लहान वयांपासून विद्यार्थ्याना ध्यान शिकवा

लहान वयांपासून विद्यार्थ्याना ध्यान शिकवा
संत राजिंदर सिंह जी महाराजSant Rajinder Singh ji Maharaj

संत राजिंदर सिंह जी महाराज

पूर्वेकडील देशांमध्ये हे मानलं जात होतं की मनुष्याच्या जीवनात तीन पैलु असणे आवश्यक आहे. ते म्हणजे शारीरिक-मानसिक आणि अध्यात्मिक. आपण बौद्धिक आणि शारीरिक स्तरावर खूप प्रगती केली आहे. परंतु अध्यात्म बाबत आपल्याला याचा विसर पडलेला आहे.

नैतिक शिक्षणाचा अर्थ असा की आपण असे मानव घडवूया, जे प्रेम, दया, सत्य आणि नम्रता या गुणांनी युक्त असतील. याकरिता आपण दर्शन अकादमीच्या विद्यालयांची स्थापना केली आहे. या विद्यालयांमध्ये दररोज अध्यात्म आणि नैतिक शिक्षणाचा एक तास असतो. या विद्यालयांमध्ये विद्यार्थी अन्य देशातील लोकांविषयी माहिती जाणून घेतात. येथे विविध धर्मांचे तुलनात्मक अध्ययन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना अनेकतेतून एकता हा संदेश प्राप्त होतो. त्यांना शांत बसून ध्यान एकाग्र करण्याचे सांगितले जाते. जेणेकरून ते आपल्या अंतरी शांती प्राप्त करू शकतील.

ध्यानाच्या या शांतीपूर्ण तासाला विद्यार्थ्यां समोर आपल्यातील आत्मिक खजिना शोधण्याचे लक्ष्य असते. ते शरीर व मनाने पूर्णतः जागरूक असतात. ध्यानामुळे त्यांना आपल्या खऱ्या आत्मिक स्वरूपाला जाणण्यासाठी मदत होते. याव्यतिरिक्त अहिंसा, सत्य, नम्रता, पवित्रता, करुणा आणि निष्काम सेवा इत्यादी सदगुणांना ते आपल्या जीवनात धारण करतात.

आपल्या आत्मिक स्वरूपाला जाणल्यानंतर विद्यार्थ्यांना असे दिसून येते की सर्व लोकांमध्ये प्रभूची ज्योती आणि त्याचे प्रेम विद्यमान आहे. हा अनुभव त्यांना सहनशील आणि सर्वांवर प्रेम करणे शिकवितो. असे ज्ञान प्राप्त झाल्यावर ते सर्वांवर प्रेम करायला शिकतात.

ध्यानाच्या वेळी आपण डोळे बंद करून अंतरी निरीक्षण करतो. जर आपण एकाग्रतेने मन शांत करायला शिकलो तर आपण या प्रक्रियेने आपल्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग करू शकतो. याचा परिणाम असा होतो की आपण जे काही शिकतो, त्याला चांगल्या प्रकारे समजून घेतो. ध्यानाने बौद्धिक योग्यता वाढण्या बरोबर, आपले आरोग्य चांगले होते कारण आपण तणावातून मुक्त होतो. आपण अनावश्यक आक्रोशापासून वाचतो आणि या जीवनाच्या कठीण कालावधीचा आणि तणावांचा चांगल्या प्रकारे सामना करू शकतो.

यासाठी जर लहान वयांपासून विद्यार्थ्याना ध्यान आणि एकाग्रता करण्याची पध्दत शिकविली तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बाबतीत त्यांचा चांगला विकास होईल. जर जगातील सर्व शिक्षण संस्थानी ध्याना-अभ्यास आणि अध्यात्मिक शिक्षणाला आपल्या पाठ्या-पुस्तकांत स्थान दिले, तर आजपासून पंधरा, वीस किंवा पंचवीस वर्षो नंतर, आपण असे मानव घडवू की जे प्रेम आणि दयाभावाने ओतप्रत असतील. अशा एका सुर्वण युगाची सुरुवात होईल, ज्यातील लोक अधिक संचयावर लक्ष न देता दुसऱ्याच्या उपयोगी पडतील. हे असे सुवर्ण युग असेल, ज्यात सृष्टीतील प्रत्येक जीवाची काळजी घेतील. जर बौद्धिक आणि शारीरिक शिक्षणा बरोबर लहान मुलांना नैतिक शिक्षण दिले, तर हे विश्व शांती आणि आनंदाचे स्थान होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com