Sunday, April 28, 2024
Homeब्लॉगशोध सामर्थ्याचा : सेवेला महत्त्व देणारे डॉक्टर गिरीश सहस्त्रबुध्दे

शोध सामर्थ्याचा : सेवेला महत्त्व देणारे डॉक्टर गिरीश सहस्त्रबुध्दे

डॉक्टर-पेशंट (Doctor-patient) यातील व्यवहार हा एकतर्फी नसावा. पेशंटने दिलेल्या पैशाचे त्याला रिटर्न मिळाले पाहिजे. किंबहुना जास्त रिटर्न दिले गेले तरी चालेल. पैशासाठी (Money) कुणाला अडवायचे (Not to be outdone) नाही हा नियम आयुष्यभर पाळला. आजही दवाखान्यात फी बाबतचा बोर्ड नाही. पेशंट जे देतील ते घ्यायचं. मिळाले ते आपले ही वृत्त्ती आजवर जोपासली. त्या वृत्त्तीने जीवनात आनंद (Happiness) दिला. गरीबांचे डॉक्टर (doctor of the poor) म्हणून सुविख्यात असलेले डॉ.गिरीश सहस्त्रबुध्दे (Doctor Girish Sahastrabuddhe) सांगत होते.

डॉक्टर मुळचे जळगावचे. वडील खान्देश मीलमध्ये नोकरीला. शालेय शिक्षण जळगावलाच झाले. घरची आर्थिक स्थिती सामान्य असली तरी आपण शाळेत चांगले गुण मिळवू शकतो हे त्यांच्या लक्षात आले आणि बारावीत चांगले गुण मिळवून पुण्याला मेडिकलला प्रवेश मिळवला. घरच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असल्याने आपल्याला दरवर्षी पास व्हायलाच हवे हा प्रथम पासून पुण्याला मेडिकलला गेल्यावर संकल्प केला आणि मेडिकलची साडेचार वर्ष सलग उत्त्तीर्ण होत गेले. एमबीबीएसला गुण चांगले मिळाल्याने नंतर एम.डी.ला प्रवेश मिळाला, दरम्यान जळगावची खान्देश मील बंद पडली. वडिलांची नोकरी गेली त्यामुळे घरच्या परिस्थितीचा विचार करीत एम.डी.चा विचार रद्द करत सरळ जळगावला आले आणि आपल्या खान्देश मील कॉलनी परिसरातच राहत्या घरात अन्य गोष्टीकडे लक्ष न देता आपली बुध्दी वापरण्यासाठी पेन आणि पेशंटचे प्रेम ही दवाखान्याची गुंतवणूक मानून एक खुर्ची आणि पेशंटला तपासायला एक बाक एवढया साहित्यावर दवाखाना सुरू केला. फी केवळ दोन रूपये. पहिल्या दिवशी स्व कमाईचे 28 रू मिळाले याचा खूप आनंद झाला. आजही पेशंट आणि डॉक्टरची बसायची तिच खुर्ची आणि पेशंट तपासायचा तोच बाक आहे, डॉक्टर गिरीश सांगत होते.

इंजेक्शन न देणारा डॉक्टर…! सध्या भरमसाठ औषधे लिहून देण्याची काहींची प्रवृत्त्ती झालेली आहे, डॉ.गिरीश मात्र गरजे पुरती औषधे देतात. दोन दिवसांचे औषध देऊन गरज वाटली तर या असा सल्ला देतात. गोळया दिल्यानंतर पेशंट बरा होतो तर इंजेक्शन कशासाठी द्यायचे? असा साधा सरळ सवाल करत गेल्या 25 वर्षात आपण एकाही पेशंटला इंजेक्शन दिले नसल्याचे देखील डॉ.सहस्त्रबुध्दे सहज सांगतात. इंजेक्शन न देणारा डॉक्टर अशी ओळख झाल्याने इंजेक्शनला घाबरणारी लहान मुले त्यांच्याकडे येऊ लागली. पाठोपाठ त्यांचे आईवडीलही येऊ लागल्याचे ते सांगतात. डॉक्टर आणि इंजेक्शन नाही ही संकल्पना नवीन डॉक्टांना सहन होत नाही. त्यामुळे एका युवा डॉक्टरने आपल्या दवाखान्यात येऊन डॉक्टर इंजेक्शन शिवाय प्रक्टीस कशी करतात ते प्रत्यक्ष येऊन पाहिले आहे.

- Advertisement -

35 वर्षात काय कमावले याचा हिशोब मांडतांना 35 वर्षापूर्वी जो पेशंट होता तो आजही माझा पेशंट आहे. पेशंटची तिसरी पिढी येत आहे असे सांगत 35 वर्षानंतर पेशंटचा सतत फॅलोअप घेण्याची वृत्त्ती आणि निरीक्षण शक्ती यामुळे आलेल्या पेशंटचा लगेच अंदाज येतो. प्रारंभीच्या दहा बारा वर्षाच्या काळात पेशंट रात्री बेरात्री येत असत, पण त्यांना कधीही परत पाठवले नाही. बाहेर रिक्षात देखील पेशंटला तपासले. त्यामुळे आज पिढीजात पेशंट टिकून आहेत. फॅमिली डॉक्टर या संकल्पने बाबत बोलतांना डॉक्टर सहस्त्रबुध्दे सांगतात, पूर्वी गाव लहान होते. लोकांजवळ वाहने नव्हती, त्यामुळे डॉक्टर पेशंटपर्यंत पोहचत होते. आज गाव मोठे झाले आहे, घराघरात वाहने आली आहेत, त्यामुळे पेशंट लगेच डॉक्टरांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचे पेशंटच्या घरी जाण्याचे प्रमाण कमी झाले.

आजवर कधीही कुणालाही पैशासाठी अडवले नाही. पैसे नसले तर नंतर देतो असे सांगत गरीब पेशंट पैसे न देता सरळ निघून जातात, मी त्यांना कधीही पैसे मागत नाही. नंतर येऊन ते देऊन जातात पण श्रीमंत मात्र पैसे देण्याचे सोईस्कर विसरून जातात असा अनुभव डॉक्टर घेतात. सध्या भरमसाठ औषधे लिहून देण्याची काहींची प्रवृत्त्ती झालेली आहे, डॉ.गिरीश मात्र गरजे पुरती औषधे देतात. दोन दिवसांचे औषध देऊन गरज वाटली तर या असा सल्ला देतात. गोळया दिल्यानंतर पेशंट बरा होतो तर इंजेक्शन कशासाठी दयायचे? असा सवाल ते करत गेल्या 25 वर्षात आपण एकाही पेशंटला इंजेक्शन दिले नसल्याचे देखील सहज सांगतात. इंजेक्शन न देणारा डॉक्टर अशी त्यांची किर्ती झाल्याने इंजेक्शनला घाबरणारी लहान मुले त्यांच्याकडे येऊ लागली. पाठोपाठ त्यांचे आईवडील देखील येऊ लागल्याचे ते सांगतात. डॉक्टर आणि इंजेक्शन नाही ही संकल्पना नवीन डॉक्टांना सहन होत नाही. त्यामुळे एका युवा डॉक्टरने आपल्या दवाखान्यात येऊन डॉक्टर इंजेक्शन शिवाय प्रक्टीस कशी करतात ते प्रत्यक्ष येऊन पाहिले आहे.

दारू पिणारा एक जण दारू सोडण्या बाबत कुणाचेही ऐकत नव्हता. पण डॉ.गिरीश यांनी प्रेमाने समजावले आणि त्याने दारू सोडली. नंतर रिक्षा चालवू लागला. दोन पैसे खिशात पडू लागले. जीवन सुरळीत झाले. हे या डॉक्टरांमुळेच घडले म्हणून जाता येता दवाखान्याला बाहेरून नमस्कार करू लागला. पण आत येण्याची हिंमत होत नव्हती. अखेर अनेक वर्षानंतर त्याने दवाखान्यात येऊन डॉक्टरांना नमस्कार केला. मी आयुष्यात काय कमावले हे याचे उत्तर… डॉ.गिरीश सहस्त्रबुध्दे सांगत होते.

कोरोना काळात डॉक्टर सेवा देत होते. प्रत्येक पेशंट धन्यवाद आणि डॉक्टर तुम्ही स्वत:ची काळजी घ्या असे सांगून बाहेर पडत होते. पेशंट कोणत्याही थरातील असो हे दोन शब्द उच्चारून जात होते. रूग्णांचे कमावलेले हे प्रेम होते. कोरोनात लोक त्रासात आहेत, नोकर्‍या गेलेल्या आहेत, बॅड पॅच आहे म्हणून फी वाढवली नाही.

कोरानात गरीब आणि श्रीमंत दोघांना एकाच मापात मोजले. श्रीमंतांना सबसिडी देऊ नये असे कुठेही लिहीलेले नाही. त्यांचे देखील पैसे वाचवू दे, फी वाढवा सांगणार्‍यांना त्यांचे हे उत्तर होते.जो पर्यंत सोशल सेन्स आहे तोपर्यंत प्रॅक्टीस करणार असे सांगत आज मी जे घडलो ते माझ्या पेशंटमुळे! खरा अनुभव त्यांच्या कडून मिळाला. निरीक्षण शक्ती आणि प्रॅक्टीकल ट्रेनिंगने घडलो. ज्ञान आणि प्रॅक्टीकल मध्ये अचुकता स्वत:ची हवी तरच यशस्वी व्हाल सोबत सामाजिक भानही हवे असे त्यांचे मत आहे.

-संपर्क-

मोबा. 99309 35318

फेसबूक : https://www.facebook.com/profile.hp?id=100069391875516

- Advertisment -

ताज्या बातम्या