Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉग...असे मानसिक स्तरावर आपण शांत होऊ

…असे मानसिक स्तरावर आपण शांत होऊ

दर वर्षी 10 ऑक्टोबरला विश्वभरात विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस साजरा केला जातो. सध्याच्या काळात बरेचसे लोक फारच त्रस्त आणि तणावामुळे दहशत, उदासीनता आणि भीतीचा सामना करीत आहेत. काही लोकांची आर्थिक-तंगी, काही जणांना एकटेपण आणि बऱ्याच लोकांना आपल्या जीवनात आशेचा किरण नजरेस येत नाही.

आज अहिंसा दिवस : जीवनात शांती, आनंद कसा प्राप्त करावा

- Advertisement -

मनुष्याची प्रत्येक परिस्थिती भले ती चांगली असो वा वाईट, त्यावर वैज्ञानिक संशोधनाने प्रमाणित केलेले आहे की मनुष्याचा मेंदू आणि शरीर यांचा परस्पर संबंध आहे. आपली मानसिक अवस्था आपल्यात अनेक प्रकारच्या आजारांना जन्म देते, जसे रक्तचाप(ब्लडप्रेशर)चे वाढणे, पाचनक्रिया बिघडणे, डोकेदुखी, हृदयरोग, श्वासाचे रोग, मासं-पेशीची पीडा, त्वचेवर फोड येणे, तसेच यासंबंधी अनेक अडचणी निर्माण होतात.

मागील काही वर्षांपासून तणाव नष्ट करण्याकरिता लोकांचा कल ध्यान-अभ्यासाकडे वळलेला आहे. ध्यान-अभ्यासाचे शारीरिक आणि मानसिक असे बरेच फायदे आहेत. ध्यानाभ्यासाने आपल्याला दोन प्रकारची मदत होते. प्रथम, ध्यानामुळे शारीरिक दृष्ट्या आपण शांत होतो, तसेच दुसरा फायदा प्रभू प्रेम आणि परम सुखामध्ये आपण डुबकी मारू शकतो.

ध्यान अभ्यासामुळे आपल्याला कशा प्रकारे मदत होते? अध्ययनानुसार ध्यानाभ्यासाच्या वेळी मेंदुच्या तरंगांची गती (फ्रिक्वेन्सी) 5 ते 8 प्रति सेकंद असते. (साधारणतः जागृत अवस्थेत तरंगांची गती यापेक्षा दुप्पट अथवा तिप्पट असते.)

जेव्हा आपण ध्यानाभ्यास करतो तेव्हा अंतरी आपण प्रभूच्या ज्योतीचे दर्शन करतो आणि प्रभूचा शब्द ऐकू लागतो, तेव्हा आपल्याला मानसिक आणि शारीरिक विश्रामाव्यतिरिक्त तणाव कमी झाल्याने आपल्या सभोवतालच्या लोकांवर त्याचा चांगला परिणाम होतो.

चला तर! ध्यान अभ्यासाची कला शिकण्याकरीता आपण कोण्या विद्यमान सद्गुरूंच्या चरणकमळी जाऊया आणि आपल्या दिनचर्येत ध्यानाभ्यासाला समाविष्ट करूया. ज्यामुळे न केवळ मानसिक स्तरावर आपण शांत होऊ तर शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सुद्धा आपण स्वतःला बलवान बनवू, जेणेकरून या दुनियेतील दुःख-पीडा यांचा आपल्यावर परिणाम होणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या