शब्दाचीया मोल जाणू आता..

भाषेतील शब्द हे माणसे जोडण्याचे काम करत असते. आपण शब्दांनी एकमेकाच्या जवळ येतो. भाषेतील संवादाने आपले नाते जोडले जात असते. आपणही एकमेकाच्या जवळ येतो तेही भाषेनेच. जेव्हा कधी प्रवासासाठी, प्रशिक्षणासाठी एखाद्या वेळी दुस-या राज्यात जातो तेव्हा तेथे अनेक राज्यातून.... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
शब्दाचीया मोल जाणू आता..

खरेतर आपला सारा जीवन व्यवहार हा भाषेवर अवलंबून असतो. भाषा हे संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. भाषा न शिकताही आपण बोलत असतो.. पण आपण जेव्हा भाषा शिकतो तेव्हा भाषेतील शब्दांचा अर्थ जाणायचा असतो. शब्दांचे अर्थ सांगणे, ऐकणे, जाणणे या शब्दांमधून आपण बरेच काही अधोरेखित करत असतो. ही शब्द समान नाहीत, त्यामागे एक खोल अर्थ दडलेला आहे.

मात्र अर्थांचा शोध घेता होणारा संवाद आणि अर्थ न समजून घेता केले जाणारे श्रवण यामुळे कदाचित संवाद पुढे जाईलही,मात्र अर्थ जाणता आला तर अनेकदा एखाद्या शब्दाची खोल जखम मनावर कायमची वर्ण देऊन जात असते.त्यामुळे शब्दांचा व्यवहार ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.उच्चारलेला शब्द आपल्या मनात शब्दांच्या अर्थाने एक प्रक्रिया सूर होत असते.शाळेतील उणिवा समजून घेण्यासाठी आणि लोकमत जाणून घेण्यासाठी एक पेटी लावण्याचा आदेश होता. त्या पेटीला तक्रार पेटी असे नामकरण केलेले होते.

सर्वांनी त्यावर तक्रार पेटी असेच लिहिले होते.शब्दांच्या प्रेमात असलेल्या एका मुख्याध्यापकाने त्यावर सूचना पेटी अशी सुधारणा केली.आता दोन्ही शब्दांचे अर्थ भिन्न आहेत.मात्र उददेश शाळेच्या उणिवा,कमतरता समोर याव्यात आणि सुधारण घडाव्यात असेच अपेक्षित आहे.मात्र तक्रार पेटी असे वाचल्यावर मनात निर्माण होणारे भाव आणि सूचना पेटी असे वाचल्यावर निर्माण होणारे भाव भिन्न आहेत.सूचना पेटीत संवादाची शक्यता अधिक आहेत.तर तक्रारपेटीट संवादा ऐवजी व्देषाचे भाव अधिक असण्याची शक्यता आहे.त्यामुळे शब्द हेच व्यक्तीच्या जीवनावर सर्वाधिक परिणाम करत असतात.

त्यामुळे शाळेत भाषा शिकवत असताना केवळ भाषेचे व्याकरण शिकून न थांबता शब्दांचे अर्थ,त्यातील खोली,व्याप्ती,छटा यांचा विचार करायला हवा. आपण त्यानंतर अंतर आहे.ज्याला अर्थ सांगता आपण शिक्षण घेत असताना भाषा शिकत असतो.भाषेतील प्रत्येक शब्दाला काही अर्थ असतो.त्या प्रत्येक शब्दाला एक व्याप्ती असते.मात्र अनेकदा भाषेचा उपयोग इतका सहजतेने होतो की,आपण त्यात काही चुक करत आहोत का ? याचाही विचारही मनात येत नाही.शब्दांना स्वतःचा अर्थ असतो,त्या अर्थालाही एक व्याप्ती असते.मात्र शब्दांच्या जंजाळात आपण कोणते शब्द वापरतो याचेही भान राहात नाही.खरेतर शब्दांवरती प्रेम केले ,त्यांना जाणून घेतले तर बोलणे सहजतेने अधिक जबाबदारीने होण्यास मदत होईल.तुकोबा राय म्हणाले होते ,तुका म्हणे आम्हा घरी शब्दाचीच रत्ने ,शब्दचीच धन वाटू लोका.

शब्द हे किती महत्वाचे आहेत हे संतानी आपल्या साहित्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितले आहे.त्यामुळे शब्दांच्या बाबतीत अधिक जागृकता दाखवायला हवी असते.अनेकदा एखादा साहेब येतो आणि एवढेही तुम्हाला करता येत नाही का ,चला असे करा.हे वापरलेले शब्द आणि दुसरा एखादा अधिकारी सहजतेने म्हणतो की,सर आपण असे करूया का..असे केले तर खूप छान होईल असे वाटते.या दोन्ही वाक्यांचा उददेशे समान आहे.मात्र शब्दांची रचना चुकल्याने एका व्यक्तीबददल आपुलकीची भावना निर्माण होईल आणि दुस-या व्यक्तीबददल व्देष व तिरस्काराची भावना निर्माण होईल.शब्दांच्या उपयोजनावर आपल्या नात्याची वीण अधिक घटट होणार असते.त्यामुळे शब्दाचे मोल जाणायलाच हवे..अन्यथा शब्द हे शस्त्र ठरण्याची शक्यता अधिक आहे.

भाषेतील शब्द हे माणसे जोडण्याचे काम करत असते.आपण शब्दांनी एकमेकाच्या जवळ येतो.भाषेतील संवादाने आपले नाते जोडले जात असते. आपणही एकमेकाच्या जवळ येतो तेही भाषेनेच. जेव्हा कधी प्रवासासाठी,प्रशिक्षणासाठी एखाद्या वेळी दुस-या राज्यात जातो तेव्हा तेथे अनेक राज्यातून लोक एकत्रित येतात. खरेतर सारी माणस आहेत ,एकाच देशातील आहेत तरीपण आपण आपली भाषा बोलणारी कोण कोण माणस आहेत ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो.मग आपली भाषा बोलणारी माणस आपल्या प्रांतातील कोणत्याही जिल्ह्यातून आलेले असले तरी आपण हात हातात घेतो.

पालघरच्या व्यक्तीला नागपूरचा माणूसही जवळचा वाटत असतो. पण आपल्यात राज्यात तसे घडत नाही,तेथे आपण आपल्या जिल्ह्यातील ,तालुक्यातील व्यक्तींचा शोध घेत असतो. भौतिक दृष्टया इतके अंतर असूनही माणस मनाने जवळ येतात ते कसे ? त्यामागे एकमेव कारण असते भाषा.भाषेने मने जुळली जातात.त्या माध्यमातून आपण विचाराची देवाणघेवाण करत असतो.एकमेकाला समजून घेत असतो.भाषा ही अंतरिक विचार प्रगटीकरणाचे माध्यम आहे.त्यामुळे भाषा आणि तिचे शब्द हे जपूण वापरण्याची गरज आहे.भाषा ही जशी एकमेकाला जोडण्यासाठी उपयोगी पडते त्याप्रमाणे ती तोडण्याचेही काम करत असते.त्यामुळे शिक्षण हक्क कायदा आस्तित्वात आल्यानंतर कलम १७ ची तरतूद करण्यात आली.त्या कलमात शारीरिक शिक्षेस प्रतिबंध करण्यात आला.छडीची शिक्षा नकोच...आणि हाताने मारणेही नको..शारीरिक शिक्षेचे वळ मुलांच्या मनावर विपरित परीणाम करत असतात.ते शरीरावर जसे उमटतात त्याप्रमाणे त्याचा मनावर देखील खोल परिणाम होत असतो.

या शिक्षेने मानसिक धक्का बसतो..त्यातून व्देष निर्माण होतो..या कलमात मानसिक शिक्षा करण्यास देखील प्रतिबंध करण्यात आला आहे.मानसिक शिक्षा करताना आपण मुलांना टाकून बोलत असतो.टाकून बोलण्यात शब्दांचेच उपयोजन असते.शब्द मनाच्या पटलावर परिणाम करेल इतके धारधार असतात का ? त्याचे उत्तर होय असे आहे.मानस शास्ज्ञाच्या मते शब्द हे प्रत्येकानेच जपूण वापरण्याची गरज असते.जे शब्द हे ओवी म्हणून पुढे येतात तेच शब्द शिवी म्हणून देखील पुढे असतात.ओवी गायली तर पुण्य मिळते आणि शिवी तर व्देष व मत्सर वाटयाला येतो.त्यामुळे आपण शब्दांचे उपयोजन करताना विचार करावा लागतो.मुलांच्या मनावर शब्दांचा खोलवर परिणाम होत असतो.प्रबलन करणारे शब्द असतील तर मुलांच्या जीवन व्यवहारात हे शब्द प्रेरक बनतात आणि ते शब्द मुलांच्या मनावर खोल परिणाम करणारे असतील तर निराशेची छाया मुलांच्या वाटयाला येण्याची शक्यता अधिक आहे.त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात आपण मुलांशी जितका संवादात गोड शब्दांची पेरणी करून करू तितक्या मोठया प्रमाणावर प्रसन्नता उंचावेल,त्यामुळे गोड अनुभव वाटयाला येतील.

आता अनुभव व त्यातील आनंद,समाधान,सुखाचे अनुभव हे शब्दांच्याच जोडीने येत असतात.त्याचबरोबर दुःखाचे अनुभव हे देखील शब्दांच्या जोडीने अनुभवले जातात.त्यामुळे शब्द हेच व्यक्तीच्या जीवनात आनंद व दुःखाच्या निर्मितीला कारणीभूत आहे.शब्द हे संवादाची उंची वाढवितात त्याप्रमाणे संवादाची उंची देखील कमी करत असतात. शब्दांचे उपयोजन करताना अर्थ समजून न घेता उपयोगात आणले तर वापरण्याची प्रतिमा हरवण्याची शक्यता अधिक आहे.प्राचार्य शिवाजीराव भोसले हे असेच शब्दाचेच पुजारी आहेत.शब्दांच्या प्रेमाने या माणसाला नाव मिळाले.शब्दांनी त्यांना समाजमनाच्या एका उंचीवर नेले.

मात्र शब्दांचे उपयोजन चुकले तर फटफजीती देखील होत असते हेही लक्षात घ्यायला हवे. परवा एका कार्यक्रमात सूत्रसंचालक व्यासपीठावर एका दांपत्याला निमंत्रित करत होता आणि तो पुन्हा पुन्हा म्हणत होता “ श्री....यांनी त्यांच्या विद्यमान पत्नीसह व्यासपीठावर उपस्थित राहवे ” यातील विद्यमान पत्नी या शब्दांने काय बर अर्थ अधोरेखित होतो ? माजी ,भावी पत्नी असे काही असते का ? अनेकदा आपण श्रध्दांजली,आंदराजली,भावांजली असे शब्द प्रयोग उपयोगात आणत असतो...पण ते शब्द नेमके कधी उपयोगात आणायचे असतात याचा विचार करायला हवा असतो.

आपल्याला रोजच्या जीवन व्यवहारात आपल्यासाठी कोणी कौतुकाचे शब्द वापरले तर आपल्याला त्यातून मिळणारी प्रसन्नता आणि आनंद हा अधिक बल वाढविणारा असतो.मात्र शब्दांच्या स्थानात बदल केला तर होणारा परिणाम नकारात्मक असतो.अनेकदा आपण राम म्हटल्यावर निर्माण होणारा भाव आणि त्याच अक्षरांचे स्थान बदलल्यावर निर्मिला जाणारा अर्थ यात भिन्नता आहेच.त्यामुळे जीवनात आपण कोणत्या दिशेने प्रवास करू पाहतो त्याचा विचार करायला हवा.

ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात की, आपण शब्दांची व्याप्ती जाणून घ्यायला हवी.शब्दांमधूनच निंदा घडते आणि शब्दांच्या माध्यमातून स्तुती देखील घडत असते.त्याचा परिणाम म्हणून समोरच्याच्या कानावर ते शब्द पडले की, त्यातूनच व्देषभावना,क्रोध निर्माण होत असतो.शब्दांच्या माध्यमातून लोभ व प्रेमाचे भाव निर्माण होत असतात.त्यामुळे शिक्षणातून आपण शब्दांचे मोल जाणण्यास शिकविले तर समाजातील संघर्षाचे प्रश्न सुटू शकतात.शेवटी शब्दांनी युध्द पेटते आणि शब्दांनीच शांतता प्रस्थापित होते .त्यामुळे शब्दांची संपती वाढविण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करताना मुलांना शब्दांची व्याप्तीची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥ ज्ञानेश्वरी

- संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

Related Stories

No stories found.