मुलांना बनवा निसर्गमित्र

मुलांना बनवा निसर्गमित्र

लहान मुलांना मातीत खेळणे, मातीची घरे बनविणे यामध्ये खूप आनंद मिळत असतो. त्यांची ही मुळातील आवड आपण अधिक विकसीत करून त्यांच्या मनात झाडे आणि वनस्पतींबद्दल प्रेम निर्माण करू शकतो. सोसायटीत एक चिल्ड्रन्स ग्रीन थंब क्लब बनवावा. याद्वारे मुलांना वेगवेगळी रोपे रुजवायला सांगावी. ज्यावेळी ही रोपे रुजतील आणि आकर्षक बनतील तेव्हा त्याचे प्रदर्शन भरवून किंवा स्पर्धा घेवून मुलांना एकत्र जमवता येईल.

येथे मुले आणि पालक आपआपले अनुभव एकमेकांना सांगू शकतील. तसेच भाज्या, फुले, बियाणे, याबाबत माहिती देऊन ते ककसे उगवतात, कुठल्या ऋतूत येतात इत्यादी ज्ञानही देता येऊ शकते. मुलांना बागकामाची आवड निर्माण व्हावी यासाठी आवश्यक त्या हत्यारांचे छोटे कीट उपलब्ध करून द्यावे. यामध्ये पाणी देण्यासाठी छोटी झारी, खुरपी, गार्डन रॅप, कुंड्या इत्यादी वस्तू असतील. स्वत:चे कीट म्हटल्यावर मुले त्याचा वापर अधिक उत्साहाने करतील. काही वैशिष्ट्यपूर्ण झाडेही लावता येऊ शकतात.

ऑफिस टाइमची फुले सकाळी 10 वाजता उमलतात आणि सायंकाळी 5 च्या सुमारास पुन्हा बंद होतात. म्हणूनच त्यांना ऑफिस टाइम म्हणतात. याचप्रकारचे फोर ओ क्लॉक प्लांट देखील आहे. यामध्ये एकच बी पेरावे. थोड्याच दिवसात झाड मोठे होते आणि पिवळे, राणी रंगाची फुले दुपारी चार वाजता उमलून वातावरण सुगंधी बनवतात. ऑफिस टाईम 10 वाजताच का उमलते, फोर ओ क्लॉक प्लांट दुपारी 4 वाजताच का उमलते याची उत्तरे मुले स्वत:च शोधू लागतील आणि नकळतच झाडांबद्दलची वेगवेगळी माहिती मिळवू लागतील. अशा प्रकारे आपण मुलांना वनस्पतींबद्दल कुतुहल निर्माण करून त्यांची आवड निर्माण करू शकतो.

वेदिका कुलकर्णी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com