आज प्रकाशपर्व : गुरुनानक देव पुर्ण मानव जातीचे

आज प्रकाशपर्व : गुरुनानक देव पुर्ण मानव जातीचे
गुरुनानक

-संत राजिंदर सिंह जी महाराज

भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्मिक गुरूंना महत्त्वाचे स्थान दिले आहे. एवढेच नाही, तर सर्व धर्मांमध्ये पूर्ण गुरूंना परमात्म्या समान मानले आहे. आज आपण संपूर्ण विश्वभरात गुरू नानक देव यांचे प्रकाश पर्व साजरे करत आहोत. त्यांच्यासारखे पूर्ण गुरु सृष्टीच्या सुरुवातीपासूनच या धरतीवर आपल्या आत्म्याचे पिता परमेश्वराशी मिलन घडविण्याकरीता येत राहतात. गुरू नानक देव महाराजांचा जन्म सन 1469 कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला तलवंडी शहर (पाकिस्तान) मध्ये झाला होता.

संत राजिंदर सिंह जी महाराज
संत राजिंदर सिंह जी महाराजSant Rajinder Singh ji Maharaj

गुरू नानक देव महाराज केवळ शीख धर्मासाठीच नव्हते तर ते संपूर्ण मानव जातीसाठी होते. तसेच संपूर्ण मानव जात त्यांच्यासाठी होती. नानकजीसारखे महापुरुष या धरतीवर प्रकाशाचे किरण बनून येतात आणि आपल्या अध्यात्मिक तेजाने चौऱ्यांशी लक्ष योनीमध्ये फसलेल्या आत्म्यांना पिता परमेश्वराशी एकरूप करतात. त्यांच्या मुख्य उपदेशात,"किरत करो, नाम जपो, वंड छको। " ज्याचे तात्पर्य असे आहे की,मानवाने मेहनत करून प्रभुचे नामस्मरण करावे आणि सर्वांना बरोबर मिळून-मिसळून राहावे.

संसाराविषयी गुरुवाणीमध्ये गुरू नानक देव महाराज म्हणतात की, "नानक दुखिया सब संसार’म्हणजेच, या दुनियेत प्रत्येक माणूस दुःख ग्रस्त आहे, कोणते ना कोणते दुःख सर्वांना आहे. प्रत्येक माणूस विचार करतो की,सर्वात जास्त दुःख मलाच आहे. जर नीट पाहिले असता, जेव्हा संकट येतात तेव्हा आपण प्रभूचे स्मरण करतो आणि सर्व काही ठीकठाक होते तेव्हा परत आपण आपल्या कामात मस्त होतो. हे सुखदुःखाचे चक्र आपल्या जीवनात चालतच राहते. तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो की, आपण शाश्वत सुख कसे प्राप्त करू शकतो? या संदर्भात परम संत कृपाल सिंहजी महाराज नेहमी म्हणत असत की, "सो सुखिया जीन नाम आधार" .जी व्यक्ती पिता परमेश्वराच्या नामाशी जोडली जाते ती सुखी असते. नामाशी जोडले जाण्याकरिता कोण्या पूर्ण सद्गुरूंना शरण गेले पाहिजे, जे आपणास आपल्या कृपादृष्टीने ज्योती आणि श्रुतीशी जोडू शकतात. ज्याला गुरुवाणीमध्ये नाम असे म्हटले आहे आणि ज्याचा अनुभव आपण आपल्या अंतरी ध्यान अभ्यासाद्वारे करू शकतो.

ध्यान अभ्यासाद्वारे आपण आपल्या मूळ स्वरूपाला पाहू शकतो. हे ते रूप आहे जे शारिरीक नसून आत्मिक आहे. जो आत्मा पिता परमेश्वराचा अंश आहे आणि त्याच्या प्रेमाने परिपूर्ण आहे. तो आत्मा जो चेतन आहे आणि आपणास जीवन देत आहे. जेव्हा आपला आत्मा पिता परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव करतो तेव्हा तो सदैव प्रभू प्रेमाच्या धुंदी च्या अवस्थेत राहतो.

धुंदीच्या या अवस्थेला गुरू नानक देव महाराजांनी आपल्या वाणीमध्ये म्हटले आहे की, "नाम खुमारी नानका चढ रहे दिन रात।’ जी नामाची मस्ती आहे आणि जे प्रभूचे अमृत आपल्या अंतरीस्रवत आहे याचा अनुभव आपण ध्यान अभ्यासाद्वारे आपल्या अंतरी करतो तेव्हा ही मस्ती आणि त्याचा आनंद दिवस-रात्र 24 तास आपल्या बरोबर असतो आणि जेव्हा आपला आत्मा हे अनुभवतो तेव्हा त्याचे मिलन पिता परमेश्वराशी होते.

गुरू नानक देव महाराज यांनी "एक पिता एकस के हम बारीक’ हा संदेश संपूर्ण विश्वात पसरविला. त्यांच्या या उपदेशानुसार आपण सर्व एकाच पिता परमेश्वराच्या परिवाराचे सदस्य आहोत. याकरिता आपण परस्परांशी प्रेमाने राहावे आणि एकमेकांना सहाय्य करावे. जेव्हा आपण असे जीवन व्यतीत करू लागतो तेव्हा आपण आपल्या अंतरातील प्रभू प्रेमाचा अनुभव करू लागतो आणि असे महापुरुष याच प्रभूच्या प्रेमाला आपल्या सर्वांत वाढविण्याकरिता या धरतीवर येतात. त्यामुळे आपणाला हे जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचा मार्ग मिळतो, असे पूर्ण गुरु आपणास समजावतात की, आपण आपल्या जीवनाचे ध्येय स्वतःला ओळखणे आणि पिता परमेश्वराला प्राप्त करणे ते याच जीवनात पूर्ण करू शकतो.

चला तर! गुरू नानक देव महाराजांच्या या प्रकाश पर्वाला आपण खऱ्या अर्थाने तेव्हाच साजरे करू शकतो जेव्हा आपण त्यांच्या शिकवणुकींना आपल्या जीवनात धारण करून त्या नुसार जीवन जगू.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com