Blog : मैत्रीला नसते वय

Blog : मैत्रीला नसते वय
मैत्री दिन

Nashik | Friendship day

खरं तर मैत्रीला विशिष्ट दिवसाची गरज नसते. मग ते शाळा असो कॉलेज असो कि ऑफिस असो त्यांची धमाल मस्ती चालूच असते त्याना काही मैत्री मिरवायला वेळ काळ लागत नाही जरा संधी मिळताच यांची खेचाखेच म्हणा किंवा मस्करी म्हणा सुरु होते....(Friendship Day Special Article)

मैत्री अगदी बालपणापासून सुरु होते असं काही नाही ती कधीही कुणाशीही कोणत्याही वयात होते. पण बालपणापासून झालेली मैत्री ही नक्कीच घट्ट असते कारण त्यांनी शाळा कॉलेजात खूप वेळ एकत्र घालवलेला असतो.

प्रत्येक क्षणाचे ते एकमेकांचे साक्षीदार असतात. त्यात बालपणी एकमेकांच्या खोड्या काढणं असेल, चिडवणं असेल, दंगामस्ती असेल, किंवा त्याच्याऐवजी स्वतः मार खाणं असेल, बालपणी मित्राशिवाय कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही.शाळां कॉलेजात सोबत जायला, अभ्यासाला मित्र हवे, खेळायलाही मित्रच हवे, मित्राशिवाय सारंच अपूर्ण असतं. पुढं मोठे झाल्यावर मग एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतात.

अडीअडचणीत एकमेकांच्या कामी येतात. प्रसंगी जीवाची बाजीही लावतात. खरंच मैत्रीविना आयुष्य अपूर्ण असतं. कधी एखादा मित्र रुसला अबोला धरला तर सारखं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि सारे हेवेदावे विसरून लगेच एकत्र येतात.

लग्नानंतर दूर गेलेल्या मैत्रिणी तर माहेरी एकत्र येताच काय धमाल करतात. सारे संसारी व्याप विसरून काही काळ त्या पून्हा बालपण जगतात. अन तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. कुणी अनोळखी लोकांनी जर त्यांच्याकडे पाहिलं तर क्षणात ते ओळखणारच कि या नक्कीच मैत्रिणीच आहेत.कारण मैत्री म्हणलं कि वेगळं काही सांगायलाच नको मग. तेआपसूक त्यांच्या कृतीतून दिसणारच.

अन वार्धक्यातली मैत्री तर खूप हळवी असते. कारण बरंच आयुष्य जगून झालेल असतं. साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडून होतात. आयुष्याच्या संध्याकाळी मैत्रीची खूप गरज असते. कारण कोण कधी अखेरचा श्वास घेईल हे सांगता येत नाही त्यामुळे उरलेलं आयुष्य भरभरून जगण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो.

मैत्रीविना आयुष्य खरंच अपूर्ण असते.त्यामुळं मित्र कमवायलाच हवेत.किमान एकतरी जिवलग मित्र असावा ज्याच्याजवळ आपण आपलं मनातलं सारं व्यक्त करू शकू असा अगदीच जिवलग......

वंदना गांगुर्डे

नाशिक

सुसंवाद : 9403388699

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com