
आई (Mother) म्हणजे घराचे मांगल्य आणि वडील (Father) म्हणजे अस्तित्व.. हे अस्तित्व जो पर्यंत अस्तित्वात असते तो पर्यंत कुणाची हिम्मत नाही कुणी आपल्या नादी लागेल तर..खूपदा आईचे कर्तृत्व अनेकदा रेखाटले जाते पण वडिलांचं त्याग, कधी रेखाटला जात नाही. त्यांची शिस्त, कठोरता, निर्णय हे कुटुंब हितासाठी असतात हे खूप कमी लोकांना समजते. दिसतो फक्त "कडक बाप"...
पण दुनियादारी शिकवतो, आईसारखे हृदय नाही तर डोकं वापरून या जगात कस जगायचे हे वडील शिकवता. मग, कडक तर बनावेच लागेल ना, मुलाचे लग्न करताना मुलाच्या वडिलांची काय प्रॉपर्टी आहे, ही पहिली जाते. जबाबदारीचे ओझे पेलताना कधीतरी या "वडिलांची" होणारी दमछाक एकदातरी जवळून पाहा.घुसमटलेल्या त्यांच्या भावना ना एकदा तरी वाट मोकळी करून द्या. थकलेला खांदा वर एकदा तरी आभार रुपी हात ठेऊन वडिलांचे "आभार" माना.
मुलगा ब्रँडचे शर्ट घालतो, पण बापाच्या बनियानचे पडलेले भोक, तुटलेली चप्पल, घराचे हफ्ते, कुटुंबासाठी काढलेले कर्ज,हफ्ते भरताना होणारी लाचारी, एकदा तरी समजून घ्या. म्हणून प्रतेक वडिलांनी मुलांना एकदम लाडात न ठेवता, त्यांचे दुकानं किंवा व्यवहार सांगावा, कारण पैसा बाप आणतोय, मूल उडवतात, पण आपल्या बाईकचा धूर सोडत असताना वडिलांचे (Father) कष्टाचे पैसे नी पेट्रोल टाकलंय, ते विसरू नका.
मी माझ्या घरात माझे मिस्टर ना बघते, ते एक "आदर्श वडील" आहेत. माझे मूल त्यांचा सोबत प्रत्येक गोष्ट शेअर करतात. कुठलीही भीती, दबाव, संकोच त्यांच्यात नसतो. वेळ प्रसंगी मूल कुठे चुकले तर "का आणि कस" या वर त्या तिघांचे तास तास भर चर्चा चालते. आणि मी आई म्हणून मनोमनी सुखावते, की "दोन मुले आम्ही पालक म्हणून आनंद घेऊन घडवत आहोत. कारण ते पण भावी कुणाचे तरी वडील बनतील तेव्हा हेच संस्कार पुढे जातील.
- शीतल विसपुते