Blog : ...म्हणून साजरा केला जातो परिचारिका दिन

Blog : ...म्हणून साजरा केला जातो परिचारिका दिन
file photonurse day

२०२२ हे वर्ष जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नेतृत्व करणाऱ्या महिलांसाठी एक आवाज –नर्सिंगमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि जागतिक आरोग्य सुरक्षित करण्यासाठी हक्कांचा आदर करा (A Voice to Lead-Invest In nursing and Respect Rights to Secure Global Health) ही २०२२ या वर्षीची थीम ठेवली आहे....

याचे कारण म्हणजेच फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांची आज २०२ वी जयंती आहे. करोनाच्या प्रादुर्भावामध्ये परिचारिकांचे योगदान बघता आजचा दिवस हा सर्व परिचारिकांसाठी खूप अभिमानाचा आहे.

२०२० ते २०२२ सर्व परिचारिकांना समोर करोना बरोबर लढण्याचे एक युद्धच उभे राहिले होते आणि ते आपल्या परिचारिकांनी खूप उत्तम रित्या पार पाडले आहे. त्यामुळे सदर वर्ष हे परिचारिकांना समर्पित करण्यास योग्यच आहे.

घरापासून दूर राहून ह्या करोना योद्धा खूप जीवानिशी हे युद्ध लढल्या आहे. आश्चर्यास्पद तर हे होते कि खूप काही परिचारिका आपल्या लहान मुलांना सोडून या युद्धात उतरल्या होत्या आणि काहीतर कोविड सेवा देता-देता काहींना जीवदेखील गमवावा लागला. सलाम आहे या सर्व आपल्या कोरोना योद्धांना.

रूग्णाची सेवा कोण करतं असा प्रश्न केल्यानंतर डॉक्टरआधी नाव येईल ते परिचारिकेचं. रूग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम या परिचारीका करतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वताच्या सुख-दुःखाची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रूग्णसेवेत गुंतलेल्या असतात.

स्वत: च्या आयुष्यातील काळोख विसरून रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्याचा ध्यास सुरु झाला तो दि. १२ मे १८२० रोजी उच्चकुलीन व श्रीमंत इंग्रज (ब्रिटीश) घराण्यात जन्म झालेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या मुळे. १८ व्या शतकात परिचारिका क्षेत्राला विशेष न मानले जाणाऱ्या काळातही फ्लॉरेन्स नाईटिंगेल कि ज्या अतिशय राज घराण्यातील असूनही त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे रुग्णसेवेसाठी समर्पित करणार आहे असे जाहीर केले.

घरातून प्रचंड विरोध झाला. कठोर विरोध झुगारूनही १८४४ साली त्यांनी रुग्णसेवेचा व समाजसेवेचा स्वतंत्र निर्णय घेतला. याच काळात त्यांचे नर्सिग विषयाचे अधिकृत शिक्षणही पूर्ण केलेले होते.

आयुष्यात प्रतिष्टेच्या दृष्टीने अतिशय अडचणी असताना, परिस्थितीला संधी मानून संधीचे त्यांनी सोनं केले. सन १८५४ रोजी झालेल्या क्रिमियन युद्धाच्या काळात फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी ३८ परिचारिका बरोबर घरून त्यांचे कर्तुत्व सिद्ध केले. प्रशिक्षित परीचारीकांच्च्या मदतीने त्यांनी जखमी सैनिकांवर उपचार करत मृत्त्यू दर झपाट्याने कमी केला.

या काळात त्या सैनिकांची काळजी घेण्यासाठी त्या रात्री हातात कंदील घेऊन नाईट राउंड घेत असे, म्हणून त्यांना लेडी विथ ल्याम्प असेही संबोधतात. त्यांनी सुरू केलेल्या नर्सिंग स्कूलमुळेच आज जगभरात परिचारिकांना महत्व प्राप्त झाले.

असेच खूप सारे संशोधन, लेखन व समाजसेवा करत १३ ऑगस्ट १९१० रोजी वयाच्या ९० व्या वर्षी पृथ्वीवरील एक अनमोल-अमृततुल्य काम संपवून त्या अनंतात विलीन झाल्या.

फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना श्रद्धांजली म्हणूनच १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.

परिचारिका हा आरोग्य यंत्रणेतील मोठा समूह व मजबूत कणा समजला जातो. परंतु समाजात अजूनही एक प्रशिक्षित परिचारिका म्हणजे काय? हा अजूनही एक प्रश्नच आहे. तुमची सुश्रुषा करणारी परिचारिका हि राज्य परिचारिका परीषदेत नोंदणी केलेलीच असावी लागते.

तीन महिन्याचा कोणताही अर्थहीन कोर्स करून स्वताला नर्स म्हणवून घेण हे खूपच संतापजनक आहे .अशा खूप काही गोष्टी बदलत चालल्या. अजूनही आपल्या समाजात परिचारिका किंवा नर्स हि संज्ञा खूपच अस्पष्ट आहे. बदल्यात अधुनिकीकरनामध्ये परिचारिका हि संज्ञा संपूर्णतः बदलली आहे. थोडक्यातच सांगायच झाल तर डिप्लोमा पासून ते पी.एच.डी (Ph.D) तेहि पोस्ट फेलोशीप (Post Fellowoship) पर्यंत नर्सिंगचा अभ्यासक्रम जाऊन पोहचला आहे.

नर्सिंग हे फक्त नर्सिंग हे क्षेत्र मर्यादित न राहता बालरोग परिचारिका शास्त्र, स्त्रीरोग परिचारिका शास्त्र, मानसिक आरोग्य परिचारिका शास्त्र ,वैद्य शल्य चीकीस्सा शास्त्र (यामध्ये प्रत्तेक संस्थेसाठी विशेषीकरण उपलब्ध आहे.)

असे वेग वेगळे अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहे. म्हणजे नर्सिंग मध्ये B Sc (४ वर्ष), M Sc (२ वर्ष ), Post certificate course (१-२ वर्ष), M.Phil, Ph.D, Post Fellowship असे अभ्यासक्रम अस्तित्वात आहेत. नर्सिंग मध्ये इतर मेडीकल शाखेंसारखाच अभ्यासक्रम अस्तीत्वात आहे, फक्त काही विषय वगळता.

बदलत्या काळात तर Nurse Practioner ह्या कोर्स मुळे परिचारिका स्वतंत्रपणे रुग्ण सेवा करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. पदवी नंतरचा काहीं काळाचा अनुभव व २ वर्षांचा अभ्यासक्रम, त्यांनतर परिचारिका हि स्वतंत्रपणे दवाखाना चालवू शकते. (हा अभ्यासक्रम सुमनदीप विद्यापीठ,गुजरात. एम जी एम मुंबई ई. येथेहि उपलब्ध आहे.)

तसेच Independent Midwife Practitioner सारखे अभ्यासक्रमही भारतात चालू झाले आहे. परिचारिका हे स्वतंत्र प्रोफेशन म्हणून मान्य झाले आहे. यासाठी नर्सिंग ला स्वतंत्रपने राज्य परिचारिका परिषद,मुंबई (MNC), भारतीय परिचारिका परिषद,दिल्ली (INC) हे व्यवस्थापन हि खूप उत्तमरीत्या कार्यरत आहेत.

सद्य स्तितीला महाराष्ट्र मध्ये (२०१६ नुसार) ७३,१०८ ANM, ०१,१७,४५७ GNM, १२,७१७ BSc, १२७६ MSc हे परिषदेमध्ये नोंदणीकृत आहेत. आपल्याकडे प्रशिक्षित परिचारिकांचा आकडा हा लाखांच्या घरात आहे.

मात्र, शासकीय दवाखान्यांचा बोजा फक्त काही हजार नर्सेसच्या खांद्यावर आहे. याविषयी परिचारिका संघटनांनी खूप वेळा आवाज उठवला, परंतु याकडे दुर्लक्ष केले गेले आणि त्याचे परिणाम आपण सद्य स्थितीला करोनाच्या महामारीमध्ये अनुभवतो आहे.

८० टक्के खासगी रूग्णालयात रूग्णसेवेचं व्रत सांभाळण्याची जबाबदारी अप्रशिक्षित नर्सेस पार पाडतात. बदलत्या काळानुसार या नर्सेसना भेडसावणा-या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. परिचारिका परिषदेच्या व्यवस्थापन समिती हि परिचारिका क्षेत्रात नसणाऱ्या व्यक्तींच्या हातात का आहे? हा एक प्रश्नच आहे

(परिचारिका क्षेत्रात उच्चशिक्षित पदवीधर नाहीत का?) परिचारिका क्षेत्रातील उच्च व्यवस्थापन पदांसाठी महारष्ट्र लोकसेवा आयोगानेही लक्षकेंद्रित केले पाहिजे.

खासगी रूग्णालयांमध्ये अजून किमान वेतन कायदा लागू नसल्यानं तुटपुंज्या पगारात नर्सेसना काम करावं लागतयं. नुकतेच सरकारने परीचारीकांसाठीही संरक्षण नियम अमलात आणल्याने थोडी सहानुभूती भेटत आहे.

सरकारने २०१९ साली घेतलेल्या परिचारिका क्षेत्रातील परीक्षांचे काय झाले हे त्यांनाच ठाऊक. पारदर्शक पद्धतीने घेतलेल्या परिक्षेचा पेपर फुठने ही पण एक आपल्यासाठी एक केविलवाणी गोष्ट आहे.

३ वर्ष उलटून जाताहेत तरीहि माझ्या सरकारकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नाहीये. त्यात आता कंत्राटी पद्धतीने यांना परिचारिका पदे भारावयाची आहेत आणि एकी कडे भारत महासत्ता कसा होईल याचा अट्टाहास आहे. जो पर्यंत परिचारिका संवर्गाची १००% पदे भरली जात नाहीत तोपर्यंत क्वालिटी नर्सिंग केअरची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल व आपल्या परिचारिका संवर्गला दोष देणेही.असो...

करोना सारख्या महामारी असताना, इतर देशांची अवस्था बघता, आपल्या देशातील आरोग्य सेवा इतकीही काही बळकट नाही, तरीही अश्या महामारी मध्ये डॉक्टरांबरोबर परिचारिकांचे योगदान हे अनमोल आहेत. ह्या योगदानाबद्दल समाज कधीही परिचारिकांना विसरणार नाही, आणि परीचाकांसाठी नेहमीच आदर राहील.आजच्या या जागतिक परीचारिका दिनानानिमित्त माझ्या असंख्य परिचारिक बंधू भगिनीना आजच्या परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व परमेश्वर त्यांना आरोग्य सेवेसाठी खूप बळ देवो ही प्रार्थना.

लेखक : अक्षय इंद्रभान जवरे, PhD Scholar स. आरोग्य अधिकारी

Related Stories

No stories found.