Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

खरोखर आपना सर्वांचे हे परम भाग्य आहे कि आपण मराठी बोलतो व ऐकतो. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महाकवी कुसुमाग्रज म्हणजेच

विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस दरवर्षी मायबोली मराठी भाषा गौरव दिन म्हणूनु साजरा केला जातो. तर 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने युनेस्कोच्या पुढाकाराने जगातील सर्व भाषांना एकाच पातळीवर सन्मान देण्यासाठी 2000 सालापासून राबविण्यास सुरवात केली.21 ते 27 फेब्रुवारी हा आठवडा मायबोली मराठी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस म्हणजे आपल्या मायबोलीचे सन्मानाचे दिवस आहेत.या मराठी भाषेचा गौरव करताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात म्हणतात कि,

- Advertisement -

माझा मराठाची बोलू कौतुके । परी अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन॥

म्हणजे माऊली म्हणतात कि माझी मराठी भाषा इतकी गोड आहे रसाळ आहे कि पैज लावली तर अमृत देखील तिच्यासमोर फिके पडेल.याहीपुढे जाऊन माऊली म्हणतात कि,

इये मराठीयेच्या नगरी। ब्रम्हविद्येचा सुकाळू करी। घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा॥

म्हणजे माऊली या मराठी भाषेला नगरीची उपमा देतात व म्हणतात कि हे श्रीगुरूनिवृत्तीराया या मराठीच्या नगरात ब्रम्ह विदेचा सुकाळ किवा वैपुल्य असुदे..मराठी भाषेसाठी यापेक्षा मोठा गौरव तो कोणता असावा..?

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे . किंबहुना या तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या भाषांसोबत आता मराठी भाषेचा वापर हा इंटरनेट वापर कर्त्यांकडून देखिल मोठ्या प्रमाणात होत आहे.हि मराठी भाषिक म्हणून आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब होय. मराठी भाषा हि आपली मातृभाषा असल्यामुळे ती आपल्याला समजण्यास अतिशय सुलभ आहे .आपल्या रोजच्या वापरातील असल्यामुळे ती आपलयाला आई समान भासते.

मराठी असे आमची मायबोली जरी भिन्न धर्मानुयायी असुं

पुरी बांणली बंधुता अंतरंगी,

हिच्या एक ताटात आम्ही बसुं

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू,

वसे आमुच्या हृन्ममंदिरी

जगन्मान्यता हिस अर्पू प्रतापें

हिला बैसवू वैभवाच्या शिरी

मराठी महाराष्ट्राची लोकभाषा मातृभाषा अशी मराठीची ओळख आहे.आपला जन्म भारत भूमीतील महाराष्ट्र या राज्यात झाला आपण या भूमीत जन्मलो वाढलो जि मायबोली भाषा जिने आपल्या वाणीत गोड श्रीगणेशा सुंदर अशा मराठी भाषेने केला अशी ही मराठी भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे अनेक थोर संतांनी,साहित्यीकांनी मराठी भाषेला नटवून-थटवून सुंदर केले ,शुद्ध केले. महाराष्ट्रातील आचार विचारांच्या परंपरेने मराठी संस्कृतीची जडण घडण केली अशी हि आपली मराठी काळाच्या ओघात टिकून राहील का ? असे जर मला कोणी विचारले तर…, होय राहील .. असेच माझे उत्तर असेल.

आज आपण इंग्रजी ही पाश्चात्य भाषा शिकण्याचा मोठा अट्टाहास धरत आहोत, कारण त्याचे विस्तारित क्षेत्र व सहज साध्य असा अर्थार्जनाचा हेतू असू शकतो ,परंतु पाश्चात्य भाषा ही आपल्याला शिकावी लागते तर मायबोली आपल्या रक्तात तनामनात असते,ज्यामुळे आपल्या संस्काराचे पालन पोषण होते आणि आपल्या अस्तित्वाची खरी ओळख निर्माण होते. म्हणूनच समाजाला तिची उपयोगिता पटवून देणे,मराठी भाषेचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करणे मराठी तिच्या विषयी सुलभ ज्ञान देणे, मराठी भाषेला वैश्विक स्वरूप देणे ,मराठी साहित्य प्रकार लोकांपर्यंत पोहचविणे अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपण आपल्या मायबोली मराठी मराठी भाषेची प्रगती साध्य करू शकतो. त्यासाठी आपण प्रयत्नशील असावे .जागतिक मराठी दिनाच्या निम्मित्ताने आपण याचा आढावा घेतला पाहिजे .आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या जन्मभूमी,कर्मभूमीची मनापासून ओढ ,प्रेम वाटत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे . आपल्यलाला आपली ओळख आणि अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर भाषा

टिकवणे आणि जपणे गरजेचे आहे भाषा ही फक्त भाषा नसते तर भाषेसोबत त्या त्या प्रांतातील ,भूगोल ,इतिहास ,संस्कृती प्रहावीत होत असते.जेव्हा भाषेची नाळ तोडली जाते तेव्हा संस्कृतीचीही नाळ तोडली जाते. संस्कृती माणसाला घडवते प्रगल्भ बनवते मातृभाषेतून शिक्षण न दिल्यामुळे आपण आपल्या संस्कृतीत असूनही मुलांना तिच्यापासून दूर करतो.उच्च शिक्षण इंगर्जी माद्यमातून आहे त्यामुळे त्याचाशी जुळवून घ्यायला अवघड जाईल या काळजी पोटी पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात. आपल्या पाल्यांनी स्पर्धेच्या युगाला सक्षम पने सामोरे जावे अशी त्यामागे पालकांची इच्छा असते त्यामुळे इंग्रजी माध्यम नसेल तरब मुलाची प्रगती होणार नाही अशी पालकच्या मनात भीती असते.मात्र पालकांचा हा खुंप मोठा भ्रम आहे .भाषा तज्ञांच्या मते जेव्हा मुलांचे मातृभाषेवर पूर्ण प्रभुत्व येते तेव्हा जगातील कुठलिही भाषा शिकण्यास व त्यावर प्रभुत्व मिळवण्यास अडचण येत नाही. नवीन भाषा शिकताना मातृभाषेतून शिकलेल्या आकलन झालेल्या संकल्पना नव्याने शिकाव्या लागत नाही.त्या सहज गत्या भाषांतरित होतात.

देश व जागतिक पातळीवर गाजलेल्या,प्रसिद्ध झालेल्या अनेक दिग्गजांचे शिक्षण हे मातृभाषेतूनच झालेले आहे.मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळेच ते प्रगतीचा एवढा मोठा पल्ला गाठू शकले.आधुनिकतेच्या आणि तंत्रज्ञानाच्या अशा 21 व्या शतकाच्या घौड-दौडीमध्ये संगणक व मोबाईल व त्याद्वारे इंटरनेट,फेसबुक ,व्हाट्सअप, ईमेल, युट्युब, यासारखी अनेक जलद प्रसार माध्यमे उपलब्ध झाली आहे.त्याचाच परिणाम, संपूर्ण जग अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलय.परंतु या सर्व आधुनिक व गतिमान अशा साधनांचा वापर मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी होणे आवश्यक आहे .

समर्थ रामदासांच्या मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा या उक्तीप्रमाणे प्रत्तेक लहानमोठ्याने मायबोली मराठीचे भाषेचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करायलाच हवे…..जय मराठी

प्रा. ज्योती नामदेव भोगे

श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा

- Advertisment -

ताज्या बातम्या