Blog : मनसेनेचा हिंदुत्वाचा 'भोंगा' शिवसेनेला धोकादायक?

Blog : मनसेनेचा हिंदुत्वाचा 'भोंगा' शिवसेनेला धोकादायक?

भोंग्याच्या (Loudspeaker) मुद्यावरून सध्या देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे. मनसेनेने (MNS) अचानकपणे मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरल्याने व हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने शिवसेनेला एक प्रकारे आव्हान दिले आहे. मनसेनेची हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेला (Shivsena) धोकादायक ठरू शकते....

गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळाव्यात मनसेनाप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे (Loudspeaker) उतरवण्याची भूमिका मांडली. त्यानंतर ठाणे (Thane) येथे झालेल्या उत्तर सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत राज्य सरकारला (State Government) 3 मेची अंतिम मुदत दिली.

राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशभर हा चर्चेचा विषय बनला आहे. मनसेनेने आतापर्यंत अनेक वेळा वेगवेगळी भूमिका घेऊन निर्णय बदलले आहेत. मात्र भोंग्याचा निर्णय व हिंदुत्वाचा निर्णय त्यांना आगामी निवडणुकीच्या (Elections) दृष्टिकोनातून फायद्याचा ठरू शकतो का? अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

कारण यापूर्वी कठोरपणे हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका घेणारी शिवसेना (Shivsena) राज्यात काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीबरोबर (NCP) सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेची (Shivsena) हिंदुत्वाची धार कमी झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. हाच धागा पकडून राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला. राज यांच्या या भूमिकेला भाजपनेही (BJP) उघडपणे पाठिंबा दिला आहे.

भाजप (BJP) व मनसेना (MNS) हे दोन्ही पक्ष आगामी काळात जवळ येतील व दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे. मुंबई (Mumbai) व ठाणे (Thane) येथे मनसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे.

मनसेना (MNS) हा शिवसेनेला (Shivsena) मुंबई-ठाण्यात शह देऊ शकतो. त्यामुळेच भाजप (BJP) मनसेनेला जवळ घेऊ पाहत आहे. भाजप व मनसेना यांची आगामी महापालिका निवडणुकीत युती झाली तर सत्तारूढ महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या ठिकाणी धोका होऊ शकतो. विशेषत: शिवसेनेला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

मनसेनेची स्थापना होऊन १५ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. सुरुवातीला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, त्यानंतर परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेऊन मनसेनेने आपले स्थान घट्ट करण्याचे प्रयत्न केले. परंतु जम बसू शकला नाही. मात्र आता भोंग्याचा (Loudspeaker) व हिंदुत्वाचा विषय आगामी निवडणुकीत (Election) फायदेशीर ठरू शकतो, अशी चर्चा काही शिवसैनिक गुप्तपणे करीत आहेत.

शिवसेनेची (Shivsena) स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला शिवसेनेने मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. त्यामुळे मुंबईत (Mumbai) शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात जम बसला. कालांतराने शिवसेनेने (Shivsena) आपली भूमिका बदलली व परप्रांतीयांविरोधात लढा सुरू केला. या लढ्याला यश आले तरी मात्र निवडणुकीत (Election) या भूमिकेचा फायदा मिळाला नाही.

कारण मराठी माणूस सर्वच पक्षांत आहे. केवळ एकाच पक्षात नाही ही भूमिका शिवसेनेला पटली असावी. त्यानंतर शिवसेनेने पुन्हा आपली भूमिका बदलली. १९८५ नंतर शिवसेनेने (Shivsena) हिंदुत्वाची भूमिका घेऊन 'गर्व से कहो हम हिंदू है' असा नारा दिला. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या या घोषणेला संपूर्ण भारतभर प्रचंड प्रतिसाद मिळाला.

साधारणत: 1988 मध्ये शिवसेनेने मुंबईतील विलेपार्ले विधानसभेची पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर लढविली व त्यात शिवसेनेला भरघोस यश मिळाले. त्यावेळी असलेले शिवसेनेचे उमेदवार डॉ. रमेश प्रभू (Dr. Ramesh Prabhu) प्रथमच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विधानसभेत निवडून गेले. या यशामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते भारावून गेले.

त्यांनी त्यानंतर हिंदुत्वाची कठोर भूमिका घेऊन प्रत्येक निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवल्या. 1990 मध्ये प्रथमच शिवसेनेने (Shivsena) विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले. तब्बल ५२ आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडून आले. लोकसभा निवडणुकीतसुद्धा (Loksabha election) शिवसेनेला भरघोस यश प्राप्त होऊ लागले.

मात्र 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने (Shivsena) भाजपची (BJP) साथ सोडली आणि काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी (NCP) यांच्या सोबत महाविकास आघाडी स्थापना करून राज्यात सरकार स्थापन केले. त्यामुळे गेल्या तीस वर्षे भाजपसोबत असलेल्या भाजपची साथ शिवसेनेने सोडली.

त्यानंतर भाजप (BJP) सातत्याने शिवसेनेवर टीका करीत शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात आहे, असा प्रचार सुरू केला. त्यामुळेच की काय, कठोरपणे भूमिका घेणार्‍या मनसेनेने हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला. ३ मेपर्यंत भोंगे काढण्याची अंतिम मुदत सरकारला दिली. राज यांच्या या भूमिकेचे भाजपने (BJP) स्वागत केले. तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनीसुद्धा राज यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

सध्या भोंग्याचा विषय देशभर गाजत आहे व राज यांच्या भूमिकेला समर्थनही मिळत आहे. एवढेच नाही तर राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य असल्याची अंतर्गत चर्चा खुद्द शिवसैनिक करीत असल्याचे दिसत आहे.

त्यातच राज ठाकरे यांनी अयोध्येला (Ayodhya) जाण्याची घोषणा केली आहे. या गरमागरमीनंतर शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेसुद्धा (Aditya Thackeray) अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे सध्या या दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चढाओढ सुरू आहे.

आगामी काळात हिंदुत्वाच्या मुद्द्याचा मनसेनेला फायदा होऊ शकतो तर शिवसेनेला नुकसान होऊ शकते, अशी चर्चा होत आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. मंत्र्यांची मने जुळली आहेत, पण आमदारांची आणि कार्यकर्त्यांची मने अद्यापही जुळलेली नाहीत.

आतापर्यंत नाशिक (Nashik) शहरात व नाशिकरोड (Nashikroad) परिसरात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी अनेक कार्यक्रम घेतले. मात्र या कार्यक्रमांना एकदासुद्धा या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आलेले दिसले नाहीत.

कार्यकर्त्यांची मने अद्याप जुळलेली नाहीत. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करून निवडणुका लढवल्या तर त्याचा फायदा विरोधी पक्षाला होऊ शकतो, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

- दिगंबर शहाणे

Related Stories

No stories found.