प्रामाणिक कष्टाची स्वानंदी

आजकालची सर्वच लहान पिढी शार्प झाली आहे. अंगात सुप्त गुण तर असतातच, पण आकलनशक्ती ही अफाट असते. कुठलीही गोष्ट ते पटकन आत्मसात करतात आणि कालांतराने अभ्यासाबरोबरच इतर कलेत किंवा इतर सुप्तगुणांची त्यांना आवड निर्माण होत जाते. त्यामध्ये ती मुलं रमायला लागतात, त्यात त्यांना, मान-सन्मान मिळतो आणि त्यांचे कौतुकही व्हायला लागते.
प्रामाणिक कष्टाची स्वानंदी

अशाच एका बाल कलाकाराची (child artist) ओळख करून द्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. आजच्या त्या बाल हिर्‍याच नाव आहे स्वानंदी विवेक भारताल. वय वर्षे 14. ती सावेडीतील श्रीसमर्थ विद्या मंदिर प्रशालेत इयत्ता नववीत शिकतेय. तिला लहानपणापासूनच नृत्य, अभिनय, चित्रकला या सर्व गोष्टींची खूप आवड होती. तीच आवड तिने आजपर्यंत जोपासली आहे. चित्रकलेसाठी तिला तिच्या वडिलांचे म्हणजेच विवेक भारताल सर यांचे खूप सहकार्य आणि मार्गदर्शन मिळते. अभिवाचन आणि लेखनाचीही तिला खूप आवड आहे. साहित्य अभिवाचन स्पर्धेत चाळीसगाव येथे तिची निवड झाली होती. चित्रकलेमध्ये शहर आणि जिल्हास्तरावर तिला एकूण 44 पारितोषिके मिळालेली आहेत.

शहर व जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत एकूण 44 पारितोषिके मिळाली आहेत. नृत्यशिक्षिका मंजुषा देशमुख यांच्याकडे तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत. त्यात तिने विशारद पदवी मिळवली आहे. इतक्या लहान वयात नेत्रदीपक असं यश स्वानंदीने संपादन केले आहे. त्याबद्दल तिचे खरचं करावं तितकं कौतूक कमी आहे. इतकंच काय तर सप्तरंग थिएटर्सतर्फे म्याडम, माकडचाळे या बालनाट्यातही तिने आपली भूमिका आत्मविश्वासाने निभावली. मागील वर्षी, तिला आरती अकोलकर दिग्दर्शित ‘पिंटी’ या नाटकासाठी अभिनयाचं (Acting) पारितोषिक मिळालं आहे. तिला वेळोवेळी डॉ. शाम शिंदे (सर) यांचे मार्गदर्शन मिळत आले आहे. पारितोषिक मिळो अथवा ना मिळो, प्रामाणिकपणे ती प्रयत्न करत राहते. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट प्रामाणिकपणे करण्याची तिची तयारी असते. ती आपल्या आई-वडीलांनाच आदर्श मानते.

स्वानंदीला वेगवेगळी पुस्तके आणून देणे आणि स्पर्धेसाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे ही पालकांची तिच्यासाठी असणारी धडपड खूप महत्त्वाची आहे. आपल्या मुलीने प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करून आवडीच्या क्षेत्रात नाव उंचवावे असे तिच्या पालकांना मनोमन वाटते. अशा या स्वानंदीला मोठेपणी एक अभिनेत्री तसेच Product Designer होण्याची इच्छा आहे. स्वानंदीला तिच्या आगामी कारकिर्दीसाठी आणि भविष्यातील वाटचालीस खूप शुभेच्छा...

- सागर खिस्ती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com