Blog : करोना आणि जागतिक होमिओपॅथी दिवस

नाशिक । Nashik

10 एप्रिल 1755 हा दिवस डॉ. सॅम्युअल हानेमन या महान शारभूत व होमिओपॅथीचे संस्थापक यांचा जन्मदिवस.हा दिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. 1796 साली डॉ. हानेमन यांनी होमिओपॅथी जगासमोर मांडली. ‘Smilia Similibus Curenter’ म्हणजेच ‘काट्याने काटा काढणे’. या सिद्धांतानुसार 225 वर्षांची होमिओपॅथी उपचारपद्धती जगातील नंबर दोनची झालेली आहे.

होमिओपॅथीमध्ये अनेक साधे किंवा असाह्य आजार बरे केले जातात. त्याचे कारण म्हणजेच प्रत्येक रुग्णाचे ‘वैयक्तिकरण’ (Individualisation) करूनच उपचार केले जातात. होमिओपॅथीक उपचार करीत असताना रुग्णाच्या आजारातील लक्षणांबरोबरच त्या रूग्णाची शारीरिक व मानसिक लक्षणे लक्षात घेऊनच उपचार केले जातात, म्हणूनच होमिओपॅथीने कुठलाही रुग्ण हा त्याच्या आजाराच्या मुळापासून कायमचे बरे केले जातात.

आजपर्यंत इतिहासात बरेच महामारीचे आजार येऊन गेले. जसे काळा आजार (1346-1353), स्पॅनिश फ्ल्यु (1918-1920), प्‍लेग (1855-1960), इन्फ्ल्युहेंझा (1957-1958), हाँगकाँग फ्ल्यु (1968-1969), कॉलरा (1846-1860) इत्यादी. तसेच 2019 ला कोव्हिड- 19ने संपूर्ण जगात थैमान मांडलेले आहे.

या आजाराची सुरूवात चीनपासून झाली आणि आज जगभरात हा आजार जाऊन पोहोचलेला आहे. जगामध्ये ज्या ज्या उपचारपद्धती आहेत, त्या सर्व उपचारपद्धती या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यात होमिओपॅथीसुद्धा अग्रेसर आहे. होमिओपॅथीमध्ये आपण सर्वसाधारण हा आजार आटोक्यात आणण्यासाठी 4 वर्ग करू शकतो.

1. प्रतिबंध (Prevention), 2. उच्चतम धोका असलेले (Hight Risk), 3. Covid बाधीत रुग्ण (Covid Positive), 4. Covid होऊन गेलेले रुग्ण (Post Covid Patient)

प्रतिबंध :

भारत सरकारच्या आयुष विभागातर्फे अर्सेनिक अल्बम 30 हे औषध रोज सकाळी 5 गोळ्या उपाशीपोटी सलग तीन दिवस घेतल्यानंतर कोव्हिड-19 ला प्रतिबंध करते. यानंतर पुन्हा पुढील 15 दिवसांनी ही कृती परत करावयाची आहे. असे आपण जोपर्यंत कोव्हिड-19चे वातावरण आहे तोपर्यंत करीत रहावे. बर्‍याच लोकांनी हे औषध घेऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती, या आजाराचा लढा देण्यासाठी वाढवलेली आहे. जनसामांन्यांपर्यंत हे वास्तविक व खरे औषध मिळण्यासाठी आपल्या नजिकच्या होमिओपॅथीक तज्ज्ञांकडूनच घ्या, असा सल्ला देऊ इच्छितो.

उच्चत्तम धोका असलेले रुग्ण (Hight Risk):

ज्यांचा संपर्क कोव्हिड-19च्या रुग्णांशी येतो, अशी लोकं म्हणजेच उच्चत्तम धोका असलेले रुग्ण यांना कोव्हिडची लागण होण्याची शक्यता जास्त असते. WHO ने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने या आजाराचा अटकाव करण्यासाठी तोंडावर व नाकावर मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, वारंवार हात स्वच्छ साबनाने / सॅनिटायझरने धुवा, उच्चतम धोका असलेल्या रुग्णांना अर्सेनिक अल्बम व कॅम्फर ही औषधी योग्य मात्रेत व वारंवार काही दिवस दिल्यास होमिओपॅथीने अशा लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते व कोव्हिड-19 चा आजार होण्याचा धोका बर्‍याच अंशी कमी होऊ शकतो. या औषधांच्या वापराचा सल्ला तुमच्या नजिकच्या होमिओपॅथीक तज्ज्ञांकडून घ्या.

कोव्हिड-19 पॉजिटिव्ह रुग्ण:

ज्यांना कोव्हिड-19ची लागण झालेली आहे, त्यांनी तर हे लक्षात घ्यावे की घाबरू नये. हा आजार सर्दी-खोकल्यासारखाच आहे व तो 15 दिवसांच्या उपचाराने हमखास बरा होऊ शकतो. आपण कुठल्याही उपचारपद्धतीचे औषध घेत असल्यास त्यासोबतसुद्धा कोव्हिड-19 पॉजिटिव्ह रुग्ण होमिओपॅथीचे औषधी घेऊ शकतात.

होमिओपॅथी तज्ज्ञ अशा रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्या लक्षणांनुसार वैयक्तिक उपचार करतात व असे आढळून आले की, 90-95% रुग्ण हे होम क्वारंटाईन राहूनच या होमिओपॅथीक औषधांनी बरे होत आहेत. होमिओपॅथीची औषधी कुठल्याही दुष्परिणामांशिवाय कोव्हिड-19च्या महामारिलासुद्धा बरा करण्यास मदत करते. यासाठी कोव्हिड-19च्या रुग्णांनी आपल्या नजिकच्या होमिओपॅथी तज्ज्ञांचा सल्ला घेणे.

कोव्हिड झाल्यानंतरचे रुग्ण:

काही 5-10% कोव्हिड रुग्णांना या आजारामुळे किंवा हा आजार बरे करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मॉडर्न औषधांच्या दुष्परिणामांमुळे फुफ्फुसाचे काठिण्य (Lung fibrosis) होते.अशा रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होते व अशा रुग्णांना बरेच दिवस किंवा बरेच महिने ऑक्सिजनची गरज भासू शकते. अशा रुग्णांनासुद्धा होमिओपॅथीच्या विशेष उपचाराने काही दिवसांतच फुफ्फुसातील काठिण्य बरा करून हळूहळू त्यांची नैसर्गिक ऑक्सिजन पातळी वाढते व असे रूग्ण निरामय आयुष्य जगू शकतात. यासाठी मी आपणास विनंती करेल की, आपल्या नजिकच्या होमिओपॅथीक तज्ज्ञांकडून विशेष उपचार घ्या.

कोव्हिड-19सारख्या महामारीमध्येसुद्धा होमिओपॅथी उपचारपद्धती प्रभावी ठरत आहे. आमचे नागरिकांना आवाहन आहे की, होमिओपॅथी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोव्हिडचा प्रतिबंध, उच्चत्तम धोका टाळण्यासाठी तसेच कोव्हिडबाधीत रुग्णांसाठी किंवा कोव्हिड झाल्यानंतर असलेल्या गुंतागुंतीच्या फुफ्फुसातील लक्षणांसाठी योग्य तो होमिओपॅथी उपचार घ्या व आजारातून घरच्या घरी राहून बरे व्हा.

अशा या कठीण महामारीच्या प्रसंगातही होमिओपॅथी शास्त्र प्रबळ ठरत असल्यामुळे या शास्त्राचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमन यांचे सर्व होमिओपॅथीक तज्ज्ञांतर्फे कृतज्ञता व्यक्त करून या आजच्या जागतिक होमिओपॅथी दिवसास शुभेच्छा देतो. होमिओपॅथी घ्या व घरच्या घरी बरे व्हा!!

– डॉ. योगेश घोंगडे, एम. डी. (होमिओपॅथी), गोल्ड मेडलिस्ट


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *