निःस्वार्थ शिवशाहीर

निःस्वार्थ शिवशाहीर

नाशिक | अविनाश धर्माधिकारी

बाबासाहेबांकडून ‘शिवचरित्र’ (Shivacharitra) ऐकताना, त्यांनी लिहिलेलं ‘शिवचरित्र’ वाचताना, ‘जाणता राजा’ (janta raja) हे महानाट्य (Mahanatya) पाहताना मनात जी बाबासाहेबांची प्रतिमा तयार झाली होती, ती त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख झाल्यानंतर, त्यांचा सहवास लाभल्यानंतर, त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद (Love and blessings) लाभल्यानंतर आणखी उजळली. समाजातल्या अनेक निःस्वार्थ कामांना तितक्याच निःस्वार्थपणे प्रचंड मदत (help) करणारे बाबासाहेबसुद्धा जवळून दिसले.

इयत्ता चौथीतून पाचवीत जाताना मी बाबासाहेबांचं ‘राजा शिवछत्रपती’ (raja chatrapati) पहिल्यांदा वाचलं. ते वाचून आता अर्ध्या शतकाहून अधिक काळ लोटला, तरीही अजून ‘राजा शिवछत्रपती’ची जादू मनावरून उतरलेली नाही. शिवाजी महाराजांचं (shivaji maharaj) हे चरित्र हाती लागलं आणि खाली न ठेवता ते झपाटल्यासारखं वाचून पूर्ण केलं, हे आजही माझ्या लक्षात आहे. एक प्रकारे बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांची संगत, त्यांचं मार्गदर्शन (Guidance) तिथून चालू झालं. पुढचं शिक्षण मी इतिहास विषयात (subject of history) घेतलं.

त्यावेळी मराठ्यांचा इतिहास (History of Marathas) अभ्यासाला होताच. इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करतानासुद्धा वेळोवेळी ‘राजा शिवछत्रपती’ पुन्हा-पुन्हा वाचत राहिलो. त्यातून शिवाजी महाराजांच्या अथांग व्यक्तिमत्वाचे नवनवे अर्थ, वेळोवेळी सापडत गेले, अजूनही सापडतात. आयएएस (IAS) होण्यापूर्वीच्या वर्षांमध्ये बाबासाहेबांच्या ‘शिवचरित्र’ व्याख्यानमाला ऐकल्या. त्या रात्रीच्या वेळी होत असत. तेव्हा रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानाकडं अक्षरशः हजारो नागरिकांचे थवे व्याख्यानासाठी (Lecture) निघालेले असायचे.

बाबासाहेब जेव्हा अत्यंत तपशिलात जाऊन ‘शिवचरित्र’ सांगत असत, तेव्हा आम्ही ऐकणारे ‘शिवकालात’ जात असू, साक्षात शिवाजी महाराज समोर उभे ठाकत. काही वर्षांनंतर बाबासाहेबांनी ’जाणता राजा’ हे महानाट्य रंगमंचावर (Theater) आणलं. खुल्या रंगमंचावर केलं जाणार नाटक (Drama). त्या निमित्तानं शिवाजी महाराज आणि शिवकाल डोळ्यासमोर उभे राहिले. ‘शिवकालात’ लोक कपडे कसे घालत, कसे बोलत, इथंपासून ते संगीत, लोकसंगीत, पोवाडा (powada), ओवी, अभंग या सर्व परंपरेसहित साक्षात शिवकालीन महाराष्ट्र (Shivkalin Maharashtra) समोर उभा राहत असे.

या काळात मग बाबासाहेबांशी ओळख झाली. लांबून त्यांच्याकडून ‘शिवचरित्र’ ऐकताना, त्यांनी लिहिलेलं ‘शिवचरित्र’ वाचताना, ‘जाणता राजा’ हे महानाट्य पाहताना मनात जी बाबासाहेबांची प्रतिमा तयार झाली होती, ती त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख झाल्यानंतर, त्यांचा सहवास लाभल्यानंतर, त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद लाभल्यानंतर आणखी उजळली.

समाजातल्या अनेक निःस्वार्थ कामांना तितक्याच निःस्वार्थपणे प्रचंड मदत करणारे बाबासाहेबसुद्धा त्यावेळी जवळून दिसले. त्यांनी विविध सामाजिक कामांना अक्षरशः कोट्यवधी रुपयांची मदत केली असेल. पण कुठंही स्वतःच्या नावाचा आग्रहसुद्धा त्यांनी धरला नाही. बाबासाहेबांची अशी मदत ज्यांना मिळाली, त्यात अर्थातच चाणक्य मंडल परिवार आहे. एके वेळी त्यांनी ‘जाणता राजा’चे दहा प्रयोग, मी हाती घेतलेल्या छोट्याशा शैक्षणिक कामाला आर्थिक मदत म्हणून दिले होते. या मदतीच्या निरपेक्ष बाबासाहेबांबद्दल माझ्या मनात नितांत कृतज्ञता आहे, ती शाश्वत आहे.

मला वाटतं की बाबासाहेबांनी लिहिलेलं ‘शिवचरित्र’ आणि महानाट्य ‘जाणता राजा’ यांचं इंग्रजीसहित भारतातल्या आणि जगातल्या इतर भाषांमध्ये देखील भाषांतर व्हायला हवं. शिवाजी महाराज हे मानवी इतिहासातलं एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व (Unique personality) आणि त्यांचं कार्य आहे. संपूर्ण भारताचे ते राष्ट्रपुरुष आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या विद्यापीठांमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास व्हायला हवा.

बाबासाहेबांच्या जाण्यानं झालेली दुःख तीव्र आहे. यानिमित्ताने आपण सगळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास, अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर नेण्याच्या कामाला लागूयात, अशी प्रार्थना करतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com