कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

डॉ अरुण स्वादी

भारताने (India) पहिल्यांदा टॉस जिंकला. विराट कोहली (Virat Kohli) नाणेफेक जिंकू शकतो ही मोठी बातमी झाली. तसे केल्यावर भारत काय करू शकतो याची झलक त्यांनी पेश केली. समोर स्कॉटलंड (scotland) होता हे खरेच..पण प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर आमचे गोलंदाज किती घातक ठरतात हे त्या निमित्ताने जगाला कळले तरी. किमान न्यूझीलंड विरुद्ध तरी सामना एकतर्फी झाला नसता असे म्हणायला आता जागा आहे आणि स्कॉटलंड म्हणजे काही लल्लूपल्लू संघ नाही. पाकिस्तान इंग्लंड सारख्या संघांना त्यांनी शॉक दिला आहे.

८५ धावा हे काही आव्हान नव्हतेच. राहुल रोहितने त्याची खिल्ली उडवली. पण पहिल्या दोन सामन्यात यांचं घोडं कुठं पेंड खात होतं हा प्रश्न उरतोच.

अफगानिस्तान न्यूझीलंडला हरवू शकेल का हाच आता चर्चेचा विषय आहे. विल्यमसनच्या संघाची एकूण कामगिरी बघता नबीचा संघ त्यांना हरवायची खूप शक्यता आहे. सामना दुपारी आहे. त्यामुळे दव पडायची शक्यता नाही.

रणरणत्या उन्हाचा फायदा किविज पेक्षा अफगाणिस्तानला मिळेल. फिरकी हेच प्रमुख अस्त्र असलेले त्यांचे कसलेले गोलंदाज न्यूझीलंडला पेचात पाडायची दाट शक्यता आहे. अर्थात न्यूझीलंडचे संतनर आणि सोधी काही कमी नाहीत.

आमच्या फलंदाजांची त्यांनी त्रेधा तिरपीट उडवली होती. न्यूझीलंड अनुभवी संघ आहे. कसोटीत जगज्जेते आहेत.वन डे मध्ये जगज्जेते बनले असते पण स्टोक्सची बॅट आड आली. पण आता त्यांची गाठ आहे आक्रमक अफगाणिस्तानशी. पूर्ण भारत आता अफगाणिस्तानच्या पाठीशी उभा असेल. दिमाग कहता है न्यूझीलंड जितेगी.

पर दिलं कहता है इंडिया.. देखेंगे किसकी जीत होती है...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com