Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगBlog : स्वस्त गृहकर्ज : सरकारी की खासगी बँक?

Blog : स्वस्त गृहकर्ज : सरकारी की खासगी बँक?

गृहकर्जाबाबत सर्व सामान्यांच्या मनात अनेक प्रश्नांमुळे गोंधळ निर्माण हातो. गृहकर्ज कोणत्या बँकेमार्फत घेतले पाहिजे, सरकारी की खासगी? कोणत्या बँकेचे व्याजदर सर्वात कमी आहेत? स्वस्त गृहकर्जासाठी सरकारी बँक योग्य की खासगी बँक योग्य? याबाबत मार्गदर्शक लेख…

सध्या भारतात मंदीचे वातावरण आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची मोठी घसरण झाली आहे. मुदत ठेवींवरील व्याजदर मोठ्या प्रमाणात खाली उतरले आहेत. त्यामुळे गृहकर्जावरील व्याजदरदेखील कमी झाले आहेत.

- Advertisement -

आपण घर खरेदीचे प्लॅनिंग करीत असाल आणि गृहकर्ज घेऊ इच्छित असाल तर अतिघाई न करता विविध वित्तीय संस्था व बँक यांचे व्याजदर आणि इतर खर्च तसेच त्यासोबत मिळणारी सेवा-सुविधा याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.

प्रोसेसिंग फी हा एक महत्त्वाचा भाग आहे. काही बँका 1% टक्क्यापर्यंत फी घेतात तर काही 0% प्रोसेसिंग फी म्हणजेच प्रोसेसिंग फी 100% माफ करतात. याचबरोबर महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे व्याजदर असतात.

महिलांसाठी व्याजदरात काही विशेष सूट दिली जाते. अशा प्रकारच्या योजना बँकांमार्फत राबवल्या जातात. सहकारी बँकांमध्ये विविध कागदपत्रे, प्रोसेस जास्त व्यापक असते. त्यामुळे ग्राहक खासगी बँकांकडे सहजपणे वळतात. गृहकर्ज सामान्यपणे मोठ्या कालावधीच्या परतफेडीसाठी घेतलेले असते.

आपण आपल्या बचतीतील मोठा भाग गृहकर्ज फेडण्यात खर्च करतो. त्यामुळे गृहकर्ज घेण्याचा विचार करताना या सर्व बाबी माहीत असणे आवश्यक आहे.

खासगी (प्रायव्हेट) बँकेची प्रोसेसिंग फी व इतर खर्च तुलनात्मक जास्त असतो. परंतु त्या मोबदल्यात इतर सेवा-सुविधा तत्परतेने ग्राहकांना देण्याचे काम ते करतात. खासगी बँकेच्या तुलनेत सहकारी बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर कमी असतात.

परंतु काही खासगी बँकादेखील सहकारी बँकांच्या व्याजदराप्रमाणे गृहकर्ज देत आहेत. एसबीआय आपल्या ग्राहकांना आकर्षक योजना व विशेष सूट देत आहे. प्रारंभिक व्याज 6.90% वार्षिक दराने ऑफर करीत आहे.

ते 30 लाखांच्या गृहकर्जासाठी मर्यादित आहे. प्रोसेसिंग फी 100% माफ आहे. या प्रकारच्या योजना, विशेष सूट व व्याजदर ग्राहकांच्या ‘सीबील स्कोअर’वरदेखील अवलंबून असतात.

योगेश कातकाडे, फायनान्शियल एक्स्पर्ट, नवीन नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या