देशी झाडेच का लावायची?

देशी झाडेच का लावायची?

देशी झाडेच लावा, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञ सतत करतात. अनेक सामाजिक संस्था ‘विदेशी नको, देशी झाडे’ ही मोहीम राबवतात. का लावायची देशी झाडे? काय आहे त्यांचे महत्त्व? पर्यावरण साखळीत त्यांची भूमिका कोणती? हे समजावून घ्याला हवे. देशी झाडांचेच रोपण करायला हवे.

‘अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।

कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।’

असे एक सुभाषित आहे.

अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही.

त्याप्रमाणे प्रत्येकाने कृती केली असती तर आज स्वातंंत्र्याच्या अमृत महोेत्सवी वर्षात विदेशी नको, देशी झाडे लावा, हे सांंगण्याची वेळच आली नसती. मात्र उक्ती व कृतीत फरक झाल्यानेच आज ही वेळ आली आहे.

जिल्ह्यात अनादी काळापासून अनेक वृक्ष टिकून आहेत. ते येथेच रुजतात आणि मानवाला, प्राण्यांना पशुपक्ष्यांंचे सहचर अशा पद्धतीने वाढत आहेत. अशी झाडे पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच पक्ष्यांंसाठी वरदान ठरतात. मात्र साधारणत: 1980 नंतर झटपट वाढणार्‍या विदेशी झाडांचे पेव फुटले आहे. जी झाडे आपली नाहीत, पर्यावरण पूरक नाहीत, फक्त े हिरवीगार दिसतात्त, झटपट वाढतात म्हणुनच ती लावण्याचे प्रमाण वाढले आहे. पण तज्ञांच्या मते अशी झाडे मोठ्या प्रमाणावर फक्त पाणीच शोषतात आणि प्राणी पक्षांना निराधार ठरतात. पण सरकारी वृक्षापरोण कार्यक्रमात सुद्धा अशीच झाडे लावली जाताना आढळतात. पण त्यामुळे बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस ,आवळा ,आंबा , कडुनिंब ,मोह, पळस शिसव, पांगारा, सावर, सीताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज,कवठ, बेल, या स्थानिक झाडांची लागवड दुर्मीळ झालेी.

आपल्या देशी झाडांच्या पिकलेल्या पानांतून जमिनीवर जमणार्या पालापाचोळयातून तयार होणार्‍या सेंद्रीय खतातून जमिनीचा कस वाढण्यास मदत होते. विघटन झालेल्या पालापाचोळ्याच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत होती. झाडांच्या मुळ्या खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवत होती. हवा शुद्ध करून ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढवत होती. पाऊस पाडण्यासाठी ढगांना आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात होती. ती साखळी संपली. त्यामुळेही नाशिकचे तापमान वाढू लागले असे तज्ज्ञ म्हणतात. आज जेवढी जैवविविधता अस्तित्वात आहे ती आपल्याला भविष्यात दिसेल की नाही? वड, उंबर फक्त पुजेपुरता शिल्लक राहतील का? अशी भिती वाटुु लागली आहे.

या ज्वलंत प्रश्नावर नाशिकचे पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांच्यासारखे कार्यकर्ते काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून देवराई सारख्या प्रकल्पात 24 हजारावर देशी झाडे डौलात उभी राहिली आहे. त्यामुळे तरी नाशिकचे पर्यावरण टिवण्यास मदत होत आहे. मात्र हे एकट्या दुकटयाचे काम नाही त्यासाठी प्रत्येकाचा हातभार आवश्यक आहे. आता नागरीकांंना याचे महत्त्व पटु लागले आहे. मात्र कोणते झाडे कोठे लावावे. हे कळत नाही. ते सांगण्यासाठी यंत्रणा दिसत नाही. परिणामी त्यांचे कष्ट वेळ व पैसा वाया जात आहे. वन विभाग महापालिकेचा उद्यान, विभाग, नर्सरी व्यवसायीक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन मार्गदर्शन केल्यास अनेकांचे देशी झाडे लागवडीचे स्वप्न साकार होईल. पर्यावरण राखण्यास मदत होईल.

जीवनदायी वृक्ष: वड, उंबर, पाखर, नांद्रूक, पिंपळ

मंदिराभोवती लावण्या योग्य झाडे :वड, उंबर, पाखर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, चाफा, कडूनिंब, कांचन

रस्त्याच्या कडेला लावण्या योग्य झाडे : कडूनिंब, सप्तपर्णी, करंज, वरवंटा , जारुळ, अमलतास, वड, उंबर, पाखर, नांद्रूक, पिंपळ, चिंच, शिसव, शिरीष

उद्यानास योग्य झाडे: पारिजातक, बकुळ, आवळा, उंबर, अमलतास, बांबू (पिवळा), जारूळ, चाफा, रक्तचंदन, सिल्वर ओक, आंबा, कुसुंब, सप्तपर्णी, बदाम, सीता अशोक, कदंब

जलदगतीने वाढणारी झाडे: बकाणा, भेंडी, पांगारा, आकाशनिंब (बुच), महारुख, शाल्मली (सावर), कदंब

फळझाडे: बोर, चिंच, आवळा, मोहा, टेंभुर्णी, खिरणी, शिवण, जांभूळ, नारळ, शिंदी, ताडफळ, सीताफळ, रामफळ, कवठ, फणस, लिंबू, पेरू, चारोळी, आंबा

शेताच्या बांधावर उपयुक्त: खजुरिया, शिंदी, ताडफळ, बांबू, हादगा, शेवगा, शेवरी, तुती, भेंडी, तुळस, कढीलिंब

शेताच्या कुंपणासाठी: सागरगोटा, चिल्हार, शिकेकाई, हिंगणी (हिंगण बेट), घायपात, जेट्रोफा (वन एरंड)

सरपणासाठी उपयुक्त झाडे : देवबाभूळ, खैर, बाभूळ, हिवर, धावडा, बांबू, सुरु

औषधी झाडे : हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडूनिंब, करंज, रिठा, निरगुडी, शिवन, टेंटू.

वनशेतीसाठी उपयुक्त: आवळा, अंजीर,फणस, चिंच, खिरणी, खजुरिया शिंदी, तुती, करवंद

शेत जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी : उंबर, करंज, ग्लिरिसिडीया, शेवरी

घराभोवती लावण्यास उपयुक्त : रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल, कुसुंब

कालव्याच्या काठाने लावण्यास उपयुक्त : वाळूंज (विलो), ताडफळ

बारा तासापेक्षा अधिक काळ प्राणवायू देणारी झाडे : वड, पिंपळ, उंबर, नांद्रूक, कडूनिंब, कदंब

औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण निवारणासाठी : पिंपळ, पेल्टोफोरम, पुत्रजीवी, उंबर, अशोक (उंच व पसरणारा) शिरीष, आंबा, सीताफळ, जांभूळ, सप्तपर्णी, अमलतास, पेरू, बोर, कडूनिंब, आवळा, चिंच, कदंब, बेल

हवेतील प्रदूषण दर्शवणारी झाडे : हळद, पळस, चारोळी. हवेतील प्रदूषण मर्यादेपलीकडे गेल्यास वरील झाडांची पाने, फुले, साल, फळे यात विकृती निर्माण होते.

रस्त्याच्या मधील भागात लावण्यास उपयुक्त झाडे : कोरफड, शेर, रुई, जेट्रोफा, अश्वगंधा, निवडुंगाचे प्रकार ही झाडे वाहनामधून निर्माण होणारे वायूशोषण करून परिसर स्वच्छ ठेवतात.

नरेंद्र जोशी

वृक्षारोपण करण्यापूर्वी..

पूर्वी सर्वत्र वड, पिंपळ ,कडुलिंब, आंबा फणस, उंंबर,अशोका, नारळ, सुपारी, अजाण वगैरे देशी वृक्ष लावले जायचे. मग ते शहरातील रस्ते असो किंवा राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग. भारतीय झाडांची वाढ खूप हळू असते, त्यांना देखभाल व पाणी देणे यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. पण भारतीय झाडांची मुळे पहिले वाढतात व तदनंतर हळूहळू झाड वाढायला लागते. त्यामुळे ही झाडे अत्यंत भक्कम असतात. पन्नास शंभर वर्षे जुनी झाली, वाळवीने पोखरलेली अथवा रस्त्याचे काम करताना मुळांना धक्का लागल्याने मुळे कमजोर झाली किंवा अति वादळी पाऊस आला तरच पडतात. अन्यथा छोट्या-मोठ्या वारा वादळाने यांना काहीही होत नाही. पहिला पाच वर्षांमध्ये त्याची वाढायची गती कमी असते. मात्र एकदा ते बर्‍यापैकी मोठे झाले की ती वाढ कोणी थांबवू शकत नाही. यातच 1980 च्या काळात गुलमोहरासारखी झाडे ही भारतात आणली गेली ज्यांचे आयुष्य फक्त 12 ते 15 वर्ष असते व जळण फाट्या साठी यांचा वापर करता येतो. पण या झाडाखाली सरडे, घोरपडी वगैरे सरपटणारे प्राणी , पक्षी, मधमाशा कीटक राहू शकत नाहीत. इतका यांचा सहवास विषारी असतो. गुलमोहर हे मादागास्कर मधून आणलेले झाड. दिसते सुंदर मात्र रेन ट्री प्रमाणेच कधी उन्मळून पडेल याची काही शाश्वती नसत. आता पुढचे काही महिने आपण वृक्षारोपण करणार आहोत. त्यामुळे एकही विदेशी जातीचे झाड लागणार नाही याची काळजी घ्यावी.

अंबरीष मोरे ( पर्यावरण तज्ज्ञ)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com