काकोरी कट - ९ ऑगस्ट १९२५

भारतीय स्वातंत्र चळवळीत सशस्त्र संघर्ष करून ब्रिटिश राजवट उलथविन्यासाठी उस्तुक क्रांतिकारी संघटना म्हणजे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एचएसआरए).
काकोरी कट - ९ ऑगस्ट १९२५

भारतीय स्वातंत्र चळवळीत सशस्त्र संघर्ष करून ब्रिटिश राजवट उलथविन्यासाठी उस्तुक क्रांतिकारी संघटना म्हणजे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एचएसआरए). या संस्थेचे धडाडीचे सदस्य होते राम प्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, चंद्रशेखर आझाद, केशब चक्रवर्ती, सचिंद्र बक्षी, मुरारी शर्मा, मुकुंदी लाल, मन्मनाथनाथ गुप्ता आणि बनवारीलाल.

त्या काळात सशस्त्र संघर्षासाठी पैशाची चणचण या क्रांतिकारांना भासत होती. त्या वेळेस क्रांतिकारी राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाकउल्ला खान यांना एक कल्पना सुचली, ती म्हणजे सरकारी खजिन्यावरच दरोडा घालण्याची. त्यासाठी शासकीय बँका, कार्यालये, कोषागार व पोस्ट कार्यालये अशा ठिकाणांची निवड करण्यात आली. तेव्हा ते याची संधी शोधत असतांना सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली. तेव्हा क्रांतिकारकांनी लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली. यासाठी ९ ऑगस्ट १९२५ रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या ८ नंबरच्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. पहारेकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून हवेत गोळीबार करत तिजोरी फोडली व त्यातील खजिना घेऊन जंगलात निघून गेले. केवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात. सरकारी खजिन्याची मोठी रक्कम क्रांतिकारकांच्या हाती पडल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे खरेदी केली. या चोरी दरम्यान क्रांतिकारकांपैकी एकाने चुकून गोळ्या झाडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आणि ते प्रकरण हत्येच्या प्रकरणात बदलले. ट्रेन लुटल्यानंतर एचएसआरएचे सदस्य लखनऊला पळून गेले. त्यांनी ट्रेनमध्ये कोणत्याही भारतीयांना लुटले नाही कारण ब्रिटिशांकडून पैसे घेऊन ब्रिटिशांना धक्का बसवायचा होता.

त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतातील अठरा ठिकाणांहून बत्तीस लोकांना अटक करण्यात आली. यापैकी पंधरा जणांना सोडण्यात आले कारण त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता. सरकारने त्यांच्यावर कट रचणे, दरोड, खून व सरकारी खजिना लुटणे असे आरोप ठेवून खटला भरला. खटल्याचे कामकाज लांबले व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या क्रांतिकारकांना तुरुंगात वाईट वागणूक दिली. त्याविरुद्ध क्रांतिकारकांनी उपोषण केल्याने सरकारला त्यांच्या काही मागण्या मान्य कराव्या लागल्या. यावेळी सामान्य जनतेचा क्रांतिकारकांना पाठिंबा मिळाला होता. या एक वर्षाच्या कालावधीत क्रांतिकारकांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सोडविण्यासाठी अनेक योजना आखल्या, मात्र त्यांना अपयश आले. काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले. यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशीची, चौघांना आजन्म हद्दपारीची व अन्य क्रांतिकारकांना तुरुंगवासाची शिक्षा फर्मावण्यात आली. कटातील मुख्य आरोपी व अनेक सरकारविरोधी कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले. पण अखेर चंद्रशेखर आझाद यांना २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद येथे आल्फ्रेड पार्कमध्ये स्वत:ला इंग्रजांच्या ताब्यात व्हावेसे वाटले नाही म्हणून त्यांनी स्वत:वर गोळी झाडून शहीद झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com