घर हीच शाळा...

प्रत्येक पालकांला आपला पाल्य अधिक चांगला घडावा असे वाटत असते. आपल्या पाल्यांने भविष्यात काय बनावे याचे स्वप्न पालक बघत असतात. त्या स्वप्नाची पूर्ती व्हावी याकरीता ते संस्काराची पुस्तके आणून देत असतात. आपल्या आवडीप्रमाणे शिकविण्या लावतात. सदाचारासाठी संस्काराचे पाठाचे उपदेश पाजणे सातत्याने सुरूच असते. मात्र... शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक संदीप वाकचौरे यांची ‘शिक्षण भवताल’ ब्लॉग मालिका...
घर हीच शाळा...

मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार बालकाच्या विकासाच्या प्रक्रियेत पहिल्या पाच वर्षातच मेंदूचा 80 टक्के विकास होत असतो. ही पहिली पाच वर्ष मुलं औपचारिक शिक्षणाच्या प्रक्रियेत देखील सक्रीय सहभागी झालेली नसतात. त्यामुळे शिक्षणाच्या प्रक्रियेत मुलांना विकासासाठी किती संधी असते याचा विचार करण्याची गरज आहे.

या वयात मुले आपल्या अवतीभोवती जे पाहातात, ऐकतात त्यानुसार भविष्यासाठीची आपली वाट निर्माण करीत असतात. बालकांच्या जीवनाचा पाया घालण्याची शक्ती घर आणि पालकांमध्ये असते. त्यामुळे घर जर सुंदर विचाराने फुललेले, बालकांचे स्वातंत्र्य जपणारे, संवादक असेल तर आपल्याला भविष्यात ज्या स्वरूपाचे बालक हवे आहे त्या स्वरूपात जडणघडण शक्य आहे. त्या दिशेने पेरणी करीत, कृती करीत राहीले तर निश्चित फळ मिळेल. त्यासाठी घर हीच बालकांच्या विकासाची शाळा बनायला हवी. शाळा म्हणजे केवळ पुस्तकांतील माहितीचे विश्लेषण करणारी, वेळापत्रकाप्रमाणे तासिका पूर्ण करून जबाबदारी झटकणारी, आणि पोपटपंची करणारी व्यवस्था नसते. ती एक जगण्याच्या वास्तूपाठाचे दर्शन घडविणारी, नात्याने घट्ट वीन बांधणारी महत्वाची व्यवस्था असते. त्यामुळे जशी शाळा असते त्याप्रमाणे घर असायला हवे. केवळ उपदेशाचे डोस पाजत ,मोठेपण मिरवत होणारी पेरणी म्हणजे केवळ उपचार ठरतात.

घर हीच शाळा...
तुम्ही फक्त इतकेच करा..!

प्रत्येक पालकांला आपला पाल्य अधिक चांगला घडावा असे वाटत असते. आपल्या पाल्यांने भविष्यात काय बनावे याचे स्वप्न पालक बघत असतात. त्या स्वप्नाची पूर्ती व्हावी याकरीता ते संस्काराची पुस्तके आणून देत असतात. आपल्या आवडीप्रमाणे शिकविण्या लावतात. सदाचारासाठी संस्काराचे पाठाचे उपदेश पाजणे सातत्याने सुरूच असते. मात्र अशा पध्दतीने सारे पेरूनही मुले मात्र भविष्यात पालकांच्या इच्छेप्रमाणे दृष्टीक्षेपात दिसत नाही. मुलांसाठी माहितीचा साठा आणि उपदेशाचा डोस दिल्यांने त्यांच्यात केवळ बदल घडेल पण परीवर्तन मात्र अशक्यच. केव्हातरी छत्रपती शिवरायाचे चरित्र वाचतांना आई जिजाईने बाल शिवाजी यांना प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण यांच्या चरित्र कथा ऐकविल्या त्यामुळे राजे छत्रपती महाराजांची जडणघडण झाली हे आपल्याला वाचायला मिळते.

खरच केवळ गोष्टी सांगून राजे घडले गेले असतील का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. राजांना गोष्ट सांगणारी माता मिळाली. त्यांनी आदर्श विचाराची पेरणी गोष्टीच्या माध्यमातून केली पण त्या पलिकडे त्यांचे माता, पिता यांचा जीवनव्यवहार त्या आदर्शांच्या वाटेचा होता. गोष्टीतून जे जे उत्तमोत्तम रूजवायचे आहे तो विचार त्यांच्या जीवन व्यवहाराचा भाग होता. मुलांना जे सांगितले जाते आणि प्रत्यक्षात जे दिसते यातील विचार कळत जातो. प्रत्यक्ष जगणे आणि आदर्श विचार यांच्यात फारकत झाली की बालकांवरती संस्कार रूजत नाही. बालक त्यांच्या वाटा स्वतःच शोधत चालत राहातात. त्यामुळे आपण त्याला जे सांगू पाहातो तेच त्याला भवताल मध्ये दिसायला हवे असते. सांगणे आणि दिसणे यातील अंतर जाणण्याइतके शहाणपण बालकात असते. बालक हे केवळ मोठयांचे प्रतिरूप नाही तर ते स्वतंत्र्य व्यक्ती आहे हे लक्षात घ्यायला हवे.

घर हीच शाळा...
आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

कोणतेही बालक ऐकून काही शिकत नाही, तर ते अनुकरणाने शिकत असते. त्यामुळे घरात आपण आपल्या आवडी प्रमाणे आणि सदाचाराने मुलांना शिकवत आहोत हा गैरसमज आहे. रोज सुविचाराची पेरणी करायची, भजन संध्या करायची आणि जीवन व्यवहारात त्या विचाराचे दर्शन घडले नाही तर मुलांना कळत नाही, की जे विचार सांगितले गेले ते खरे, की प्रत्यक्ष मोठी माणंस वागतात ते खरे. मुळात मुलांच्या समोर सर्वात मोठा आदर्श हा जगण्याच्या पाऊलवाटेचा असायला हवा. एका कुटुंबात पालक रोज सुविचाराची पेरणी करायचे. मुलाला नियमितपणे सुविचार सांगायचे. त्याला जो सुविचार सांगितला आहे तो त्याला वहीत लिहिण्यास सांगत असायचे. तो विचार त्याला पाठ करायचा आग्रह करायचे. जणू त्याचा त्यांने जप करायचा. मुलांने तो विचार रोज पाठ करून सातत्याने घोकावे असा प्रयत्न त्यांचा नियमित असायचा. मुलही मोठयांचा आग्रह म्हणून सांगितल्याप्रमाणे करण्यात रस घेत होते. मात्र सुविचाराचे पाठांतर सुरू होते. आपण पाठ करतो पण त्या पाठांतर का करायचे हा प्रश्न मुलांनाही पडत असे.

एके दिवशी नेहमी सत्य बोलावे, संकट आले तरी सत्यापासून आपण मागे हटता कामा नये असे पालक सांगत होते. त्याच दिवशी अचानक किराणा दुकानदार उधारी मागण्यासाठी घरी येत असतांना पालकांना दिसतात. तो आता आपल्या घरी येतो आहे हे पाहिल्यावर आता काय करायचे? म्हणून त्यांनी दारातील चप्पल जोड लपविला. बायकोला त्यांनी जवळ बोलावून सांगितले, की “तो दुकानदार घरी येईल, तो उधारी मागण्यसाठी येतो आहे.. तो माझी चौकशी करेल तेव्हा त्याला सांग मी घरात नाही. कधी येईल असे विचारले तर आठवडाभराने येईल असे सांग. मी तो पर्यंत घरातच लपून बसतो”. घडलेही तसेच, दुकानदार दारात आला, तोच बायकोने नव-यांने सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद नोंदविला. पुढील आठवडयात या असे सांगितले. दुकानदार निघून गेला.. पण घरातील बालक हे सर्व पाहात होते. आपणाला काल सांगितलेला सुविचाराचा अर्थ खरा, की आज बाबा वागले ते खरे? हा प्रश्न त्याच्या समोर होता. अर्थात त्याला विचाराचे स्वातंत्र्य होते कोठे? मुलांनी असे मनात येणारे प्रश्न विचारले की तो मोठयांना लहानानी केलेला आघावपणा वाटतो.. लहान तोंडी मोठा घास घेतला असे वाटू लागते.पण त्यांचे प्रश्न म्हणजे सत्याचा प्रवास असतो.. पण तो प्रवासच मोठयांसाठीची अडचनीचा असतो.

घर हीच शाळा...
आपण मुलांना गृहित का धरतो?

जसे घरी घडते तसेच कमी अधिक प्रमाणात शाळेतही घडत असते. अनेकदा आपण शाळेत देखील लोकशाहीचा विचार रूजवत असताना लोकशाहीची प्रक्रिया नागरीक शास्त्राच्या व्दारे शिकवत असतो. लोकशाहीत सर्व प्रकारच्या विचाराचे स्वागत असते. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक विचाराचे मांडण्याचे स्वातंत्र्य मान्य करीत, वाद, संवादातून विचार समृध्द होत जातात. अशी विचाराची पेरणी अध्यापनातून केली जात असली तरी त्या विचाराच्या पेरणीसोबत लोकशाहीच्या या विचाराचे वातावरण भवतालमध्ये प्रतिबिंबीत व्हायला हवे असते. मात्र शिक्षक जर हातात काठी घेऊन मी सांगतो तेच ऐक असे म्हणून आग्रही भमिका लादत असेल तर लोकशाही शिकूनही प्रत्यक्ष जीवनव्यवहारात लोकशाची रूजण्याची शक्यता नाही.

हातात काठी घेऊन लोकशाहीचे धडे, विचार कसे रूजविणार हा प्रश्न मुलांच्या मनात असतो. मात्र त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य ना घरात असते.. ना शाळेत.. ना समाज व्यवस्थेत. खरेतर मुले अनेकदा मुलगामी विचार करीत असतात. त्यांना अनेकदा प्रश्नही पडतात. मात्र त्या प्रश्नाची उत्तरे देण्याची हिम्मत मात्र मोठयांनी गमावलेली असते. त्यामुळे आपण बोलत असलो तरी त्या बोलण्यापेक्षा कृतीचा विचार महत्वाचा असतो. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञ गिजूभाई बधेका यांनी व्यक्त केलेले विचार शिक्षण आणि घरात कार्यरत असलेल्या प्रत्येकांने विचार करायला भाग पाडणारा आहे. त्यामुळे केवळ माहितीचे शिक्षण देऊन फार काही परीणाम होत नाही. आपण केवळ सुविचाराची पेरणी करीत राहीलो आणि विचाराची कृतीचे दर्शन घडविले नाही तर ती मोठी चूक असणार आहे. पाल्यांसाठी पालक आणि घर हीच मोठी शाळा आहे. तेथे ते जे पाहातात आणि ऐकतात त्याच वाटेने प्रवास बालक करीत राहातात.

घर हीच शाळा...
...तर पृथ्वीवरती अवतरेल स्वर्ग

मुलांच्या शिक्षणाचा प्रवास हा केवळ अनुकरणाने होतो त्यामुळे आपण मुलांच्या समोर केवळ विचाराची शब्दबंबाळ पेरणी करण्यावरती भर देण्याऐवजी त्यासाठी करावयाच्या कृतीची पेरणीवर भर देण्याची गरज आहे.छत्रपती केवळ गोष्टी ऐकून घडले नाही तर त्यांच्या समोर त्या विचाराची दिशा घेऊन जगणारी माणंस घरात होती.निष्ठेचा प्रवास होता त्याप्रमाणे निरपेक्षता,समाजासाठी काम करण्याची वृत्ती, सदविचाराची कास,धारणा,विवेकाचे दर्शन होते म्हणून ते ते वाट चालत राहिले हे लक्षात घ्यायला हवे.आपण मुलांवर असे काही पेरत राहिले तर उगविण्याची शक्यता फार नसते.शिकणे केवळ माहिती पेरून रूजत नाही.त्यामुळे आपणाला जे काही रूजवावे वाटते त्यांनी घरातच त्याचा आदर्श वर्तन परीणाम अधोरेखित करण्याची गरज आहे.

आपण जगणे आणि विचार यात अंतर पडत गेले की संस्काराचे दर्शन दुर्लभ होण्याची शक्यता अधिक आहे.त्यामुळे मुलांनी ज्या वाटेने चालावे असे वाटते त्याच वाटेने घरातील लोकांनी चालण्याची तसदी घेण्याची गरज आहे.मुले व्यसने करणारी नको आहे..तर आपण व्यसने टाळली पाहिजे..मुलांनी मोबाईलमध्ये वेळ वाया घालू नये असे वाटत असेल तर आपणच मोबाईल कमी करण्याची गरज आहे..मुलांनी पुस्तके वाचावी असे वाटत असेल तर आपण पुस्तके वाचायला हवी आहेत.मुलांनी स्वतःला कामात गुंतून घ्यावे असे वाटत असेल तर आपणच स्वतःल गुंतून घ्यायला हवे..मुलांनी शुध्द बोलावे आणि लिहावे असे वाटत असेल तर आपणही तीच वाट चालायला हवी..इतकेच..एकदा का लहान मुलांना आदर्शाची वाट बोट धरून चालण्याची वृत्ती,सवय जोडली गेली तर ती चालत राहातात..पण या टप्प्यावरती ती बिघडली तर मात्र मग मुलांना देवही वाचवू शकत नाही..म्हणून पालक व शिक्षक म्हणून एका निर्मळ अंतकरणाने शुध्द विचाराची वाट चालत राहाण्याचा प्रयत्न करून पाहायला हवा.

गिजूभाई म्हणतात त्या प्रमाणे..

पालकाना जर वाटत असेल,

की त्याच्ंया आवडीप्रमाणे आणि सदाचाराने

ते मुलांना शिकवत आहेत

तर ती त्यांची फार मोठी चूक आहे

पालक आणि घर हीच खरी मोठी शाळा आहे

घरामंध्ये बिथरलेल्या मुलांना देवही वाचवू शकत नाही.

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com