बर्फ वितळण्याचा धोका

बर्फ वितळण्याचा धोका

अंटार्क्टिकामध्ये दरवर्षी सरासरी 150 अब्ज टन बर्फ वितळत आहे, तर ग्रीनलँडचा बर्फ अधिक वेगाने वितळत आहे. तेथे दरवर्षी 270 अब्ज टन बर्फ वितळण्याचे आकडे नोंदवले गेले आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास, समुद्राची वाढती पातळी आणि नद्यांच्या पूरक्षेत्रात खार्‍या पाण्याचा प्रवेश यामुळे या विशाल डेल्टाचा मोठा भाग नष्ट होईल. भारतातही अल्मोडा येथील ‘पंडित गोविंद वल्लभ पंत इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन एन्व्हायर्नमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’च्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की, हिमखंड तुटलेल्या भागात बदल दिसून येत आहेत. गोमुख हिमखंडावरील चतुरंगी आणि रक्तवर्ण हिमनगांचा वाढता दाब हे त्याचे प्रमुख कारण आहे.

हवामानबदल आता जगभरात दिसून येत आहेत. भविष्यात आशियाई देशांवर त्याचा सर्वात वाईट परिणाम होणार आहे. अचानक मुसळधार पाऊस किंवा अचानक ढगफुटीच्या घटना घडू शकतात. किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय बदल दिसून येतात. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झालेल्या जलपरिषदेमध्ये हिमालयातून उगम पावणार्‍या गंगेसह 10 प्रमुख नद्या कोरड्या पडण्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. हवामान संकटामुळे येत्या काही दशकात भारतातील सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या कोरड्या पडू शकतात. गंगा आणि ब्रह्मपुत्रेसह आशियातील 10 नद्यांचा उगम हिमालयाच्या पायथ्याशी असून त्यात झेलम, चिनाब, बियास, रावी आणि यमुना यांचाही समावेश आहे. या सर्व नद्या 2250 किलोमीटर पाणलोट क्षेत्रात वाहतात आणि तेथील कोट्यवधी लोकांना ताजे पाणी पुरवतात. पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्यांपैकी 80 टक्के लोक आशिया खंडातील आहेत.

तापमानात वाढ झाल्यामुळे कास्कवुल्श नदीची जन्मदाती हिमनदी वेगाने वितळू लागल्यामुळे 300 वर्षे जुनी आणि तब्बल 150 मीटर रुंदीचे पात्र असणारी स्लिम्स नदी 26 ते 29 मे 2016 दरम्यान कोरडी पडली होती. अशाप्रकारे नदी कोरडी पडणे ही आधुनिक जगातील पहिलीच घटना होती.

2526 किलोमीटर लांबीची गंगा ही देशातील सर्वात प्रमुख आणि पवित्र नद्यांपैकी एक आहे. अनेक राज्यांतील सुमारे 40 कोटी लोक तिच्यावर अवलंबून आहेत. तिचे पाणी ज्या गंगोत्री हिमनदीतून जन्म घेते, त्या हिमनदीच्या 30 किलोमीटर लांबीच्या हिमखंडातील दोन किलोमीटरचा एक चतुर्थांश भाग वितळला आहे. भारतीय हिमालयीन प्रदेशात 9575 हिमनद्या आहेत. त्यापैकी 968 हिमनद्या एकट्या उत्तराखंडमध्ये आहेत. या हिमनद्या झपाट्याने वितळल्या तर भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये आपत्तीजनक पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अंटार्क्टिकामध्ये दरवर्षी सरासरी 150 अब्ज टन बर्फ वितळत आहे, तर ग्रीनलँडचा बर्फ अधिक वेगाने वितळत आहे. तेथे दरवर्षी 270 अब्ज टन बर्फ वितळण्याचे आकडे नोंदवले गेले आहेत.

हीच परिस्थिती कायम राहिल्यास, समुद्राची वाढती पातळी आणि नद्यांच्या पूरक्षेत्रात खार्‍या पाण्याचा प्रवेश यामुळे या विशाल डेल्टाचा मोठा भाग नष्ट होईल. अल्मोडा येथील ‘पंडित गोविंद वल्लभ पंत इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन एन्व्हायर्नमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’च्या शास्त्रज्ञांचा दावा आहे की, हिमखंड तुटलेल्या भागात बदल दिसून येत आहेत. गोमुख हिमखंडावरील चतुरंगी आणि रक्तवर्ण हिमनगांचा वाढता दाब हे त्याचे प्रमुख कारण आहे. शास्त्रज्ञांच्या मते, 28 किलोमीटर लांब आणि दोन ते चार किलोमीटर रूंद गोमुख हिमखंड इतर तीन हिमखंडांनी वेढलेला आहे. गंगेच्या उत्पत्तीच्या स्त्रोतांचे हिमनग तुटण्याची प्रक्रिया सुरू राहिल्यास, कालांतराने गंगेच्या सातत्यावर परिणाम होईल आणि तिचा नामशेष होण्याचा धोका वाढेल. गंगेचे संकट केवळ हिमखंड तुटल्यामुळे नाही तर औद्योगिक विकासामुळेही आले आहे.

यावर उपाय म्हणून ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ ई. एफ. शूमाकर यांनी मोठ्या उद्योगांऐवजी छोटे उद्योग उभारण्याकडे जगाचे लक्ष वेधले होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीत कमी वापर आणि जास्तीत जास्त उत्पादन व्हावे, अशी सूचना त्यांनी केली. शूमाकर यांचा विश्वास होता की, निसर्गामध्ये प्रदूषण सहन करण्याची मर्यादा आहे, पण सत्तरच्या दशकात त्यांच्या इशार्‍याची खिल्ली उडवली गेली. आता हवामान बदलावर काम करणार्‍या सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांनी मात्र त्यांचा इशारा स्वीकारला आहे. हवामानबदलाचा परिणाम आता जगभरात दिसून येत आहे. भविष्यात त्याचा सर्वात वाईट परिणाम आशियाई देशांवर होणार आहे. आशियामध्ये उबदार दिवस वाढू शकतात किंवा हिवाळ्याच्या दिवसांची संख्या वाढू शकते. अचानक मुसळधार पाऊस किंवा अचानक ढगफुटीच्या घटना घडू शकतात. किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय बदल दिसून येऊ शकतात.

मानवासह सर्व प्राणी आणि वनस्पतींच्या जीवनावरही या सर्व बदलांचा परिणाम होईल. त्यामुळे वेळीच जागरुक होऊन हिमालयातून उगम पावणार्‍या 10 नद्या कोरड्या पडण्याचा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

यंदा तर उन्हाळा सुरू होताच तापमानाचा पारा 40 अंशांच्या जवळ पोहोचला. यमुनेसह अनेक नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली. काल्पी येथील रहिवाशांनी सांगितले की, पूर्वी यमुना नदीचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध होते, मात्र सध्या घाण आणि गढूळ पाणी वाहत आहे. केंद्रीय जल आयोगाच्या काल्पी केंद्राचे प्रभारी रुपेशकुमार यांनी सांगितले की, यमुना नदीच्या पाण्याची पातळी ऑगस्ट महिन्यात 112 मीटरच्या पुढे गेली होती, मात्र 22 मार्च रोजी ती 95 मीटरपर्यंत खाली आली. प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध विहारी घाटात यमुना नदीचे पाणी 300 मीटर दूर गेले आहे. यमुनेच्या पाणीपातळीत घट झाल्यामुळे मैनुपूर, मंगरूळ, हिरापूर, देवकाली, मदारपूर आदी गावांमधील शेतकर्‍यांच्या पिकांना फटका बसू शकतो.

वाढत्या उष्णतेमुळे यंदा भारतातील काकडी, टरबूज, भाजीपाला आदींच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे किनारी भागातील शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. जनावरांची तहान भागवण्यासाठी तसेच आंघोळ, कपडे धुणे यासाठी लोक नदीवर अवलंबून असतात. नदीचे पात्र रिकामे झाल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. गुरे कशी जगवायची, हा याकाळात मोठा प्रश्न बनतो आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com