Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगविचार पूर्वक मित्र निवडा

विचार पूर्वक मित्र निवडा

संत राजिन्दर सिंहजी महाराज

काही ठिकाणी लोकं एका उच्च दर्जाच्या गुलाबासोबत कमी दर्जाच्या गुलाबाची रोपे लावतात. हे अशा कारणामुळे केलं जातं की कमी दर्जाच्या गुलाबाचा स्व पारियागीभवन बरोबर होऊ नये. ह्या धारणेला ही रूपरेखा दिली आहे. जेणेकरून पारियागीभवन प्रक्रिया उच्चतर दर्जाच्या गुलाबांबरोबर होईल आणि कमी दर्जाच्या गुलाबांचा स्तर वाढू शकेल.

- Advertisement -

हा नियम, आपल्या जीवनात पण आपलं मार्गदर्शन करू शकतो. असं म्हटलं जातं कि मनुष्याची ओळख तो कोणाच्या संगतीत राहतो या वरून होत असते . जर आपल्याला धनवान बनायचं आहे तर आपल्याला धनवान लोकांच्या सोबत राहायला पाहिजे. असं करून आपण त्यांच्या सारखा विचार करायला आणि त्यांच्या सारखा कामे करायला लागतो आणि कदाचित आपण पण धनवान होऊ शकतो.

जर आपल्याला धावपटू बनायचं आहे तर आपल्याला धावपटून सोबत राहायला पाहिजे. अशा प्रकारे आपण त्यांच्या सारखे जीवन जगायला प्रेरीत होऊ.

आपल्याला दिसून येईल कि त्यानंतर आपण जास्त कसरत करीत आहोत, स्वतःला बलशाली करत आहोत, आहारावर जास्त लक्ष्य देत आहोत आणि धावायचा सराव करीत आहोत. जर आपल्याला लेखक बनायचं आहे तर आपल्याला लेखकांच्या सोबत राहायला पाहिजे आणि त्या कलेचा अनुकरण करायला प्रेरणा घेतली पाहिजे.

अशा प्रकारे जर आपण आत्मिक विकास करू इच्छितो, तर आपल्याला अश्या लोकांची सोबत करायला हवी ज्यांचा आत्मिक विकास झालेला असेल. अशा लोकांच्या सोबतीत आपण आत्मा-परमात्मा विषयी विचार विमर्श करण्यास अधिक वेळ देऊ, आध्यात्मिक विषयांवर बोलू आणि आध्यात्मिक चिंतन करू. अशा लोकांच्या संगतीत राहिल्याने आपण पण ध्यान साधना करायला लागू. जर आपण सदाचारी जीवन जगणाऱ्या आणि सद्गुणांना महत्व देणाऱ्या सहवासात राहिलो तर आपण देखील तसेच जगायला लागतो.

आपल्याला आपल्या मित्रांवर लक्ष द्यायला हवे. काय आपण असे मित्र निवडले आहेत कि जे स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याला चुकीच्या मार्गाकडे नेत आहेत? आपण असे मित्र निवडले आहेत जे आपल्याला आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी मदत करतात? जेव्हा आपल्याला उब हवे असते, तेव्हा आपण आगी जवळ बसतो.

जेव्हा आपल्याला गार व्हायचं असतं, तेव्हा आपण बर्फाची लादी जवळ किंवा वातानुकूल (AC) जागी बसतो. तसेच जर आपण आध्यात्मिक जीवन जगू इच्छितो, तर आपण आध्यात्मिक प्रवृत्तीचे व्यक्ती शोधू , त्यांची सोबत करू शकतो.

जर सौभाग्याने आपल्याला असे सोबती मिळाले कि ज्यांनी आध्यात्मिक अनुभव प्राप्त केलेला आहे तर ती सोबत खूपच चांगली आहे. अश्या व्यक्ती मधून अध्यात्म चारी दिशां मध्ये प्रसारित होते, जेणेकरून आपले अध्यातम जागृत होऊ शकते. अश्या व्यक्ती जवळ येऊन, आपलं लक्ष्य जीवनाच्या आध्यात्मिक मूल्यांवर जातं. त्या वातावरणाचा सरळ आपल्या आत्म्या बरोबर संपर्क होतो. जो कोणी आपल्या आत्म्याला जाणतो, त्याच्याकडे आपला आत्मा खेचला जातो . त्याची चुंबकीय शक्ती आपल्याला अध्यात्मकडे खेचते आणि आपलं लक्ष्य आंतरिक आध्यात्मिक खजिन्यांकडे टिकून राहात.

जर आपण ध्यान- अभ्यासात सुधार आणू इच्छितो तर आपल्याला विचार करायला हवा कि आपण आपलं वेळ कसा घालवतो. जर आपण आपला वेळ अश्या व्यक्तींबरॊबर घालवतो, जे आध्यात्मिक रूपात जागृत आहेत आणि अध्यत्मा मध्ये रुची ठेवतात, तर आपल्याला दिसून येईल कि आपलं ध्यान अधिक एकाग्र राहतं आणि आपल्याला ध्यान अभ्यासा मध्ये यश मिळते. आपल्या मित्रांची विचारपूर्वक निवड केल्यावर आपल्याला आध्यात्मिक मार्गावर यश मिळण्यास मदत होईल .

- Advertisment -

ताज्या बातम्या