Friday, April 26, 2024
Homeब्लॉगबौध्दपौर्णिमा विशेष : भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार

बौध्दपौर्णिमा विशेष : भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार

गौतम बुद्धाने हिंदू धर्मात सिद्धार्थाच्या रूपात जन्म घेतला.त्यांनी जेव्हा त्यांनी गृहस्थ जीवनात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी पत्नी व मुलाचा त्याग करून कौटुंबिक मोहमाया पासून अलिप्त होऊन बौद्ध धर्माचे प्रवर्तक झाले. त्यांनी करुणा- सत्य- आणि अहिंसेला आपल्या जीवनाचा आधार मानले. आणि लोकांनाही याच मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यामुळे अनेकांनी आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला.गौतम बुद्धांना हिंदू धर्मात भगवान विष्णूचे रुप मानले गेले आहे.

विष्णूच्या दशावतारातील नववा अवतार त्यांना मानले जाते. म्हणून त्यांना भगवान बुद्ध असे म्हटले जाऊ लागले.भगवान बुद्ध म्हणतात मानवी जीवन हे दुःखमय आहे. दुःखाची निर्मिती त्रुष्णेतून होते .वासना. इच्छा, आवड, आसक्ती, आणि म्हणून या त्रुष्णेवर नियंत्रण ठेवायला पाहिजे. मानवी व्यवहारांच्या मुळाशी चार आर्य सत्य आहेत. दुःख, त्रुष्णा, निरोध, प्रतिपद. दुःख निवारणा साठी सदाचाराचा मार्ग, अष्टांग मार्ग आहेत. या गोष्टीच्या पालनाने मानवाचे जीवन सुखमय होते. कर्म ,प्रेम, आनंद , शांतता याविषयी भगवान गौतम बुद्धाचे सुंदर आणि जीवन सुखी करणारे विचार आहेत.

कर्माविषयीचा विचार

- Advertisement -

* लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म आहे.पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागतात हे तुमचे कर्म आहे.कोणाशीही वागतांना चांगले वागा. चांगलेच फळ मिळेल.

* दयाळूपणा दाखवा.प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे का बघा.तपासून पहा.दुसर्‍याला माफ करण्याची क्षमता ठेवा.

* तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे कर्मच जबाबदार आहे,एक दिवस तुमच्या लक्षात येईल. कर्माची फळ तुम्हाला ईथेच भोगावी लागतात.

* तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला. कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करुन घेऊ नका.

* नेहमी चांगला विचार करा.दुसर्‍या बरोबर चांगले वागा,चांगले बोला.परिणामी तुमचे चांगलेच होईल.

* आपण काय विचार करतो,त्याप्रमाणे माणूस म्हणून आपण जगतो.आपण आपल्या विचारांनीच मोठे होत असतो.आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा.

* कोणाचा सूड उगवू नका.आपल्या कर्माला त्याचे काम करु द्या.कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही.

* चित्त हे पाण्या प्रमाणे आहे.थार्‍यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही.पाणी शांत असत तेव्हा तळही दिसतो.

* दुःख हे अजिबात टाळता येण्या सारखे नाही.पण त्यात किती रमून रहायचे ते आपल्या हातात आहे.पर्याय आपणच ठरवायचा आहे.

* रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो.आपण जे काही करतो ते आजच्या दिवसा पुरते ठेवा.अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल. आनंदा संबधी विचार.

* एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्या उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे.तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार.वाटल्याने तो कधीच कमी होत नसतो.

* एखाद्याची प्रशंशा केल्याने दोघांचाही आनंद वाढेलच. पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल.

* आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही.तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे.

* दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करु शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे.

* तुम्ही कोण आहात वा तुमच्याकडे काय आहे,यावर आनंद अवलंबून नाही,तर तुम्ही नक्की काय विचार करता,आणि कृती करता,यावर तुमचा आनंद अवलंबून आहे.

*शिस्तबध्द मन हे नेहमी आनंददायी असंत.

* जेव्हा सर्वकाही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता, हाच खरा आनंद आहे.

* साठवण्यात काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे.

* कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो.

* आनंद म्हणजे प्रवास आहे.प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही

प्रेमा विषयी विचार

* ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे,त्यालाच माणसं सोडून जाण्याच त्यांच्या नसण्याच दुःख आहे.पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नाही.

* जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्यास शिका.

* तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुस-याला दुखावू शकत नाही. कारण तुम्हांला नक्की त्याचा काय त्रास असतो याची पुरेपुर कल्पना असते.* प्रेमाचा मार्ग ह घ्यावे ह्रदयात असतो. तो इतर ठिकाणी शोधू नका.

* प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ.हे दोन जीव एकत्र आले की परिपूर्ण होतात.प्रेमाने जग जिंकता येते.

* कोणाचाही द्वेष करु नका.द्वेषाने आपलेच नुकसान होणार. त्यापेक्षा प्रकाश प्रेम करा त्याने सर्वकाही चांगलेच होईल.

शांततेच्या बाबतीत विचार

* चांगल्या शब्दाने मनाला शांतता मिळते. त्यामुळे नेहमी चांगलेच बोला.

* शांतता ही नेहमी मनातूनच येत असते.त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही.

* जे संतापजनक विचारा पासून दूर रहातात त्यांना नेहमीच मानसिक शांतता मिळते. कारण त्यांचे मन शांत असते.मनात विचारांचे काहूर माजलेले नसते.

* नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत रहा.म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्हीही गोष्टी मिळतील.

* आपल आयुष्य हे दुस-याच्या आयुष्याशी तुलना करीत राहिल्यास तुम्हाला मनःशांती कधीच मिळणार नाही.आपल्याकडे जे आहे त्यात आनंदाने रहा.ट्ठ एक क्षण एक दिवस बदलू शकतो ।एक दिवस आयुष्य बदलू शकतो। आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो.वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले होते .

तेथे त्यांनी अखंड एकोण पन्नास दिवस तपश्चर्या केली तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला. सिद्धार्थ यांना महात्मा बुद्ध म्हटले जाऊ लागले. ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते झाड म्हणजे बोधिवृक्ष आणि त्या झाडाच्या आसपासचा परिसर म्हणजे बोधगया म्हणून ओळखले जाऊ लागले .बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना सगळ्यांनी भगवान गौतम बुद्धाच्या या प्रेरणादायी विचारांचा अभ्यास व वाचन नक्कीच करायला हवे तरच खर्‍या अर्थाने आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या