Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगआज अहिंसा दिवस : जीवनात शांती, आनंद कसा प्राप्त करावा

आज अहिंसा दिवस : जीवनात शांती, आनंद कसा प्राप्त करावा

संत राजिन्दर सिंह जी महाराज

आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जन्मदिवशी संपूर्ण विश्वभरात “अहिंसा दिवस” साजरा केला जात आहे. आपण सगळे जाणतो की गांधीजींनी अहिंसेद्वारे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते नेहमी म्हणत असत, जर आपणास आपल्या जीवनात शांती असावी असे वाटत असेल तर, आपणास त्याकरिता अहिंसेला मन, वचन आणि कृतीद्वारे आपल्या जीवनात उतरविले पाहिजे. तेव्हाच आपल्या जीवनातच नव्हे तर पूर्ण विश्वात शांति स्थापनेचे स्वप्न साकार करू शकू.

- Advertisement -

दर्शन सिंह – सूफी शायर आणि संत

आता प्रश्न असा निर्माण होतो की आपण आपल्या जीवनात किंवा विश्वभरात शांती स्थापने करता काय करतो? या विषयी माझे एक स्पष्ट मत आहे की, या विषयाला आपण आतापर्यंत दुर्लक्षित कसे केले? विश्वात शांती स्थापनेसाठी सर्वांत प्रथम पाया आपण स्वतःच आहोत.

जर आपण ध्यान अभ्यासाद्वारे आंतरिक शांती प्राप्त केली तर आपल्याला आत्मिक प्रसन्नता अनुभवायला मिळेल. त्या आत्मिक शांती आणि आनंदाला प्राप्त केल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपला परिवार आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना शांत करण्यात सहाय्यभूत ठरू. त्यानंतर ही शांतीची व्याप्ती हळूहळू समाज आणि राष्ट्र यांच्यातून विश्वभरात प्रसारित होईल. या प्रकारे आपण एक-एक करुन ही साखळी जोडून विश्वात शांतीची स्थापना करू शकू.

मनो-वैज्ञानिकांच्या मते समजाविले जाते की, कोणत्याही माणसाला दुसऱ्या कोणी माणसाने शिकवावं की त्याच्या करिता योग्य काय आहे? हे सांगितलेलं आवडत नाही. जर कोणी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती त्याचा विरोध करते. इतरांना हे सांगणं पुरेसं नाही की त्यांनी शांतीने जगावे. जर आपण इच्छित असू, आपल्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर व्हावा, तर आपल्याला ते आपल्या जीवनात प्रथम उतरविले पाहिजे. जर आपण ध्यान-अभ्यासाद्वारे आपल्या अंतरी शांति प्राप्त केली तर यामुळे आपले जीवन बदलून जाईल. आपण नेहमी शांत आणि प्रसन्न चित्त राहू, यामुळे इतर व्यक्ती सुद्धा जिज्ञासेने हे जाणण्याचा प्रयत्न करतील या खुशीचे रहस्य काय आहे? याच बरोबर हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतील की ही खुशी आणि शांती आपण कशाप्रकारे प्राप्त केली.

चला तर, आपण सुद्धा ध्यानाभ्यासाद्वारे आपल्या अंतरी शांतिचा दीपक प्रज्वलित करूया. ज्याचा प्रकाश इतरांना सुद्धा प्रकाशित करेल, जेणेकरून त्यांचे जीवन सुद्धा शांति आणि प्रकाशाने ओतप्रोत होईल, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने “अहिंसा दिवस” साजरा करू शकू.

- Advertisment -

ताज्या बातम्या