त्यांनी युध्दास प्रचंड विरोध करुन एक युध्द दुसर्‍या युध्दाला आमंत्रण देतो असे सांगितले. या 8 वर्षात शाक्य संघ कोसल राजाच्या अधिपत्याखाली आला होता. युवराजांनी या 8 वर्षात संघातील कोणतेही मोठे पद जसे महाराज, महामंत्री, सेनापती मिळविले नाही. एक युवराज असतांनाही एक सेनापती त्यांना त्यांच्या कुटूंबावर बहिष्कार घालण्याची, जमिन जप्त करण्याची, प्रसंगी युवराजास देहदंड करण्याची भाषा वापरतो तरीही ते थोडेही डगमगत नाहीत, चिडत नाहीत उलट अतिशय नम्रपणे, विनयतेने, शांततेने स्वता:च सेनापतिस “असे असेल तर या वरिल उपाय देशत्याग हाच असून देशत्याग करण्याची माझी तयारी आहे” असे सांगतात, राजा वा चक्रवर्ती राजा असे विधान करणार्‍याला कठोरात कठोर शासन कसे होईल याचा विचार करतो पण इथं चक्रवर्तीराजाची लक्षणं असणारे युवराज देशत्यागाच्या माध्यमातून स्वत:लाच दंडित करुन घेतात.

एवढा विनम्र भाव खचितच एखाद्या महापुरुषात असतो. या युवराजाच्या अंगावर चक्रवर्तीराजाचे वा सम्यक संबुद्धाचे 32 लक्षणं आहेत. ही बाब त्यांच्या अगदी लहानपणापासून चर्चेत होती. तेंव्हा शाक्यांना व शाक्य संघाला त्यांच्या विषयी प्रचंड अभीमान असणे आवश्यक होते, संघानेच त्यांना संघातिल मोठ्यातले मोठे पद देणे आवश्यक होते. पण तसे नकरता शाक्य त्यांना अपमानीत, दंडित करतात ही बाब क्लेशदायकच आहे. गृहत्याग करुन युवराज जेंव्हा राजगृहात येतात तेंव्हा तिथं राजा बिंबिसार त्यांची भेट घेतो व ङ्गङ्घतू जवान आणि तरुण आहेस; मनुष्याच्या प्रथम वयातला आहेस, तुझी कांती कुलीन क्षत्रिया सारखी अत्यंत रोचक आहे, तेंव्हा तू हत्तींचा समुदाय बरोबर घेऊन माझ्या सेनेला शोभा आणफफ (भगवान बुद्ध लेखक धर्मानंद कोसंबी, पान 89) असे म्हणतो.

शाक्य संघा बाहेरील एक राजा त्यांचे महात्म्य ओळखून सेपानतीची संधी देऊ करतो. पण शाक्य संघ त्यांना दंडित करु इच्छितो हा विरोधाभास आपण लक्षात घेणे महत्वाचे आहे. बोधीसत्व हे लहानपणा पासूनच समाधी लावून बसत असत. राजमहालात असतांनाच 7 वर्षे त्यांनी खूप कमी अन्न सेवन करुन ते समाधीकरीत. मात्र एवढे कमी अन्न खाऊन काही उपयोग नाही. असे त्यांना कळून चुकले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या